आई !!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
16 Nov 2010 - 9:12 pm

किती काळ गेला तुला जाऊन
तुझी आठवण येत नाही असे होत नाही.
पण तुझ्या आठवणीने
डोळ्यात पाणी येते असे पण आता होत नाही !!

आई!!
बरे झाले तू म्हातारी होऊन नाही गेलीस
मी जेह्वा एकटा असतो
वरच्या गच्चीत निळ्या आभाळाकडे बघत असतो
आई मला तू चक्क दिसतेस
तुझा तो छान प्रसन्न चेहरा
माझे मन भरून येते
पण शप्पत ?
डोळ्यात पाणी नाही येत आताशा माझ्या !!

आई ;तू शांत होतीस
दुधावरची साय होतीस !
पोरांनी अभ्यास नाही केलास तर
मास्तरची छडी होतीस !!

चार-पाच पोरांची तू आई होतीस
चार-चार पाच -पाच रुपये लपवून-साठवून
घराला मदत करणारी तू कोण होतीस?
तू साक्षात लक्ष्मी होतीस ?
आनदाचा झरा होतीस !!

बाबा गेला नि तू एकदम कोरडी झालीस
अचानक प्रौढ झालीस
वयाला न शोभेल अशी म्हातारी झालीस
ह्या संसारातून तू अलिप्त झालीस !

आता आमच्या ह्या वयात आठवतांना
तू किती लहान वाटतेस ?
तू जाण्याच्या काही दिवस आधी म्हणालीस
खूप सांभाळलेत मला प्रेमाने
जिवंतपणी केलेत ते भरपूर केलेत
मेल्यावर काही केले नाही तरी
मी आहेच तुमच्या मागे सतत !!
मी गेल्यावर मोठेपणा मिरवण्यात
उगाच वेळ घालवू नका
अन पाप पुण्याचा हिशेब ठेऊ नका !!

आणि आज ह्या ढग भरल्या दिवसात
तुझी आठवण आली
अन शप्पत !!
डोळ्यातून एक थेंब टपकला ..!!!

किती काळ गेला तुला जाऊन
तुझी आठवण येत नाही असे होत नाही
पण आता खरेच सांगतो
डोळ्यातून पाणी येते किंवा येत नाही
खरेच आता कळत नाही !!

करुणकविता

प्रतिक्रिया

गणेशा's picture

16 Nov 2010 - 9:24 pm | गणेशा

आणि आज ह्या ढग भरल्या दिवसात
तुझी आठवण आली
अन शप्पत !!
डोळ्यातून एक थेंब टपकला ..!!!

निशब्द मित्रा .....

कविता आवडली. थोडी विस्कळीत वाटते आहे..

चित्रा's picture

17 Nov 2010 - 1:51 am | चित्रा

आपला कविता मिपावर प्रकाशित करण्याचा वेग कौतुकास्पद आहे.
कल्पनाही चांगल्या आहेत, पण त्या विकसित करताना कवितांवर जरा अधिक विचार करून विस्कळीतपणा काढून टाकून मग ती संस्करण केलेली कविता इथे द्यावी असे सुचवते.

ढगभरल्या आसमंतात
दाटलेली आठवण तुझी
ओल्या नयनात उभी
आसवांची कोरीव लेणी

.....
.....

(तुमचे शतशः आभार , खुप दिवसानी माझ्या आई.. या सिरिज मध्ये लिहिले नव्हते ही माझी २४ वी कविता ठरेल त्यावरील आणि त्याची प्रेरणा तुमच्या कवितेमुळे फक्त ... आभार मनापासुन (येथे फक्त १च कडवे देतो कवित नंतर देतो).. तुमचा ढगभरल्या दिवसात आलेली आठवन हे खुप जबरदस्त आहे ... त्या 'ढगभरल्या' शब्दाची चोरी करुन हे कडवे लिहिले आहे शमस्व .. )