ती दिवाळी पण दिवाळी होती
तीची माझी पहीलीच नजर भेट होती,
मंदीराच्या पाय-या अलगत ती चढत होती
पंजनाच्या सहाय्याने सुर ती छेडीत होती,
नजरेचे बाण हळूच ती सोडीत होती,
सोबतीला हास्याचा फुलबाजा उडवीत होती,
आवाज नव्हता,धुर नव्हता ,पण......
रोशनाई भरपुर होती,खरच......
ती दिवाळी पण दिवाळी होती