गोवा

५० फक्त's picture
५० फक्त in काथ्याकूट
3 Nov 2010 - 7:10 am
गाभा: 

दि. ८ व ९ ला गोव्याला जाणार आहे. त्यासाठी माहिती हवी आहे. मि व मित्र असे दोघे जण सहकुटुंब (बायको आणि मुलं) जात आहोत.

आमच्या पॅकी कोणीही दारु पित नाही,मांसाहार करीत नाही ( मग कशाला जाता आहांत ?) त्यामुलं) गोब्यात काय काय करता येइल किंवा व्हेज जेवणाची काय सोय या बद्दल माहिति हव आहे ?

मार्गदर्शनाची अपेक्षक

हर्षद
going in minty who is preparing to invade NH17.

प्रतिक्रिया

सुनील's picture

3 Nov 2010 - 7:40 am | सुनील

आमच्या पॅकी कोणीही दारु पित नाही,मांसाहार करीत नाही ( मग कशाला जाता आहांत ?)
हेच म्हणतो.

गोव्यात कुठल्या भागात? पणजी मधे असाल तर भरपूर शाकाहारी आणि बिनादारूचे पर्याय आहेत.
१. फिदाल्गो - राजधानी - टेस्ट ऑफ बॉम्बे. ही एकाच कॉम्प्लेक्स मधली दोन तीन हॉटेलं आहेत. सगळी पणजी मार्केट भागात १८ जून रोडवर आहे. यातली काही पूर्ण शाकाहारी तर काही मिक्स आहेत.
२. ग्रीन फॉरेस्ट किंवा फॉरेस्टर अश्या काहीतरी नावाचं एक हॉटेल. हॉटेल मांडवी रिव्हिएरा च्या शेजारी ते आयनॉक्सच्या समोर असं आहे. पणजीतल्या मेन रोडवरच.
३. कामत - पणजीमधल्या मोठ्या कथीड्रलच्या समोर आहे. मार्केट एरियाच. उडपी प्रकार मिळतात. तिथली सौदिंडियन थाळी अहाहाहा...

जिथे जिथे टुरिझम बोकाळलाय तिथे तिथे आहेत पर्याय. मिक्स हॉटेलं चालत असतील तर अजून भरपूर पर्याय आहेत. कोस्टल भागात.
पण आतमधल्या गोव्यात तालुका प्लेसच्या हॉटेल मधे उसळ पाव/ भाजी पाव/ टमाट मिक्स-पाव आणि मिरची भजे असाच पर्याय दिवसभरात कधीही मिळू शकतो.
नाही म्हणायला डिचोलीच्या स्टॅण्डजवळ एक कामत आहे. काहीच नसण्यापेक्षा बरे. कापडी खानावळ प्रसिद्ध आहे डिचोलीची तिथे शाकाहारी जेवण पण मिळू शकते. तिथे साध वरण ज्याला म्हणतात ते प्रकरण जाम चविष्ट असतं. पण अर्थात ते हॉटेल मत्स्यावतारी मेनूसाठी प्रसिद्ध आहे.

मी शाकाहारी आहे आणि कामासाठी सतत गोव्यात फिरते आहे गेले वर्ष-दीडवर्ष. माझ्या परिघात मी शोधलेले हे पर्याय. अस्सल गोवेकर आणि शाकाहारी असलेले लोक अजून सांगू शकतील.

पैसा's picture

3 Nov 2010 - 8:30 am | पैसा

तुम्ही कोणत्या भागात रहाणार आहात? पणजीला असेल तर संयोग, नवातारा, कॅफे भोसले, श्रवण, गुजरात लॉज ही फिदाल्गो आणि राजधानीपेक्षा स्वस्त आणि चांगलं शाकाहारी जेवण देणारी हॉटेल्स आहेत.

फोंडा येथे कॅफे भोसले अतिशय रुचकर जेवणासाठी प्रसिद्ध आहे.

मडगाव येथे 'तातो' हे अतिशय प्रसिद्ध आणि जुनं हॉटेल आहे.

याशिवाय मिश्राहारी जेवण कुठेही मिळतं. पणजीतच कोंकण, रिट्झ आणि फोंड्यात मेनिनो ही अशा प्रकारची आहेत. सगळ्या देवळांमधे स्वस्त आणि कांदा लसूण नसलेलं जेवण मिळेलच.

गोव्यात फिरण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. २ दिवसात सगळा गोवा फिरून होतो. किंवा स्वतंत्रपणे फिरण्यासाठी क्वालिस, इंडिका इ. टॅक्सी उपलब्ध आहेत. दर सगळीकडे एकच असतो.

