लग्नात घेण्यासाठी चांगले आणि विनोदी असे दोन्ही उखाणे मि.पा.करांकडुन मिळतील का? गुगल वर तेच तेच जुने येण्यापेक्षा मि. पा. वर चांगले मिळतील असा आमचा (अंध) विश्वास आहे(च).
१> तबला वाजे, पेटी वाजे छान वाजे वीणा
..... रावांचं नाव घेते 'वंदे मातरम' म्हणा !!!!
............................................................
२>***रावांची थोरवी मी सांगत नाही
कितीही प्याले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !!
............................................................
३>इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
**** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!
............................................................
४> काचेच्या बशीत बदामी हलवा ........ चे नाव घेतो
सासुबाईला बोलवा !!
लग्नात घेण्यासाठी चांगले आणि विनोदी असे दोन्ही उखाणे मि.पा.करांकडुन मिळतील का?
हो नक्कीच !!@!!
गुगल वर तेच तेच जुने येण्यापेक्षा मि. पा. वर चांगले मिळतील असा आमचा (अंध???) विश्वास आहे(च).??? हा हा !!@!
प्रतिक्रिया
13 Nov 2010 - 11:21 am | अविनाशकुलकर्णी
सद्ध्या संकेत स्थळावरचे लेखन व वाद म्हणजे क्यापी/पेस्ट चे युद्ध असते.....
गुगळ..क्य्वापी..पेस्ट..
बरेचसे इथे क्व्यापी पेस्त विचा्रवंत आहेत
13 Nov 2010 - 11:22 am | प्रचेतस
येथे पहा. भरपूर मिळतील.
13 Nov 2010 - 11:53 am | संजयशिवाजीरावगडगे
१> तबला वाजे, पेटी वाजे छान वाजे वीणा
..... रावांचं नाव घेते 'वंदे मातरम' म्हणा !!!!
............................................................
२>***रावांची थोरवी मी सांगत नाही
कितीही प्याले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !!
............................................................
३>इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
**** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!
............................................................
४> काचेच्या बशीत बदामी हलवा ........ चे नाव घेतो
सासुबाईला बोलवा !!
लग्नात घेण्यासाठी चांगले आणि विनोदी असे दोन्ही उखाणे मि.पा.करांकडुन मिळतील का?
हो नक्कीच !!@!!
गुगल वर तेच तेच जुने येण्यापेक्षा मि. पा. वर चांगले मिळतील असा आमचा (अंध???) विश्वास आहे(च).??? हा हा !!@!
14 Nov 2010 - 4:26 pm | पंख
हा हा हा.. फारच छान संजयराव, अजून येऊ द्यात !
13 Nov 2010 - 12:00 pm | कानडाऊ योगेशु
मि.पा.वर इथेही मिळतील.
13 Nov 2010 - 1:52 pm | पर्नल नेने मराठे
खोक्यात खोका टिव्हीचा खोका..
मी तुझी माउ तु माझा बोका.
14 Nov 2010 - 12:37 am | उपास
चु चु ह्यात नाव कुठे आलं पण.. खोकं आहे नुसतं...
13 Nov 2010 - 2:07 pm | शाहरुख
काल परवाच इथे ही राजकीय घोषणा वाचली..उखाणा म्हणून चालायला हरकत नाही !
अबक अंगार है !
बाकी सब भंगार है!!
13 Nov 2010 - 2:08 pm | धमाल मुलगा
मच्याकवर शोधले का? ;)
13 Nov 2010 - 11:36 pm | शिल्पा ब
मच्याक म्हणजे काय?
13 Nov 2010 - 6:16 pm | मृत्युन्जय
कपावर कप, बशीवर बशी
माझी ----- सोडुन बाकी सगळ्या म्हशी. :)
13 Nov 2010 - 6:33 pm | पर्नल नेने मराठे
=)) हा मस्त्च आहे
13 Nov 2010 - 8:44 pm | नगरीनिरंजन
इथून तिथून पेरला लसूण
---ला आणलं एस्टीत बसून
कधी लावते तेल कधी लावते जेल
---ची बघा केवढी पोनीटेल
लग्न झालं आता बोलायचं काम काय
---चं नाव घेतो मी अल्लाघरची गाय
आयटीतली नाही झालीय बी एड
---ला तरी कॉम्प्युटरचंच वेड
पंगत नको आता मॉडर्न बुफे बरा
---ला घास देतो जरा माझी प्लेट धरा
14 Nov 2010 - 4:09 am | रुपी
लवंगाने होते कुणकुण, विलायचीने होते सर्दी,
...... आली घरी, आता कमी करा गर्दी!
(Technical details मध्ये जाउ नका. हा उखाणा मी बनवलेला नाही, पण लग्नात माझ्या नवर्याने घेतला होता, मजा आली.)