पिंपळ...

अवलिया's picture
अवलिया in जनातलं, मनातलं
7 Nov 2010 - 1:34 pm

पिंपळ.

कधी एखाद्या नर्तकीप्रमाणे सळसळ करत डोलणारा, कधी शंकराच्या तांडव नृत्याप्रमाणे आसमंत घुमवुन टाकणारा आवाज करत आपल्या बाहुंनी सर्व जगाला कवेत घेणारा तर कधी स्वतःशीच मस्तीत शीळ घालत बसल्या जागी हसत हसत बोलणारा तर कधी एखाद्या सर्वसंगपरित्याग केलेल्या योग्याप्रमाणे निश्चल होऊन स्वतःची सर्व जाणीव हरपुन बसलेला.

पिंपळाच्या विविध रुपांनी माझे मन नेहमीच हरखुन जाते. पिंपळ खरे तर कुठेही दिसतो. जिथे जागा मिळेल तिथे उगवणार्‍या गवताप्रमाणेच पिंपळ हा वृक्ष कसा काय उगवतो हे मला नेहमीच कोडे पडते. जुनाट तटबंदी, पडके वाडे, मोकळे मैदान इथे तर दिसतोच पण कित्येकदा अगदी नव्या इमारतीच्या एखाद्या फटीतुन सुद्धा अलगद डोकावत आकाशाकडे झेप घेतांना त्याची तयारी असते. पिंपळाच्या पानावर जीवसॄष्टी उगम पावली असे मानतात. खरे असावे का ते? मग तर पिंपळ अनादी अनंताचे प्रतिक मानावे लागेल. त्याची जिद्द पाहिली की ते खरे वाटते.

पिंपळावर मुंजा असतो म्हणे ! मला अजुन कधी दिसला नाही. कदाचित मला घाबरुन तो झाडावरुन उतरला नसावा. लहानपणी मामाच्या गावी घरशेजारील पिंपळाचा मुंजा बाधु नये म्हणुन आई रामरक्षा म्हणुन करदोटा बांधायची. बहुधा त्याचा अंमल अजुन असला पाहिजे. पुढे थोडी समज आल्यावर मामाकडे गेल्यावर कित्येकदा अमावस्येच्या रात्री मी मुद्दाम पिंपळाखाली जाउन बसलो आहे. कुणी फिरकत नसल्याने स्वतःशीच विचार करायला मस्त वेळ मिळायचा. शहरात पिंपळाच्या झाडाचे अस्तित्व जास्त जाणवत नाही. असलाच तरी गर्दीने बुजुन पिंपळ शांत असतो. पिंपळाचं खरं सौंदर्य मो़कळ्या माळावर.

भिरभिरणारं वारं पिऊन मोकाट सुटलेल्या वळूप्रमाणे मस्ती असलेला पिंपळ आपल्याच मस्तीत जगत असतो. पानगळीत ओकाबोका झालेला पिंपळ केविलवाणा दिसतो. एखाद्या मनुष्यावर चहु बाजुंनी संकटं यावीत आणि मार्ग दिसेनासा व्हावा अशी स्थिती आल्यावर जसा तो दिसतो तसंच त्याच रुप असतं. पण निसर्गाची लीला अगाध असते. मनुष्याप्रमाणेच सर्व निसर्ग एका अदृश्य नियमाने बांधलेला आहे. चक्र अविरत चालु असते. बदल होत रहातोच. अलगद वसंत येतो आणि पुन्हा पालवी फुटते. मागचा सारा पाचोळा कुठल्याकुठे उडुन जातो आणि पिंपळ पुन्हा बहरतो. मग ग्रीष्माचा कडक उन्हाळा आला तरी शीतल लहरींचा शिडकावा शीळ घालत करत रहातो.