तुम्ही रहाण्याची व्यवस्था केलेली आहे हे गृहित धरून लिहितेय...

प्रीत-मोहर's picture

3 Nov 2010 - 2:15 pm | प्रीत-मोहर

मडगावला "स्वाद: होटेल सुद्धा मस्त आहे

५० फक्त's picture

3 Nov 2010 - 10:04 am | ५० फक्त

धन्यवाद, राहण्याची व्यवस्था रिया रेसिड्न्सी पणजी येथे आहे. फिरायला स्वःताचे वाहन आहे.

दिवस - १ - १-२ बिच , नेव्हि म्युझियम, रिव्हर क्रुझ डिनर सह असा कार्यक्रम आहे.
दिवस -२ सकाळि लवकर दुधसागर धबधबा, शांतादुर्गा, मंगेशि मंदिर, एखादे चर्च असा कार्यक्रम आहे.
दिवस- ३ पणजि ते म्हाप्सा मार्केट,सावंतवाडी ( राजवाडा, खेळणी खरेदी - मुख्य गंजिफा ),मुक्कामी सुर्यास्तापुर्वी मालवण.
दिवस - ४ निवती बिच्,माल्वण बिच, सिंधुदुर्ग, देवबाग, भोगवे व मुक्काम मालवण असा कार्यक्रम आहे.

परत आल्यानंतर फोटो व रिपोर्ट टाकेनच.

या कार्यक्रमाबद्द्ल देखिल सुचना आणि मार्गदर्शनाचं स्वागत आहे.

हर्षद

प्रशु's picture

3 Nov 2010 - 12:36 pm | प्रशु

रेडी शिरोडा पण बघा.. आणी मालवणात (मेढा) साळगावकरांच गणेश मंदीर जरुर पहा.. मालवण आलं म्हणजे तारकर्ली आलिच.... आणि थोडा थरार हवा असेल तर स्कुबा ड्राविंग आहेच...

मेघवेडा's picture

3 Nov 2010 - 2:32 pm | मेघवेडा

आणी मालवणात (मेढा) साळगावकरांच गणेश मंदीर जरुर पहा..

जमल्यास संध्याकाळच्या आरतीला जा! वेळ आठवत नाही नक्की मात्र ७.३० च्या सुमारास करत असावेत! आल्हाददायक अनुभव आहे.

शैलेन्द्र's picture

3 Nov 2010 - 5:11 pm | शैलेन्द्र

"फिरायला स्वःताचे वाहन आहे."

हे बेस्ट..

पहिल्या दिवशी किती वाजता पोचणार आहात? कारण बिच बघायचे तर एक तर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी... पणजीचा बिच बघा.. तिथुनच थोड पुढे जावुन दोना पाउला बघा.. शक्यतो सरत्या संध्याकाळी. कलंगुट बिच सुंदर आहे, आणि फार गर्दीही नसते.. तिथुन परत येवुन तुम्ही सहज क्रुझवर जावु शकता. सकाळ्चा नाश्ता किंवा जेवण जरुर पणजी मार्केट्मधल्या कामतकडे करा. त्याच्या पाठीमागच्या गल्लित, अक्सिस बैंकेजवळ काही छान बेकरीज आहेत... मुल खुश होतिल. शिवाप्रसाद हा पंजाबी जेवणासाठी एक बरा पर्याय आहे, २६ जानेवारी चौकाजवळ. कोकण किनारा नावाच एक चांगल व स्वस्त हॉटेल कमिश्नर ऑफीसच्या मागच्या गल्लित आहे.

शांतादुर्गा मंगेशी बघाल तर रामनाथीही बघुन घ्या.. तेवढीच पुण्याची जोडणी.

शक्य झाल्यास तारकर्लीच्या एम टी डी सी ला रहा... लोकेशन भन्नाट आहे. व्यवस्था आता कशी आहे माहीत नाही.

५० फक्त's picture

3 Nov 2010 - 5:22 pm | ५० फक्त

पहिल्या दिवशी निघताना कसबे तारळे, राधानगरीपासुन ५ किमि येथुन सकाळि ६ला निघु, तिथुन पणजीला ११ ला पोहोचु - राधानगरी - फोंडा - कणकवली- कुडाळ- सावंतवाडी- पणजी असा रुट आहे.

तसेच मालवणला श्री. प्रसन्नकुमार मयेकर यांच्या घरी राहायची सोय केलेली आहे, त्यांचे घर चिवला बिच वर आहे.

http://www.tripadvisor.in/Hotel_Review-g1227937-d1724259-Reviews-Mayekar...

हर्षद

गवि's picture

3 Nov 2010 - 11:18 am | गवि

मुळात आपण मासे खात नाही म्हटल्यावर यादी एकदम संक्षिप्तात आली.

