शब्द्-छल

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जे न देखे रवी...
14 Nov 2010 - 8:58 am

असं म्हणतात,
शब्दांना असतो गंध
शब्द करतात धुंद
शब्दांचा हा विलास
शब्दगंध देई खास

पण..... असंही म्हणता येईल........

शब्दांना असतो आकृतीबंध
जो करतो गंध कुपीत बंद
कोषात अर्थ साचेबंद
पचनाला जड ताळेबंद

शब्द कंजुषीने वापरा,
अर्थाचा झालाच कचरा
शब्द भरभरून उधळा,
अनर्थाला येई उमाळा

शब्द सोलले जातात
शब्द तोलले जातात
किस काढता अजाणता
मने तोडली जातात

कविता

प्रतिक्रिया

रन्गराव's picture

14 Nov 2010 - 12:58 pm | रन्गराव

लय भारी. अजून येवू दे :)

प्रीत-मोहर's picture

14 Nov 2010 - 7:11 pm | प्रीत-मोहर

छान....