भाग ५: http://www.misalpav.com/node/15255
पार्श्वभुमी : गावाकडे शांत तळ्यावर बसल्यावर, त्याची सुक्ष्म लाट ही मनावर आघात करते आणि विचारधारेच्या प्रवाहात मन हळुच वाहु लागते
तळ्याकाठी निशब्द
निरव सांजवेळ
नक्षत्रांच्या फेर्यामध्ये
आठवांचा खेळ
सोनेरी क्षणांचा हा
क्षणिक कवडसा
अभिषेक सूर्यास्तास
ओघळणार्या आसवांचा
तरंगीत सुक्ष्म लाट
मनपटलावर विरता
तिमिरात सामावते
अखंड विचारधारा
---------- शब्दमेघ
प्रतिक्रिया
11 Nov 2010 - 7:08 pm | पैसा
खूप आवडलं हे वेगळं सांगायला नकोच.
12 Nov 2010 - 9:24 am | नगरीनिरंजन
सुंदर रे गणेशा!
स्वगतः डाव्या-उजव्या सोंडाशेपट्यांवर ढीगाने प्रतिक्रिया येतात पण चांगल्या कवितेकडे दुर्लक्ष का?
16 Nov 2010 - 9:53 pm | प्रकाश१११
खरेच छान शब्दचित्र !!
कवितेला सलाम!!
16 Nov 2010 - 10:23 pm | प्राजु
सोनेरी क्षणांचा हा
क्षणिक कवडसा
अभिषेक सूर्यास्तास
ओघळणार्या आसवांचा
सुरेख!! कल्पना फार आवडली.
17 Nov 2010 - 1:32 pm | गणेशा
सर्वांचे आभार ..
प्राजक्ता जी आपण सुचविलेला बदल खुप आवडला ..
मनापासुन कविता वाचुन सुचविलेल्या बदला बद्दल शतश आभारी
पुन्हा येथे कविता देतो आहे :
तळ्याकाठी निशब्द
निरव सांजवेळ
नक्षत्रांच्या फेर्यामध्ये
आठवांचा खेळ
सोनेरी क्षणांचा हा
क्षणिक कवडसा
अभिषेक सूर्यास्तास
ओघळणार्या आसवांचा
तरंगीत सुक्ष्म लाटा
मनःपटलावर विरता
भळभळती विचारधारा..
तिमिरात भिजती आता
---------- शब्दमेघ