"अशोकच" जेव्हा शुंभा सारखे वागतात
तेव्हा लोकशाहीचे चारी स्तंभ
धाडकन कोसळतात.
हे बघुन स्वर्गात नारदही हादरतात
'नारायणं ' 'नारायणं ' म्हणताना
जीभ चावतात
आता नाव घ्यावं असा
देवच उरला नाही म्हणतात !
इतक्यात स्वर्गाच्या दाराजवळ
एक हतबुद्ध झालेला बुद्धपुरुष
सत्य आणि चरखा विकायला
बसलेला त्यांना दिसतो.
" या मुल्यवान वस्तु ,
का विकतो आहेस तु"
नारद विचारतात, त्या बाबाला
तो महात्मा खिन्नपणे म्हणतो
" माझ्या चरख्याचा अर्थ
चर आणि खा असा काढतील
असं वाटलं नव्हतं.
आणि सत्याच्या प्रयोगाचा अर्थ
ते सट्टयाचे प्रयोग असा लावतील
असही वाटलं नव्हतं मला.
पण सचिनच्या ब्याटचीही किंमत
येणार नाही इथे, तुझ्या चरख्याला
नारद त्या माहात्म्याला म्हणाला
"इथे वस्त्रांची गरजच नाही कुणाला
कारण इथे महावीरच येतात रहायला
आणि सत्त्याला तर काहिच मूल्य नाही इथे
कारण असंख्य सत्यवान रहातात इथे
तुला सत्याचं मुल्य तिथेच मिळेल
जिथे ते दुर्मिळ होत चालालं आहे
त्या भुममंडळारील एक मद्य सम्राट
विकत घेतो म्हणे सत्य ,
वाटेल तेवढी किंमत देउन.
इथे क्षुल्लक किंमत मिळेल ,तुझ्या सत्त्याला.
चालेल मला , तो महत्मा म्हणाला
मला फक्त एकच पिस्तुल हवी आहे
त्या नथुराम कडून आणि
धन्यवाद द्यायचे आहेत त्याला
माझा वध केल्या बद्दल.
त्याने मला एकदाच मारलं
त्यावेळी मी "हे राम"
म्हणालो खरा
पण हे हरामखोर मला रोजच मारतात
सहन होत नाही आता मला
मला आता त्या नथुराम कडून त्याची पितुल हवी आहे
हे नथुराम..!
मला पितुल हवी आहे....
हे नथुराssssssssssम...!!!!!
तो महात्मा अलिकडे छाती वरील जखमेवर हात
ठेउन पिस्तुल मागत फिरत असतो म्हणे...वेड्या सारखा
.................................................
मला वाटतं त्याचा अश्वत्धामा झाला असावा ....बहुदा.....!!!
तेवढी
किंमत देउन
कलि
कारण ते मुबलक मिळते इथे"
प्रतिक्रिया
3 Nov 2010 - 1:42 am | विजय गणेश खर्डे
हे राम चा एकदम हे नथुराम.....शेवटि..त्यांना पण हे नथुराम म्हणण्याची वेळ आणुन टाकली ह्या राजकारण्यांनी...
3 Nov 2010 - 1:44 am | विजय गणेश खर्डे
मस्त लिखाण आहे..मस्त आणी मार्मिक...
3 Nov 2010 - 11:49 am | विसोबा खेचर
क्लास..!
तात्या.
3 Nov 2010 - 12:31 pm | अनामिका
निव्वळ अप्रतिम आणि मार्मिक!
3 Nov 2010 - 12:42 pm | भाऊ पाटील
_/\_
3 Nov 2010 - 5:04 pm | गणेशा
एक्दम जबरदस्त
3 Nov 2010 - 9:29 pm | आत्मशून्य
"हे राम"
:D
"हे हरामखोर"
:D
हे नथुराssssssssssम
:D
4 Nov 2010 - 2:19 am | यकु
गोखले साहेब, हे घ्या!
बापू को बताने का नहीं रिव्हॉल्व्हर मैने दिया करके.
उनको बोलो उडा दो सब सालों को~ यूसलेस कहीं के!
तुमची कविता भावलीय म्हणून बापूंना रिव्हॉल्व्हर देतोय~!
4 Nov 2010 - 10:52 am | गांधीवादी
कविता आवडली.
(ह. घ्या. हा प्रतिसाद कवितेसाठी नसून केवळ आशयासाठी आहे.)
बापू कधी भेटले तर त्यांना एक निरोप द्या, कि सध्याच्या परिस्थितीत एका बंदुकीने काहीही होणार नाही.
'ते एक बंदूक घेऊन सगळी घाण साफ करतील' हि अपेक्षा आता ठेवणे हे मी कर्म दरिद्रीपणाचे लक्षण समजतो. बापूंनी 'बाहेरचा' राक्षस संपविला, आता खरी गरज आहे 'आतला' राक्षस शोधून नाहीसा करण्याची.
'बाहेरचा' राक्षस त्याच्या गोऱ्या चमडीवरून लगेच ओळखू येत होता, पण 'आतला' राक्षस चमडीवर आणि चेहऱ्यावर इतके मुखवटे घालतो, की बापू आले तरी आज 'आतला' राक्षस ते ओळखू शकणार नाही. बंदुकीचा काय उपयोग ?
आणि माझ्या माहितीत अजुन तरी 'आतला' राक्षस ओळखू येण्याइतपत मानवाने प्रगती केलेली नाही.
अवांतर : घटनेप्रमाणे बापुना बंदूक घेऊन तिचा वापर करण्याचा अधिकार असेल काय ?
भुममंडळारील एक मद्य सम्राट तरी ठीक आहे, तो काही जे घायचे असेल ते विकत घेतो, पण इथे असे अनेक सम्राट आहेत कि जे सामन्यांच्या हक्काचे सुद्धा ओरबाडून घेतात त्यांचे काय ?
4 Nov 2010 - 11:49 am | यकु
खरंय गांधीवादींचं!
गांधीवाद्यांची संख्या खूप आहे.
एका रिव्हॉल्व्हरनं काही होणार नाही, हे पण असूद्या!
4 Nov 2010 - 6:55 pm | विसोबा खेचर
हे मस्त.. :)
9 Nov 2010 - 11:31 am | फ्रॅक्चर बंड्या
छान कविता आहे ...