शंकरपाळ्या !
'शक्कर पारे' हे याच खर नॉर्थ इंडियन नाव.
बनवायची अगदी सोपी अन मस्त रेसिपी !
१ वाटी पाणी
१ वाटी साखर
१ वाटी तूप.
हे सार एकत्र करून चांगल खळ खळ उकळवा. अन थंड करायला ठेवा.
.
उरलेली सामग्री :- तळण्या साठी तेल, अन मैदा.
एक दोन तिन तासान चांगल थंड झाल्यावर यात मिसळेल तेव्हढा मैदा घालून साधारण मऊसर पीठ तयार करा.
थोड्याश्या जाडसर पाती लाटून ( अजिबात वरून पीठ लावू नका. गरजच नाही पडत ) चीरण्याने कापून तेलात साधारण गुलाबी रंगावर तळणे .
हमखास यशस्वी रेसिपी !!
( काढलेला फोटो पिकासावर कुठेच दिसत नाही आहे. सो, सॉरी !)
प्रतिक्रिया
31 Oct 2010 - 10:17 pm | मदनबाण
माझा आवडता गोड पदार्थ... लहानपणी आई शंकरपाळे करताना ते कातण्याचे काम मी अगदी आनंदाने करायचो... :)
(कडबोळी प्रेमी)
2 Nov 2010 - 11:21 pm | मुक्तसुनीत
हेच म्हणतो.
1 Nov 2010 - 3:54 am | रेवती
आहाहा! मस्त होतात ही समप्रमाणाची शंकरपाळी!
आजकाल तेवढी मस्त होत नसली तरी मी कणिक घालून करते.
पण खरी शंकरपाळी ही मैद्याची आणि बरोबरीनं घातलेल्या मोहनाचीच!
1 Nov 2010 - 4:50 am | शुचि
एक गोड शंकरपाळे असतात आनि एक खारे. मला काहीही चालेल. पण द्या.
1 Nov 2010 - 5:49 pm | स्पंदना
धन्यवाद रेवती , शुची अन मदनबाण.
@ मदनबाण, माझ्या मुलान पण हे कापुन ठेवुन माझ काम वाढवुन ठेवल! लाटले परत.
2 Nov 2010 - 11:24 am | विसोबा खेचर
फोटो?
2 Nov 2010 - 12:38 pm | ५० फक्त
मला मात्र मोठि मोठि चॉकोनी आणि पोकळ अशीच शंकरपाळी आवडतात, भरिव आणि चपट्या झालेल्या गोट्यांसारखी शंकरपाळी मला अजिबात आवडत नाहीत. हे आमच्या घरी दिवाळिच्या फराळाच्या वेळंचं होणार्या भांडणाचं कारण.
माझि बायको जाड साठी पिठ भिजवते आणि मला पातळ पोकळ शंकरपाळ्या करायला सांगते, मला त्या येत नाहीत आणि मग मला चिडवते असं नसतं असं नसतं म्हणुन - ह्यां$$$$$$$$$$$$$$$ माझे भोकाड, मग बायकोचं समजावणं आणि मला हव्या तश्या शंकरपाळ्या करणं. ( पाडव्याच्या हव्या त्या भेटीच्या बदल्यात)( म्हणुन लग्नाला sleeping with the ...) की काय ते म्हणतात.
बाकी आज लवकर घरी जाउन बायकोच्या आधी या क्रुति नुसार शंकर पाळी करुन पाहतो आणि मग उद्या सांगतो.
हर्षद
2 Nov 2010 - 12:41 pm | मितान
अपर्णा छानंय ही कृती. मी यात पाण्याऐवजी दूध आणि अर्धा मैदा + अर्धी कणीक घालते. कालच केले शंकरपाळे. बाकी या प्रमाणात केलेले शंकरपाळे चुकण्याची बिघडण्याची शक्यता जवळजवळ शून्य आहे :)
2 Nov 2010 - 1:33 pm | परिकथेतील राजकुमार
फोटु न्हाय प्रतिक्रीया न्हाय !
2 Nov 2010 - 5:56 pm | सुनील
तिखट-मीठाच्या शंकरपाळे करायचे असतील तर, साखरेऐवजी मीठ घालावे काय? की अजून काही बदल करावा लागेल?
2 Nov 2010 - 6:49 pm | स्वाती दिनेश
अपर्णा, शंकरपाळे छानच!
माझी कृती थोडी वेगळी आहे .
सुनील भाऊ खारे शंकरपाळे हे पहा.
स्वाती
2 Nov 2010 - 7:06 pm | सुनील
खार्या शंकरपाळ्याच्या पाकृबद्दल धन्यवाद!
आता रव्याचे आणि बेसनाचे लाडू व गोड आणि खारे शंकरपाळे हा फराळाचा (स्वावलंबी) मेनू ठरला! बाकी हळदीराम आहेच मदतीला!
6 Nov 2010 - 1:26 pm | निवेदिता-ताई
स्वाती--खारे शंकरपाळे कॄती दिसत नाहीय
7 Nov 2010 - 3:23 pm | पर्नल नेने मराठे
माझ्या एका परदेशिय मत्रिणीला हि क्रुती सान्ग्तेय कारण मला लोकांक्डुन आलेला फराळ मी ओफिसात खायला आणला तर हिला शंकरपाळे खुप आवडलेत. हिला तुप माहिती नाहिये. मी तिला खुप एक्स्लप्लेन केल्यावर हिने निश्कर्श बटर असा काढलाय. तर हिला तुपाऐवजी बटर घालुन करता येतिल ना?
9 Nov 2010 - 8:00 am | स्पंदना
चु चु तुपाला क्लॅरीफाइड बटर म्हणतात.
अदर्वाइज हल्ली इव्हन ऑस्ट्रेलिअन घी खातो आम्ही, तेन्व्हा घी सांग.
9 Nov 2010 - 10:35 am | पर्नल नेने मराठे
क्लॅरीफाइड बटर कळले तिला.
शुक्र्वारी करेन म्हणतेय.
9 Nov 2010 - 8:00 am | अविनाशकुलकर्णी
शंकर पाळे कडक व कुट्कुटीत .....कुडुम कुडुम....कसे करतात? .
9 Nov 2010 - 11:00 pm | रश्मि दाते
aparna tai मि केले होते तुम्च्या रेसेपीनुसार मस्त जमले होते धन्यवाद