आमची प्रेरणा चित्त यांची अप्रतिम गझल वाटले बरे किती
भेटतात रोज बटबटीत चेहरे किती!
आणतात आव पण उगाच लाजरे किती!
मी अजून चाचपून चेहर्यास पाहतो
ओरबाडलेस काल पाडले चरे किती?
प्रश्न हा विचारतात माकडास माकडे-
बांधतात माणसे उगाच ही घरे किती?
टंच पोर राहते घरी म्हणे समोरच्या
आणि सदनिके पुढे श्वान चावरे किती!
ज्या क्षणास आपले ऋणानुबंध संपले
वाटले मला झकास! वाटले बरे किती!!
सांगतेस आजकाल चालले बरे तुझे!
भरभरून बोललीस, यातले खरे किती?
चालवेल ना तुला अजून चार पावले
लागते विडी मुळेच आज धाप रे किती?
ढोसशील मैफलीत खूप आज, पण उद्या,
उतरण्यास सरबते नि मागशील रे किती?
पाडलेस तू मला जगासमोर नागडे
काढशील "केशवा" अजून लक्तरे किती?
प्रतिक्रिया
20 Apr 2008 - 3:06 pm | धमाल मुलगा
तरी मी म्हणालोच होतो, गज़लांचा एव्हढा कार्यक्रम झाला, केसुशेठना घाऊक भावात कच्चा माल मिळाला...
आता सप्तरंगावर नक्कीच सप्तरंगी विडंबने येणार ! शनिवारी दुपारी हाच विषय निघाल्यावर अगदी शहाजोगपणे नाही-नाही म्हणताना केसुशेठच्या चमकणार्या डोळ्यांनी चुगली केलीच होती :-))))))))))))))))))))))
नेहमीप्रमाणेच जबरान् !!!
20 Apr 2008 - 3:10 pm | अविनाश ओगले
टंच पोर राहते घरी म्हणे समोरच्या
आणि सदनिके पुढे श्वान चावरे किती!
ढोसशील मैफलीत खूप आज, पण उद्या,
उतरण्यास सरबते नि मागशील रे किती?
या ओळी विशेष आवडल्या...
20 Apr 2008 - 4:47 pm | स्वाती राजेश
फारच छान केले आहे.
टंच पोर राहते घरी म्हणे समोरच्या
आणि सदनिके पुढे श्वान चावरे किती!
सांगतेस आजकाल चालले बरे तुझे!
भरभरून बोललीस, यातले खरे किती?
या ओळी आवडल्या.
20 Apr 2008 - 6:14 pm | ऋषिकेश
वा वा!! मुळ गझला वाचल्यावर वाट पाहतच होतो.. मुळ गझले इतकेच हरेक शेर खणखणीत आहेत
नेहेमीप्रमाणे झ... का... स...!!!! :)
मनातल्या मनातः 'तिथे' अजून बराच कच्चा माल आहे.. मिपावर लवकरच हसण्याचा गडगडाट होणारसे दिसते :))
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
20 Apr 2008 - 6:26 pm | नीलकांत
टंच पोर राहते घरी म्हणे समोरच्या
आणि सदनिके पुढे श्वान चावरे किती!
ढोसशील मैफलीत खूप आज, पण उद्या,
उतरण्यास सरबते नि मागशील रे किती?
हे मस्तच !
नीलकांत
20 Apr 2008 - 8:36 pm | विद्याधर३१
टंच पोर राहते घरी म्हणे समोरच्या
आणि सदनिके पुढे श्वान चावरे किती!
ज्या क्षणास आपले ऋणानुबंध संपले
वाटले मला झकास! वाटले बरे किती!!
आवडले....
विद्याधर
20 Apr 2008 - 9:59 pm | मदनबाण
टंच पोर राहते घरी म्हणे समोरच्या
आणि सदनिके पुढे श्वान चावरे किती!
व्वा उस्ताद व्वा !!!!!
पाडलेस तू मला जगासमोर नागडे
काढशील "केशवा" अजून लक्तरे किती?
मस्तच.....
(वरील वाचुन धोतराचा कासोटा चेक करणारा.....)
मदनबाण
21 Apr 2008 - 6:09 am | चतुरंग
प्रश्न हा विचारतात माकडास माकडे-
बांधतात माणसे उगाच ही घरे किती?
टंच पोर राहते घरी म्हणे समोरच्या
आणि सदनिके पुढे श्वान चावरे किती!
हे क्लासच!
मुशायरा झाल्यापासून वाट बघत होतो, ती प्रतीक्षा संपली!
(अवांतर - चित्तची मूळ गज़लही सुरेखच आहे!)
चतुरंग
21 Apr 2008 - 7:30 am | विसोबा खेचर
टंच पोर राहते घरी म्हणे समोरच्या
आणि सदनिके पुढे श्वान चावरे किती!
सांगतेस आजकाल चालले बरे तुझे!
भरभरून बोललीस, यातले खरे किती?
हे सर्वात बेष्ट रे केशवा... :)
झकास विडंबन....
तात्या.
21 Apr 2008 - 4:02 pm | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार.
21 Apr 2008 - 9:09 pm | वरदा
नेहेमीप्रमाणे मस्तच....
21 Apr 2008 - 10:19 pm | इनोबा म्हणे
केशवा,अरे किती दिवस वाट पहायला लावलीस रे!असो.
झकास विडंबन हे.वे.सां. न. ल.
टंच पोर राहते घरी म्हणे समोरच्या
आणि सदनिके पुढे श्वान चावरे किती!
मस्तच रे...
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
25 Apr 2008 - 10:01 am | सत्या
ढोसशील मैफलीत खूप आज, पण उद्या,
उतरण्यास सरबते नि मागशील रे किती?
खतरनाक्.........रे बाबा.