कधी मधी मी असाच निवांत एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसतो. बहुधा माझे आणि पिंपळाचे फारा जन्मांचे नाते आहे. माझ्या मनातले विचार त्याला कळतात. तो माझ्या बरोबर हसतो. माझ्याबरोबर रडतो. मी उदास असलो की तो उदास होतो. मला बरे वाटले की त्याला बरे वाटते. कधी कधी असे वाटते तो मला काहीतरी हलकेच सांगत आहे. पण मला तो भास वाटतो आणि मी दुर्लक्ष करतो. एकदा त्याचे बोलणे मी नीट ऐकणार आहे पण भिती वाटते. बहुधा मला माहित आहे तो काय सांगणार आहे. ते ऐकायची माझी आज तयारी नाही असे मी मनाला पुन्हा पुन्हा बजावुन सांगतो. पण मन किती काळ माझे ऐकेल ते सांगता येत नाही. एक दिवस मन माझ्याशी बंडखोरी करुन त्याच्याशी बोलुन उलगडा करुन घेईल. प्रश्न फक्त एवढाच आहे तो उलगडा झाला की माझे अस्तित्व राहील की......?

मुक्तक

प्रतिक्रिया

sneharani's picture

7 Nov 2010 - 1:41 pm | sneharani

पिंपळाच्या पानाप्रमाणे लेखसुध्दा सळसळता झालाय.
मस्त लेख.
असेच लिहीत रहा.
:)

पल्लवी's picture

7 Nov 2010 - 1:42 pm | पल्लवी

स्फुट आवडले.

विनोद कोकने's picture

7 Nov 2010 - 1:56 pm | विनोद कोकने

पोटाचे विकार- पिंपळी चूर्ण गुणकारी
पिंपळीचे औषधात अनेक उपयोग आहेत. पण विशेषत: दमा, खोकला व सर्व प्रकारचे वातविकार व कफरोग यांवर अत्यंत गुणकारी आहे. कफयुक्त खोकल्यावर पिंपळीचे चूर्ण तूप व मध द्यावे. मात्र ते सर्व विषम प्रमाणात द्यावे म्हणजे आराम वाटतो. जेवण झाल्यावर पोट जड वाटणे अथवा पोटास तडस लागत असेल व अन्नपचन होत नसेल, तर जेवणानंतर पिंपळीचे चूर्ण मधाशी खावे. तसेच पोटात वात धरुन शूल होत असेल, तर पिंपळीचे चूर्ण सैंधव, आल्याचा रस व थोडा मध यातून दिल्याने दुखने थांबते. भुक अजिबात लागत नसेल व बारीक ताप असेल तसेच तोंड बेचव असून मळमळ , तोंडाला पाणी सुटणे इत्यादी लक्षणे होत असतील तर नुसते पिंप्ळीचे चूर्ण गुळाबरोबर घेतल्याने हे विकार कमी होतात. पिंपळीचे चूर्ण नुसते न घेता त्याबरोबर सुंठीचे चूर्णही थोडेसे घेतल्यास लवकर गुण येण्यास मदत होते. दमा, खोकला, ह्र्दयाचे विकार, कावीळ, पांडुरोग इत्यादी रोगही या उपायाने बरे होतात. पिंपाळीचे चूर्णाचे दुप्पट गुळ घ्यावा असे वैदक शास्त्रात सांगितले आहे.

मध व पिंपळीने चरबी कमी होते
दात दुखणे, हालणे, ठणका लागणे इत्यादीसाठी पिंपळी, जिरे, व सैंधव यांचे वस्त्रगाळ चूर्ण करुन दांताच्या मुळाशी घासल्याने त्या तक्रारी कमी होतात. शरीरात स्थूलता फार वाढली असेल तर पिंपळीचे चूर्ण सतत काही दिवस मधाबरोबर घेतल्याने शरीरातील चरबी कमी होते व त्यापासून होणारा रोग बरे होतात.

