नववर्षदिन ?

पारा's picture
पारा in काथ्याकूट
7 Nov 2010 - 1:58 pm
गाभा: 

हिंदू समाज, नवीन वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरं करतो, तर मग हे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला नूतन वर्षाभिनंदन कसले ? तर हे व्यावसायिक नववर्ष, जसा इंग्रजी तालिकेनुसार १ एप्रिल असतं तसंच हे आपल्यासाठी. आता आपण १ एप्रिल ला नववर्षदिन मानतो का ? नाही तर मग पाडवा का ?

ह्याचा मूळ संदर्भ सौर आणि चांद्र कालगणनेत सापडतो असे ऐकले आहे. पण ह्याहून जास्त मला माहिती नाही. कोणी जाणकार ह्याहून जास्त सखोल माहिती देऊ शकेल का ?

प्रतिक्रिया

अवलिया's picture

7 Nov 2010 - 2:22 pm | अवलिया

किंचित सुधारणा.

सर्व हिंदू समाज नाही तर आपण महाराष्ट्रातील रहिवासी (आणी काही कन्नड, तेलगु इत्यादी) चैत्र शु प्रतिपदेला नवीन वर्ष साजरे करतो. आपण शालिवाहन शक ही कालगणना स्विकारली आहे तिचा चैत्र शु १ हा पहिला दिवस आहे. सध्या त्याचे १९३२ वे वर्ष चालु आहे

अनेक जण विक्रम संवत ही कालगणना मानतात. तिचा पहिला दिवस कार्तिक शु १ आहे. बरेचसे उत्तर भारतातील लोक विक्रम संवत या कालगणनेने व्यवहार करतात. आज त्याचे २०६७ वे वर्ष चालु झाले.

व्यावसायिक कालगणना १ एप्रिल पासुन असली तरी तिला धार्मिक/उत्सव महत्व नसल्याने कुणीही नववर्ष साजरे करत नाही. मात्र १ एप्रिल वेगळ्या कारणासाठी साजरा केला जातोच.

ए.चंद्रशेखर's picture

8 Nov 2010 - 6:33 am | ए.चंद्रशेखर

श्री. अवलिया यांनी दिलेली माहिती बरोबर असली तरी अपूर्ण वाटते.
१. उत्तर हिंदुस्थानात विक्रम संवत म्हणून जी कालगणना रूढ आहे तिचा नववर्ष दिन चैत्र वद्य प्रतिपदेला येतो.
२. गुजरात मधे जी विक्रम संवत कालगणना रूढ आहे त्याप्रमाणे नववर्ष दिन कार्तिक शुद्ध प्रतिपदा या दिवशी येतो.
३. महाराष्ट्रात शालीवहन संवत रूढ आहे. त्याचा नववर्ष दिन चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी येतो.
मात्र असे का? हे विचारण्यात काही अर्थ नाही. अनेक नववर्ष दिन आले की वर्षात अनेक वेळा त्या निमित्ताने Celebrate करता येते. Enjoy

गुजराथी लोकांचे नववर्ष हा दिवाळीचा पाडवा असतो बहुतेक.