नाग जेव्हा सरपटत जातो
तेव्हा खरेच नाही कळत मला
की तो नाग आहे की साप आहे ?
तुम्हाला कळतो का तो काय आहे ते ?
साप की नाग ?
कधी बघितलाय का त्याला सरपटताना ..?
नि अचानक फणा काढताना ?
*****
सळसळ सळकताना विजेच्या वेगाने
नि फणा काढून जाभाड पसरताना ?
अगदी वीतभर फणा नि
पसरलेला आक्राळविक्राळ जबडा
एखादे पाखरू ,उंदीर कसा भयभीत नि
मत्रमुग्ध होऊन जातो त्याच्या नजरेच्या टप्प्यात
नि जागच्या जागी कसे खिळून जातो
त्याच्या जबड्यात कसा शिरतो अलगद
आपले प्राण त्याच्या हवाली करत ?
******
मी पाहिलेय भर दुपारी बारा वाजता
एका सरड्याला
हताशपणे ...!!
आपले प्राण त्याच्या हवाली करताना ….!!!
मी बघितलाय ह्या तेजपुंज नि बिनधास्त नागाला
जीवाची परवा न करता आपल्याच मस्तीत !!
फणा उभारताना ...
*************
नागाला बघावा मैथुनमग्न अवस्थेत
नर मादीशी जुबघावा
स्वताच्या शरीराचा तोल सांभाळत
ताठ्च्या ताठ शरीर तोलीत मैथुनमग्न
अवस्थेत ...,!
अचंबित होऊन बघावा ...!!
*******
नाग बघावा सळसळताना
नाग बघावा मुंगसाशी झुंजताना
फणा काढताना बघावा
मुंगुस लोळागोळा नि नाग फुसंड्तांना बघावा
नाग जरी हरला तरी त्याचा रुबाब बघावा
नागाच्या मिठीतील हा लोळालोळा बघावा
हरला तरी जिंकला .......???
*******
मी पाहिलाय नाग दगडात लपलेला
नि काही पोरे टपून त्याला मारायला
दगडात लोखंडी काम्बी घालून त्याला ठेचताना
तेव्हा त्याने ट्वकारलेला फणा
नि वासलेला वीतभर जबडा
तेव्हा आखे ब्रम्हांड फिरले माझ्या डोळ्यसमोर ......
नि मी शिरू लागलो त्याच्या जबड्यात
भरल्यासारखा !केविलवाणा ...!!
प्रतिक्रिया
17 Nov 2010 - 3:55 pm | गणेशा
साध्या श्या एका प्रश्नावरुन नाग की साप कधी पाहिलाय का ?
येव्हदी मोठी कविता होउ शकते हे माहीत नव्हते ...
तुमच्या कविता वर वर खुप साध्या सोप्या वाटल्या तरी त्यातील वर्णन खुप खोल असते ..
लिहित रहा .. वाचत आहे