चौसष्टी पिंपळीने दमा बरा होतो
पिंपळाचा उपयोग अनेक रोगांवर होतो. याशिवाय तिचे काही विशेष प्रयोगही शस्त्रांत सांगितले आहेत. त्यापैकी चौसष्टी पिंपळी, वर्धमान पिंपळी, पाचक पिंपळी इत्यादी काही होत. नुसत्या पिंपळीचा सतत चौसष्ट दिवस अहोरात्र खल करतात. तिलाच चौसष्टई पिंपळी म्हणतात. ती अतिशय तीव्र, उष्ण, अतिसुक्ष्म व तीव्र असते. म्हणून ती फक्त मुगाच्या डाळीइतकी तूपमध किंवा मध साखर अथवा वासावलेहातून दोन वेळा घेतल्याने अति जुनाट दम्याचा विकारही बरा होतो. तसेस पडसे, खोकला, अग्निमांद्य, अनिमिया, जीर्णज्वर, ह्रुदयाची अशक्तता इत्यांदीवर फार गुनकारी आहे. चौसष्ट दिवसांऐवजी फक्त चौसष्ट प्रहरच खल करतात. तिलाही चौसष्टी पिंपळीच म्हणतात. पण ती जरा सौम्य आहे. पण इतके असुनही उष्ण्ता वाढल्यास गेण्याचे बंद करुन तुप व दूध पुष्कळ प्रमाणात घेतल्याने पित्त कमी होते. फारच उष्णप्रक्रुतीच्या माणसांनी मात्र पिंपळीचा उपयोग जपूनच करीत जावा.

वर्धमान पिंपळीने अशक्तता जाते
गाईचे दूध चार तोळे, पाणी सोळा तोळे घेऊन त्यात तीन पिंपळ्या घालून सर्व एकत्र करून कल्हईच्या भांड्यात आटवावे. पाणी आटले म्हणजे त्यात खडीसाखर घालून त्यातील पिंपळ्या चावुन खाऊन ते दूध प्यावे किंवा थंड-उष्ण या प्रकृतिभेदानुसार पिंपळ्या खाव्यात किंवा त्या काढून टाकुन, नुसते दुध प्यावे. याप्रमाणे रोज एक पिंपळी याप्रमाणे सात दिवस वाढवीत न्यावे व पुन्हा सात दिवस रोज एक पिंपळी कमी करीत आणावी. यासव वर्धमान पिंपळी म्हणतात. यात पिंपळीचे प्रमाण व ती वाढविण्याचे दिवस यात बरेच प्रकार आहेत. पण सर्वसाधारणपणे वरील प्रमाणे घेतल्यास जरा उष्ण प्रकृतीसही मानवण्यास सोईचे होते. हिच्या सेवनाने जीर्ण ज्वर, पांडुरोग, गुल्म, उदर, अग्निमांद्य, खोकला, अशक्तता व वातरोग दूर होतात. प्रमेह रोगावरही ही गुणकारी.

अजीर्णावर घ्यावयाच्या पिंपळ्या
बरेच दिवसांचा अजीर्णाचा उपद्रव असेल तर पिंपळ्या लिंबाच्या रसात भिजत घालून त्यात सैंदवाचे चूर्ण घालावे. दोन-चार दिवस भिजल्यावर सुकवून ठेवाव्यात व त्यातून दोन तीन नित्य जेवणावर किंवा जास्त त्रास होईल तेव्हा चावून खाव्यात म्हणजे तोंडात रुचि घेऊन पचनास मदत होते

पिंपळमुळाचे पाण्याने नारू जातो
पिंपळीचे गुणाप्रमाणेच पिंपळ मुळाचे गुण आहेत. पण त्यात काही विशेष गुण आएह्त. ते म्हणजे झोप येत नसेल तर पिंपळ मुळांचे चूर्ण गुळाबरोबर रात्री अथवा संध्याकाळी घ्यावे. म्हणजे झोप येते. तसेच ओकारीवर पिंपळमूळाचे वस्त्रगाळ चूर्ण करून त्यात त्याच्या बरोबरीने सुंठीचे चूर्ण घालुन त्यातून साधरणतः एक मासा दरवेळी मधातून चाटावे. म्हणजे ओकारी कमी होते. खोकल्यावरही या दोंहोच्या मिश्रणात थोडे बेहड्याचे चूर्ण मिसळुन मधाबरोबर अथवा कोमट पाण्याबरोबर घेतल्यास खोकला त्वरीत थांबतो. याशिवाय नारूवरही पिंपळमुळाचा अगदी सोपा उपाय सांगितला आहे. तो असा की, पिंपळगुळ थंड पाण्यात उगाळून प्याल्याने नारू बरा होतो. याप्रमाणे पिंपळगुळाचेहि अनेक औषधी उपयोग आहेत.

