शिळधार पाऊस पडत असतो
कुणाची पर्वा न करता
तो तर आपल्याच मस्तीत
मस्त गात असतो !
तो नाही बघत हे शेत आहे ?
तो नाही बघत हे शहर आहे
समुद्र सुद्धा ह्याला नाही दिसत
ईतका तो मग्न असतो
अरे नकोरे पडू तेथे
बरबाद होशील !
पण तो कुणाचेच ऐकत नसतो
तो आपल्याच मस्तीत गात असतो.!!
पाऊस खिडकीतून बघावा
पाऊस फ्रेंचविंडो मधून बघावा
पाऊस गावाच्या कौलावरचा बघावा
झाडापानातून टीप टीप गळणारा बघावा
पाऊस समुद्रावर कोसळताना बघावा
पाऊस पडत असतो धुवाधार
नि समुद्र फुसांडत फणा काढताना बघावा !!
__
गच्च काळ्याभोर ढगांना आभाळात
ओथंबून आलेला बघावा
सपकन पाठीवर बसणाऱ्या चाबकासारख्या
विजेच्या कडकडाटात बघावा
गच्च काळे ढग नि मी हा असा एकटा
मी शेतावरच्या झोपडीत असा भयभीत
मी सुन्न होऊन बघत बसतो पाऊस
पाखरे कसे चिडीचिप्प !!
झाडाचे पान देखील घाबरून मिटून ...!!
श्वाससुद्धा कोंडून ठेवलाय झाडांनी .....
असा पाऊस घट्ट मनाने बघताच येत नाही
तो धीरगंभीरपणे बघावा
तो अंतरंगात सेव्ह करून ठेवावा .....!!
प्रतिक्रिया
16 Nov 2010 - 1:54 pm | गणेशा
अतिशय सुंदर कविता .. निशब्द .
एका एका ओळीतुन चित्र निर्माण करण्याची ताकद आहे.
मनापासुन पुन्हा पुन्हा वाचली कविता.....
गच्च काळे ढग नि मी हा असा एकटा
मी शेतावरच्या झोपडीत असा भयभीत
मी सुन्न होऊन बघत बसतो पाऊस
पाखरे कसे चिडीचिप्प !!
झाडाचे पान देखील घाबरून मिटून ...!!
श्वाससुद्धा कोंडून ठेवलाय झाडांनी .....
असा पाऊस घट्ट मनाने बघताच येत नाही
तो धीरगंभीरपणे बघावा
तो अंतरंगात सेव्ह करून ठेवावा .....!!
हे तर अप्रतिम निव्वळ
लिहित रहा .. वाचत आहे ..