[चौकशी] सिग्मा कंपनीच्या लेन्सेस

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
16 Nov 2010 - 2:16 pm

सिग्मा कंपनीच्या झूम लेन्सेस इथे कुणी वापरल्या आहेत का? पुण्यात त्या कुठे मिळतात याची माहीती हवी आहे.

कला

प्रतिक्रिया

सर्वसाक्षी's picture

16 Nov 2010 - 3:40 pm | सर्वसाक्षी

फारसा बरा नाही.

मी निकॉन साठीची ७०-३०० वापरली. १००-१२० पुढे गेल्यावर सुस्पष्टता जाते, प्रतिमेला कडा येतात व किरण म्हणावा तसा स्पष्ट साधत नाही. शिवाय किरण हाती साधायचा तरीही मर्यादा येतात.

त्यामानाने त्याच किमतीत टॅमरॉन चांगली आहे.

५० फक्त's picture

16 Nov 2010 - 4:06 pm | ५० फक्त

मी लेन्स वापरलेल्या नाहीत पण अप्पा बळवंत चॉकात पुना फिल्म मध्ये मिळु शकतील. हवा असल्यास त्यांचा नंबर व्यनिने कळवेन. त्यांच्या कडे रेट सुद्धा कमी असतांत बाहेरच्या पेक्षा आणि गॅरंटी/ वॉरंटी पण मिळेल. सामान बिलासहित मिळेल.

हर्षद

इथेच द्या की नंबर! व्यनिने कशाला? आम्हालाही कळेल.

५० फक्त's picture

16 Nov 2010 - 5:48 pm | ५० फक्त

इथे जाहिरात केली म्हणुन बोंब होते म्हणुन व्यनि चा विचार होता.

श्री. विजुभाउ - ०२० २४४५७८४२ - यांच्या कडे जातांना तुम्हाला काय हवं आहे ते २-३ पर्याय घेउन जा. त्यांना कॅमेरा / लेन्स मधलं फारसं कळत नाही. तुम्ही मेक / कॅटलॉग नंबर घेउन गेला की काम खुप सोपं होतं.

यांचं दुकान इमारतीच्या मागच्या भागात तिसर्या मजल्यावर आहे, इमारतीला लिफ्ट नाही.

किंमती शो रुम पेक्षा १० - १५% कमी असतात, अगदी बिलासहित सुद्दा.

हर्षद

बोंब झाली तर दुर्ल़क्ष करा. :)
धन्यवाद फोन नंबर दिल्याबद्दल. आत हे दुकान कुठे आहे तेही सांगा.
दुकानात लेन्सेसचे कॅटलॉग वगैरे असतील का?

जयंत कुलकर्णी's picture

16 Nov 2010 - 7:04 pm | जयंत कुलकर्णी

आमचे फोटोग्राफीचे सर सांगतात की जो कॅमेरा आहे त्याच कंपनीची लेन्स वापरावी, कारण मग डाटा लॉस कमी होतो.

आणि मलाही ते पटले आहे.

५० फक्त's picture

17 Nov 2010 - 8:24 am | ५० फक्त

हा घ्या पत्ता, केळकर रोड वरुन अप्पा बळवंत चॉकात गेलात की तिथुन सरळ जायचं - तांबडी जोगेश्वरी देवळाकडे जाणा-या रस्त्यावर. प१ . प२ पाहुन गाडि पार्क करायची. आता चॉकातली उजवीकडची पहिलीच इमारत, बहुधा सिद्धार्थ चेंबर नाव आहे.

आधि सांगितल्या प्रमाणे दुकान आतल्या बाजुला आहे.

बिजुभाउ कडे जाताना आपले लेन्सेसचे कॅटलॉग वगैरे घेउन जावे, त्यांच्या कडे काही असेल याची शक्यता फार कमी.

हर्षद

यशोधरा's picture

17 Nov 2010 - 12:28 pm | यशोधरा

धन्यवाद.

मिसळभोक्ता's picture

17 Nov 2010 - 9:03 am | मिसळभोक्ता

ज्या लेन्सा बायका विकतात, त्यांना युयुत्सुंची हिष्टरी माहिती आहे. त्यामुळे कुठल्याही कंपनीच्या लेन्सा घ्या, पण पुरुषांकडून घ्या, ही विनंती.