पिंपळमुळ
पिंपळीच्या झाडाच्या मूळाचा वापर पिंपळमूळ या नावाने होत. भूऱ्या खाती रंगाची ओबड धोबड मुळे काष्ठौषधींच्या दुकानात मिळतात. त्यांचा आकारमानावरून त्यांचा भाव ठरतो. पिंपळमूळ जुने झाल्यास त्याला पोरकिडा लागण्याची शक्यता असते. यामुळे ८-१५ दिवसांपेक्षा अधिक पिंपळमूळ आणून ठेवू नये.

इंपळमूळ हे अत्यंत तिखट अर्थात चव घेतल्यास जिभेच्या शेंड्याची, नाकाची चुणचुण करणारी, प्रसंगी घाम आणणारी असते. तिखट असूनही पिंपळमुळास एक सुगंध असतो. त्यामुळे पिंपळगुळाची उपयुक्तता मानसिक विकार, मतिमंदता, कफामुळे आलेले. हृदयविकार यांमध्ये दिसून येते. अतिशय तिखट असल्यामुळे पचनशक्ती वाढविणारे, साठून राहिलेली आव, पाचन करणारे, वाढलेल्या कफामुळे चोंदलेले नाक, जाड झालेल्या रक्तवाहिन्या, आतड्यांत बसलेला कफाचा लपेटा, डोकेदुखी, यकृताचा मार्ग बंद झाल्यामुळे झालेली कावीळ अशा सर्व विकारांत पिंपळगुळाचा उपयोग होतो.

मतिमंद मुलांमध्ये बऱ्याच वेळा सर्दी, लाळ गळणे, बोबडे बोलणे, अजिबात न बोलणे, सारखी लघवी होणे अशी लक्षणे असता पाव चमचा पिंपळगुळ व चिमूटभर वेखंड मधातून चाटवल्यास बालकाची कफ होण्याची प्रवृत्ती क्रमाने कमी होत मागे पडलेले बोलणे सुरू होऊ शकते.

खूप चांगली माहिती, धन्यवाद.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Nov 2010 - 2:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कोकनेसाहेब, ज्याचं त्याला क्रेडीट दिलं असतंत तरी चाललं असतं.
http://www.marathimati.com/Health/Pimpalya.asp

तुमचा पिंपळ आवडला. आमच्या शेजारच्या इमारतीवर पिंपळ उगवला होता ते पाहून लहानपणी फार मौज वाटायची.

स्पंदना's picture

7 Nov 2010 - 2:11 pm | स्पंदना

मला पिंपळ पान फार आवडत . बाकीच्या पांनांन प्रमाणे याच जणु वाढुन सम्पत नाही वा वाढायची हौस पुरी होत नाही, म्हनुन मग टोकाला त्या वाढीच्या इच्छेची खुण म्हणुन लांब च्या लांब निमुळत होत जाणार पान.

साधारण तुमच्याच सारख अवलियाजी, निरंतर वृद्धींगत होण्याची इच्छा असलेल.

लेख सुन्दर . अन लेख पिम्पळाविषयी असल्याने पिंपळ पानाच्या टोका सारखा लाम्बलचक 'विनोद कोकणेंचा ' प्रतिसाद ही अभ्यास पुर्ण!!

गांधीवादी's picture

7 Nov 2010 - 2:55 pm | गांधीवादी

छान,
श्री. अवलीयांचा अंतर्मुख करायला लावणारा लेख आणि श्री.कोकने यांचा प्रतिसाद, एकदम मस्त, आवडले.
लहानपणी मंगळवार पेठेत(भीमनगर) राहत असताना घरासमोर एक पिंपळाचे झाड होते(आहे). त्याची आठवण झाली. कधी कधी तिकडे जाऊन येत असतो. बरे वाटते.

स्पा's picture

7 Nov 2010 - 3:47 pm | स्पा

असेच म्हणतो..
भन्नाट लेख...............

काही वर्षापूर्वी झी मराठीवर (तेंव्हाचा अल्फा मराठी ) वर "पिंपळ पान" नावाची मालिका लागायची
त्याची आठवण झाली....

