माझ्या वहीवरल्या
अर्ध्यातच वाट हरवलेल्या काही कविता,
कधी कधी भांडण उकरून काढतात माझ्याशी ...
तुझ्यामुळेच आम्ही हरवलो,
आता कळत नाहीये...
जायचे कुठे ? अन थांबायचे कुठे ?
त्यांची समजूत घालण्याकरता मग
मी शोधतो अजून एखादी ओळ ..
अन त्यांना मुक्कामाला पोहोचावायाच्या नादात मात्र ..
मी स्वतःच हरवतो ...
प्रतिक्रिया
2 Nov 2010 - 7:10 pm | गणेशा
थोडक्यात कवीचय भावना स्पष्ट दाखवणारी कविता
2 Nov 2010 - 8:44 pm | मुक्तसुनीत
कविता आवडली. स्वतःच्याच निर्मितीप्रक्रियेबद्दलचे विचार मांडणारी - सेल्फ रिफ्लेक्टीव्ह.
3 Nov 2010 - 12:09 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
3 Nov 2010 - 1:01 am | प्राजु
येस्स! अगदी हेच!
3 Nov 2010 - 12:08 am | अथांग
शब्दांची बोटे धरुन बर्याचदा कविता मुक्कामी पोहोचते, परंतु या प्रक्रियेमधे लिहीता लिहीता आपणच कुठेतरी हरवून जातो कधी कधी. कविता खूप आवडली आणि भावनाही समजल्या !
9 Nov 2010 - 11:13 am | फ्रॅक्चर बंड्या
धन्यवाद मित्रांनो...