मासे खात नसलात तरी मासे नुसते बघायला काही हरकत नसावी.

कोलवा बीच वर वगैरे डॉल्फिन दर्शन बोट राईड घ्या.

दोन्ही चर्च (जुना गोवा) समोरा समोरच आहेत. दोन्ही पहा. एकच नको.

फेणी तरी घ्या थोडी. औषध आहे ते.

शुभेच्छा .. एन्जॉय..

परिकथेतील राजकुमार's picture

3 Nov 2010 - 12:36 pm | परिकथेतील राजकुमार

आमच्या पॅकी कोणीही दारु पित नाही,मांसाहार करीत नाही

कृपया सज्जनगड / अक्कलकोट / बालाजी / शिर्डी / राळेगणसिद्धी / साबरमती अशा ठिकाणी जावे अशी नम्र विनंती.
__/\__

उगाच गोव्याला जाउन तिथे 'साधनेत' व्यग्र असणार्‍या मंडळींच्या आनंदात माती कालवु नये ;)

गवि's picture

3 Nov 2010 - 1:38 pm | गवि

+१

शिवाय ..

बीच - वजा - दारु असे कॉम्बिनेशन हवे असेल तर गणपतीपुळे आहेच..

तिथे एम टी डी सी त हलकी (माईल्ड) बियर फक्त मिळते.

मद्य मिळवण्यासाठी तेथील गावाबाहेर एका आन्टींच्या दे.दा.दु. मधेच त्या सामाजिक बान्धिलकीतून विदेशी मद्य ही ठेवतात. बरीच व्हरायटी असते. यंदाच्या व्हिजिटमधे हा कल्याणकारी शोध आम्ही स्वतः लावला.

पण गोव्यासारखा ग.पुळे येथे मांसाहार आणि दारुचा तुमच्याशी जास्त संबंध येणार नाही. बीचची मजा खूप आणि मोदक, वरणभात वगैरे "ऑर्ड्रीप्रमाणे करुन मिळेल" वाले ताजे खूप अन्न भटजींकडे मिळेल.

मस्त जागा आहे..पाहिली नसलीत तर.

मराठमोळा's picture

3 Nov 2010 - 12:40 pm | मराठमोळा

>>आमच्या पॅकी कोणीही दारु पित नाही,मांसाहार करीत नाही

गोवा ही चांगली जागा आहे सुरुवात करण्यासाठी. :)
होऊन जाउ द्या बेत.
गोवन फिश करी, क्रॅब्स, प्रॉन्स, आणि स्कॉच/वाईन्/मोहाची/फेनी वगैरे वगैरे.

इंटरनेटस्नेही's picture

3 Nov 2010 - 1:24 pm | इंटरनेटस्नेही

असेच म्हणतो!

हर्षद! मेल्या कित्याक काळजी करतलंस? गोयांत सुशेगात रव.

पणजीत जेट्टीच्या जवळ समांतर रस्त्यावर 'रुची' नावाचे हॉटेल आहे. तिथे पावभाजी, मिसळ, पंजाबी, चायनीज, काँटिनेंटल, दाक्षिणात्य शाकाहारी थाळी असे पदार्थ मस्त आहेत. पूर्ण व्हेज हॉटेल आहे. महिला आणि बच्चेकंपनी एकदम खूश होईल आणि तू दुसरीकडे जाणारच नाहीस. एक दुपारचे जेवण शांतादुर्गा मंदिराच्या उपाहारगृहातही कर.

फक्त एक प्रेमाचा सल्ला. संध्याकाळच्या जेवणासाठी रेस्टॉरंट लवकर गाठ. दिवाळीमुळे तुडूंब गर्दी असेल. रात्री आठनंतर अर्धा-पाऊण तास वेटिंग असेल. मुले कंटाळून जातील.

सूड's picture

3 Nov 2010 - 4:37 pm | सूड

माका वाटला कोण्या गोंयकरान गोंयावर लेख लिवल्यान !! हैसर बघता त काय निराळाच.
मिया गोंयाक गेल्लंय पाच वर्षाचा असताना, म्हणान काय म्हायती देव्क येव्ची नाय.
पण तुम्का ह्याप्पी जर्नी, वेंजॉय करा.

अविनाशकुलकर्णी's picture

4 Nov 2010 - 12:28 pm | अविनाशकुलकर्णी

गोवा ३६५ ...दिवस मजा मस्ति मासे..बिअर्..धमाल गाव्..कायम चिर तरुण

अशि म्हण आहे..
गोव्याला जाताना मासे बरोबर घेवुन जायचे नाहित
अन सिंगापुर ला जाताना बायको...