झंम्प्या's picture

7 Nov 2010 - 3:17 pm | झंम्प्या

माफ क्ररा... थोडं धीटायीने बोलतो.... माझी तेवढी कुवत नाहीये...
पण का कोनास ठाउक असे का भासते की अजुन काही तरी तुम्हाला यातुन मांडायचे होते...
ही एखाद्या लेखाची सुर्वात भासते... लेख म्हणून अपूर्ण वाट्ला मला...

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Nov 2010 - 3:31 pm | बिपिन कार्यकर्ते

अप्रतिम!

काही पिंपळपानं कायम स्मरणात राहतात. शाळेत असताना पुस्तकात ठेवून ठेवून जाळी झालेलं ...

यशोधरा's picture

7 Nov 2010 - 3:42 pm | यशोधरा

छान लिहिलय...

पैसा's picture

7 Nov 2010 - 5:35 pm | पैसा

पिंपळाभोवतीचं रहस्य वाढवणारा...गूढ... बर्‍याच गूढकथांमधला साक्षीदार...

मदनबाण's picture

7 Nov 2010 - 6:19 pm | मदनबाण

वा...नाना सेठ. मस्त लिहले आहे. :)
कोकने रावांनी पण मस्त माहिती दिली आहे...
पिंपळाचे कोवळे पान फारच सुरेख दिसते... :)
मी तसे पान टिपण्याचा एकादा प्रयत्न केला होता, ते इथे पहावयास मिळेलः---
http://www.esakal.in/ar/120910_maza_angle.aspx

शुचि's picture

7 Nov 2010 - 6:55 pm | शुचि

लेख वाचून बालपणीची आठवण जागी झाली.
पिंपळपानांची सळसळ साक्षात ऐकू येऊ लागली. ६ / ७ वर्षाची मी सूर्य मावळतीला जात असतेवेळी अरण्येश्वराच्या मंदीरात परीसरात उभी आहे . एक पिंपळ सळसळ करून गूढ अशा हाका मरतो आहे. त्याच पिंपळावर चिमण्यांचा तीन्हीसांजेचा चिवचिवाट चालू आहे. आता अंधार पडणार आहे पण मी मात्र सगळ्या मोठ्या माणसांचा हात सोडून, नजर चुकवून त्या पिंपळाखाली जाणार आहे. तो हाका का मारतो आहे ते कळत नाही पण त्या हाका मोठ्या गूढ आहेत, त्या हाकांमध्ये आकर्षण आहे.

गांधीवादी's picture

7 Nov 2010 - 7:24 pm | गांधीवादी

आपला प्रतिसाद भावला.

प्रत्यक्ष निसर्ग साद घालतो आहे आणि आपण आपल्याला निसर्गाकडे झोकून देतो आहे, यापेक्षा ह्या ब्रम्हांडात दुसरे सुख नाही आणि ह्यापेक्षा मोठी कर्तव्यपूर्ती नाही.

(कृपया वाचकांनी 'निसर्गाकडे स्वताला झोकून देणे' याचा गहन अर्थ घ्यावा)

>>तो हाका का मारतो आहे ते कळत नाही पण त्या हाका मोठ्या गूढ आहेत, त्या हाकांमध्ये आकर्षण आहे.
निसर्ग फार पूर्वीपासून मनुष्यास साद घालतो आहे, पण दुर्दैवाने मनुष्य त्याची भाषा विसरला आहे. त्यामुळे त्याच्या हाका गूढ वाटता, इतकेच.(हे आपल्याला उद्देशून नाही हे सां. न. ल.)

अवलिया,
जपून बरं! पिंपळाच्या झाडाखाली जास्त जाऊन बसत जाऊ नका प्लीज!
बुध्दाला पिंपळाच्या झाडाखाली संबोधी मिळाली होती म्हणे ;-)
तुमचं असं काही झालं तर आम्ही फुकट एक चांगला लेखक गमवून बसायचो!
सो बी केअरफूल, आमच्यासाठी!

