((निशाण))

नगरीनिरंजन's picture
नगरीनिरंजन in जे न देखे रवी...
12 Nov 2010 - 9:00 pm

जय नावाचा इतिहास जो
घडले तसेच सांगत आहे?
पराजित सारे मरून गेले
जेत्यांचा भाटगण गात आहे

मानवबुद्धी श्रेष्ठ कर्तबगारी
वचन गीतेत महान आहे?
पौरुषहीन जो संन्यस्त झाला
कामलालसा घेते प्राण आहे

पांडवास हरवण्या दान करुनी
सूर्यपुत्र अधर्माने वागत आहे?
धर्म रक्षणासाठी कवचाचे
अधर्म्यांकडूनच दान आहे

'पांडव' तो जरी इंद्रपुत्र
गादीवर हक्क सांगत आहे
पान्हा तोडून टाकले जिने
पाचांचे जीवदान मागत आहे

रजस्वलेची फेडुनी वस्त्रे
अंकी बसण्या बोलवत आहे?
जी राज्य स्वतःचे मिळाले असता
फजिती करून हसत आहे

नरो वा कुंजरो वा
'धर्मराजाचा' प्रताप आहे
नि:शस्त्र वृद्ध घेरून वधला
सूड पुत्राचा पाप आहे?

नसे धर्मवान सर्वदा कोणी
लोभ कोणाला चुकला आहे?
'जया'ची बाजी ज्याने मारली
तो ईश्वरपदाला पोचला आहे.

'जया'ची बाजी ज्याने मारली
तो ईश्वरपदाला पोचला आहे....

करुणमौजमजा

प्रतिक्रिया

रन्गराव's picture

12 Nov 2010 - 9:08 pm | रन्गराव

आज खरच फार चांगला दिवस आहे. :)

धमाल मुलगा's picture

12 Nov 2010 - 9:13 pm | धमाल मुलगा

एकदम सवाल-जवाबच रंगले की!
य्ये ब्बात!

मजा आहे. :)

शिल्पा ब's picture

12 Nov 2010 - 11:10 pm | शिल्पा ब

असेच म्हणते... (हायल्ला सोडुन )

प्रीत-मोहर's picture

12 Nov 2010 - 9:14 pm | प्रीत-मोहर

मस्तच जुगलबंदी चाललिये.......चालुद्यात
:)

असुर's picture

12 Nov 2010 - 10:13 pm | असुर

एक नंबर! निशाणांची मालिकाच लागली आहे इथे!
नाना, ननि* - अजून येऊ द्या!!

ननि = नगरीनिरंजन

--असुर

गणेशा's picture

16 Nov 2010 - 1:42 pm | गणेशा

एकदम जबरदस्त ...

परिकथेतील राजकुमार's picture

16 Nov 2010 - 1:50 pm | परिकथेतील राजकुमार

जहबर्‍या !!