आई .. मिटलेला श्वास .. ४ http://www.misalpav.com/node/15170
पार्श्वभुमी : घरामध्ये वावरताना .. घरातील प्रत्येक गोष्टीकडे पाहताना त्या वस्तु ही आपापल्या पद्धतीने आपल्या दु:खात सामील होत आहेत असा भास कवितेतील नायकाला होतो .. एक व्याकुळ मन आई साठी रणकंदन करताना
नयनांची दोन पिल्ले
आसूसले घरटे
मायेच्या छप्पराला
काळजाची झुंबरे
पापण्यांच्या तोरणाला
अबोल आसवांची घुंगरे
हरवलेल्या ह्रदयतरंगावर
सूर ओळखीचे हळवे
अमुर्त स्वप्नशिल्पाला
विचारांची जळमटे
जाळीदार मनचक्षूमध्ये
श्वासांचे बोजड तडफ़डणे
नभपोकळीच्या वाटेवरती
मेघकल्लोळाचे रणकंदन
मुक्त आत्म्याचेही फ़क्त आता
नश्वर शरीरात रुदन
---------- शब्दमेघ
प्रतिक्रिया
3 Nov 2010 - 7:07 pm | पैसा
छान शब्दरचना! ही पूर्ण मालिका छान झाली.