नारायणन कृष्णन

विकास's picture
विकास in काथ्याकूट
29 Oct 2010 - 4:32 pm
गाभा: 

नारायणन कृष्णन या व्य्क्तीबद्दल बर्‍याच जणांनी कदाचीत ऐकलेही असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी थोडक्यात माहिती आणि सीएनएनवर जाऊन त्याला मत देण्याचे आवाहन.

डिसक्लेमरः ही माहिती खूप प्रेरणादायी असल्याने देत आहे, तसेच केवळ सीएनएनच्या माहीतीवर आधारीतच देत आहे. जर काही वेगळीच माहिती समजल्यास तशी देखील अवश्य सांगा.

मदुराईला रहाणार्‍या नारायणन कृष्णन हा एक पंचतारांकीत हॉटेलात काम करणारा शेफ/आचारी. त्याला परदेशी हॉटेलात जाण्याचा योग आला होता आणि जाणारही होता. मात्र त्या आधीच्या एकाच आठवड्यात देवळात जात असताना, त्याला रस्त्यावर एका पुलाखाली, एक भुकेला पण (वर्णन करू इच्छित नाही असा) असहाय्य जीव दिसला आणि अस्वस्थता आली. त्याने स्वतःचा नोकरी धंदा सोडला आणि २००३ मधे "अक्षय ट्रस्ट" नावाची संस्था काढली आणि त्या संस्थे अंतर्गत हा दरोज पहाटे चार वाजता उठून १२५ मैलांच्या परीसरातील सर्व गोरगरीबांना दररोज तिनदा खायला घालतो. आजता गायत त्याच्या करवी १२ लाख जेवणे घातली गेली आहेत. मदुराईला टेंपल टाऊन म्हणतात.. मात्र याने "नसे राऊळी वा नसे मंदीरी, जिथे राबती हात तेथे हरी" हे खरे करून दाखवले.

सीएनएन दरवर्षी अशा अप्रसिद्ध पण असामान्य व्यक्तींच्या - हिरोंच्या शोधात असते. त्यातून ते लोकांच्या मतदानाने शॉर्टलिस्ट करते. त्यात नारायणन सिलेक्ट झाला आहे. त्याला आता तुमच्या माझ्या मताची गरज आहे ज्यातून तो निवडला गेला तर त्याच्या प्रकल्पाला आर्थिक मदत होऊ शकते.

त्याची माहीती येथे पहा आणि येथेत्याला जरूर मत देऊन या.

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

29 Oct 2010 - 4:39 pm | यशोधरा

सही आहे...

Dhananjay Borgaonkar's picture

29 Oct 2010 - 5:04 pm | Dhananjay Borgaonkar

हो खुप प्रेरणादाई आहे ही माहिती आजच द हिंदु वर वाचली. २९ वर्षाचा आहे फक्त हा.

विसोबा खेचर's picture

29 Oct 2010 - 5:45 pm | विसोबा खेचर

सलाम..!

शुचि's picture

29 Oct 2010 - 9:10 pm | शुचि

थोर आणि पुण्यवान आहे ही व्यक्ती.

सुनील's picture

29 Oct 2010 - 9:39 pm | सुनील

छान माहिती.

मत दिले आहे.

मस्तानी's picture

29 Oct 2010 - 9:45 pm | मस्तानी

कृष्णन ला मत दिलेच पण त्याचं बरोबरीने अनुराधा कोईराला यांना देखील !

पिवळा डांबिस's picture

29 Oct 2010 - 11:51 pm | पिवळा डांबिस

जरूर मत देऊ कृष्णन ला!
चांगला धागा, विधायक उपक्रम!
धन्यवाद विकास!!

गांधीवादी's picture

30 Oct 2010 - 6:26 am | गांधीवादी

मत दिले आहे.
सोबत अनुराधा कोईराला यांनाही.

CNN HERO : Narayanan Krishnan , Once a rising star, chef now feeds hungry
" alt="" />

CNN HERO : Anuradha Koirala is fighting to prevent the trafficking and sexual exploitation of Nepal's women and girls.
" alt="" />

हे खरे देव, हा खरा धर्म.

या व्यक्तीचे कार्य कौतुकास्पद आहे. नक्की वोट करेन. नारायणाला सलाम.

पण भिकारी/गरीब यांना फुकट आयतं खायला मिळालं की मग त्यांना ती सवय जडते, आजसुद्धा कित्येक भिकार्‍यांना आपन पोसतो आहोत तेही विनाकारण.

काही दिवसांपुर्वी एका दुकानात एक व्यक्ती पाहिली. दोन्ही हात फक्त मनगटांपर्यंतच होते. तरीही हा व्यक्ती दुकानातली सगळी कामे करीत होता, बोटं नसतानाही किल्लीने कुलुप उघडुन दाखवले पट्ठ्याने. त्याला कुणाचीही मदत अथवा सिंपथी नको होती.

विकास's picture

31 Oct 2010 - 6:47 pm | विकास

पण भिकारी/गरीब यांना फुकट आयतं खायला मिळालं की मग त्यांना ती सवय जडते, आजसुद्धा कित्येक भिकार्‍यांना आपन पोसतो आहोत तेही विनाकारण.

पूर्ण सहमत. तुर्तास इतकेच. यावर नंतर कधीतरी चर्चा करेन...

यांच्या बद्धल टिव्हीवर बातमी पाहिली होती...त्यांना मत दिले आहे.
ही माहिती इथे दिल्या बद्धल धन्स... :)

सहज's picture

31 Oct 2010 - 3:00 pm | सहज

मत दिले आहे.

धन्यवाद विकासराव.