नारायणन कृष्णन
नारायणन कृष्णन या व्य्क्तीबद्दल बर्याच जणांनी कदाचीत ऐकलेही असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी थोडक्यात माहिती आणि सीएनएनवर जाऊन त्याला मत देण्याचे आवाहन.
डिसक्लेमरः ही माहिती खूप प्रेरणादायी असल्याने देत आहे, तसेच केवळ सीएनएनच्या माहीतीवर आधारीतच देत आहे. जर काही वेगळीच माहिती समजल्यास तशी देखील अवश्य सांगा.
मदुराईला रहाणार्या नारायणन कृष्णन हा एक पंचतारांकीत हॉटेलात काम करणारा शेफ/आचारी. त्याला परदेशी हॉटेलात जाण्याचा योग आला होता आणि जाणारही होता. मात्र त्या आधीच्या एकाच आठवड्यात देवळात जात असताना, त्याला रस्त्यावर एका पुलाखाली, एक भुकेला पण (वर्णन करू इच्छित नाही असा) असहाय्य जीव दिसला आणि अस्वस्थता आली. त्याने स्वतःचा नोकरी धंदा सोडला आणि २००३ मधे "अक्षय ट्रस्ट" नावाची संस्था काढली आणि त्या संस्थे अंतर्गत हा दरोज पहाटे चार वाजता उठून १२५ मैलांच्या परीसरातील सर्व गोरगरीबांना दररोज तिनदा खायला घालतो. आजता गायत त्याच्या करवी १२ लाख जेवणे घातली गेली आहेत. मदुराईला टेंपल टाऊन म्हणतात.. मात्र याने "नसे राऊळी वा नसे मंदीरी, जिथे राबती हात तेथे हरी" हे खरे करून दाखवले.
सीएनएन दरवर्षी अशा अप्रसिद्ध पण असामान्य व्यक्तींच्या - हिरोंच्या शोधात असते. त्यातून ते लोकांच्या मतदानाने शॉर्टलिस्ट करते. त्यात नारायणन सिलेक्ट झाला आहे. त्याला आता तुमच्या माझ्या मताची गरज आहे ज्यातून तो निवडला गेला तर त्याच्या प्रकल्पाला आर्थिक मदत होऊ शकते.
त्याची माहीती येथे पहा आणि येथेत्याला जरूर मत देऊन या.

प्रतिक्रिया
सही आहे...
हो खुप प्रेरणादाई आहे ही
सलाम..!
अन्नदाता सुखी भव|
छान
कृष्णन ला मत दिलेच
जरूर! जरूर!!
मत दिले आहे. सोबत अनुराधा
या व्यक्तीचे कार्य कौतुकास्पद
सहमत
यांच्या बद्धल टिव्हीवर बातमी
उत्तम माहीती