आई.. मिटलेला श्वास - ७

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
16 Nov 2010 - 1:36 pm

भाग ६ :- http://www.misalpav.com/node/15395

पार्श्वभुमी : शेतवस्ती वरती राहणारा कवितेचा नायक. शेतातील फ़ुले , बांधावरील माळवादाचे घर, वाहणारा पाट , चंद्र यांची अवस्था ही आता त्यास त्याच्या मोडलेल्या मना प्रमाणे वाटते.. सुर हरवलेले जग त्याच्या मनाच्या बांधावरुन..

बांधावर पडलेल घर
रानफ़ुलांचा एकेरी सूर
भळभळणारा आठवांचा पाट
डोळ्यामध्ये भयसंध्या दाट

चंद्राची ढगात हूल
सुनसान विचारांची भूल
निशब्द एक काहूर
मन व्याकुळ सैरभैर

श्वास हवेत निस्तब्ध
कळेना माझे प्रारब्ध
स्मरणात तुझीया
सुकलेले दोन नेत्र

------- शब्दमेघ

करुणकविता

प्रतिक्रिया

प्रकाश१११'s picture

16 Nov 2010 - 2:22 pm | प्रकाश१११

बांधावर पडलेल घर
रानफ़ुलांचा एकेरी सूर
भळभळणारा आठवांचा पाट
डोळ्यामध्ये भयसंध्या दाट

मला आई विषयी कविता आवडली.

अगदी मनापासून !!अभिनंदन मित्रा !!

अरुण मनोहर's picture

16 Nov 2010 - 6:15 pm | अरुण मनोहर

कल्पना थोडी अजून फुलवायला हवी होती. बाकी छान.