मितान's picture

7 Nov 2010 - 7:40 pm | मितान

नेहमीप्रमाणे मस्तंच :)

शुचि's picture

8 Nov 2010 - 4:53 am | शुचि

नाना, कृपया पिंपळापासून सांभाळून जरा हे वाचा - http://www.khapre.in/portal/url/mr/sahitya/katha/pauranik/03/z80106021047(अवदशेची.कथा).aspx

जयंत कुलकर्णी's picture

8 Nov 2010 - 9:36 am | जयंत कुलकर्णी

झाडावर एवढे चांगले लिहीलेले बर्‍याच दिवसांनी वाचले.
छान लिहीले आहे. असं जर खूपशा झाडांवर लिहीले आणि त्या झाडाचा फोटो टकलात तर मस्त उपयोगी व धमाल लेख मालिका तयार होईल.

तुम्हाला अशक्य नाही.

वेताळ's picture

8 Nov 2010 - 10:08 am | वेताळ

सरळधोट वाढते. कुठेही आणि कसेही वाढतें. ना त्याला देखभालीची गरज भासते ना खुरपण्याची. लेखामुले माझ्या गतजन्माच्या आठवणी ताज्या झाल्या.तीच सळसळ परत एकु यायला लागली आहे.

स्वाती दिनेश's picture

8 Nov 2010 - 6:52 pm | स्वाती दिनेश

मुक्तक आवडले,
स्वाती

अतिशय सुरेख लेख.
पिंपळ मलाही आवडतो. लहानपणी वह्यातून आणि पुस्तकातून पिंपळाची पाने ठेऊन त्याची जाळी बनवायचं वेडंच लागलं होतं.

अवलिया's picture

9 Nov 2010 - 11:50 am | अवलिया

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे मनापासुन आभार ! :)

परिकथेतील राजकुमार's picture

9 Nov 2010 - 12:12 pm | परिकथेतील राजकुमार

नाना नेहमीप्रमाणेच सुंदर लेखन.

तुझ्या लेखनात जो एक ओघ असतो तो कायमच भावतो :) मात्र हे लेखन थोडे पटकन उरकल्यासारखे वाटले, अजुनही खूप लिहिता आले असते असे वाटते. येवढे छान लिहितोस मग असे अर्धवट का उरकुन टाकतोस ?

प्रभो's picture

9 Nov 2010 - 7:43 pm | प्रभो

+१

मराठमोळा's picture

9 Nov 2010 - 12:31 pm | मराठमोळा

नाना,
टीपीकल नाना. :)

आता पिंपळ पाठोपाठ सगळ्याच झाडांचा लेख येऊ द्यात ... ;-)
अखंड असा धागा.. चालू द्या हो नाना...
अवांतर :- लेख छान :-)

स्वाती दिनेश's picture

9 Nov 2010 - 1:47 pm | स्वाती दिनेश

आता पिंपळ पाठोपाठ सगळ्याच झाडांचा लेख येऊ द्यात
हे वाचून एप्रिलफळे आठवली... ;)
स्वाती

राजेश घासकडवी's picture

10 Nov 2010 - 10:02 am | राजेश घासकडवी

नाना,

स्पष्ट बोलतो म्हणून रागावू नका, पण लेख अपुरा वाटला. पहिल्या परिच्छेदाने अपेक्षा खूप उंचावल्या होत्या. पण नंतर निराशा झाली. चांगला होऊ शकला असता अशी खात्री आहे म्हणून निदान सविस्तर प्रतिसाद देण्याचे कष्ट तरी घेतो आहे.

पिंपळ असं शीर्षक असलेल्या लेखात पारंब्यांचा उल्लेख देखील नाही, मग तो वडापेक्षा कसा वेगळा आहे यावर बोलणं तर सोडाच.... ही मला खूप मोठी त्रुटी वाटली. म्हणजे ओढून ताणून उल्लेख करायला हवा असं नाही तर पिंपळाच्या व्यक्तिमत्वाचा एवढा मोठा भाग राहून गेला यात मला लेखाचं अपयश वाटलं. लेखकाचं पिंपळाशी असलेलं नातं का आहे, कसं आहे याबद्दल दोन ओळींपलिकडे काही नाही.

एकंदरीत लेख दहावीच्या परीक्षेतला चारशे शब्दांचा निबंध म्हणून उत्कृष्ट झाला आहे. पण तुमच्याकडून त्याहून खूप मोठ्या अपेक्षा आहेत.

राजेश