दंव

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जे न देखे रवी...
19 Apr 2008 - 11:22 pm

दंव

ग्रीष्मातली पानगळ बघून
पहाटे पहाटे देव रडला

त्याचा आसवांचा सडा
पाना-फुलांवर अलगद् पडला

माणूस.....इतका भावनाशून्य
कसा कांय देवाकडून घडला?

अश्रू ओळखेनात देवाचे?
म्हणे केव्ह्ढा हा"दंव" पडला !

--------------------------------------------------
उदय गंगाधर सप्रे-ठाणे
कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com

आणि

कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/

चारोळ्या

प्रतिक्रिया

अभिज्ञ's picture

20 Apr 2008 - 12:54 am | अभिज्ञ

कविता आवडलि............

माणूस.....इतका भावनाशून्य
कसा कांय देवाकडून घडला?

जास्त भावले.

अबब.

प्राजु's picture

20 Apr 2008 - 9:47 am | प्राजु

ग्रीष्मातली पानगळ बघून
पहाटे पहाटे देव रडला

त्याचा आसवांचा सडा
पाना-फुलांवर अलगद् पडला

इथे ग्रिष्मात पानगळ बघून... यानंतर पानाफुलांवर सडा पडणे हे विरोधाभास वाटते. त्या ऐवजी जर..

त्याच्या आसवांचा सडा
गवताच्या पात्यांवर अलगद् पडला..

हे कसे वाटते??

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

उदय सप्रे's picture

20 Apr 2008 - 10:30 am | उदय सप्रे

प्राजु,

तुमची सूचना एका अर्थी योग्यच आहे.पण (देवकी पंडित यांची क्षमा मागून !).....

ग्रीष्मात तुमच्या नावाचीच फुले - प्राजक्ताची फुले कशी सुकत सुकत जातात , पाने पण हळू हळू कमी कमी होत जातात - हा "क्षयरोग" म्हणजे त्या सजीव झाडाचे "निश्चित् मरण" देवाला कळून तो रडला अशी यामागची संकल्पना होती आणि ती तुम्ही स्वतः छान कविता करता त्यामुळे तुम्हाला नकीच समजेल हा विश्वास आहे.

तुमच्या ब्लॉग वरील कविता वाचणे चालू आहे , एक अतिशय सुंदर आणि तरल अनुभव ! अभिनंदन ! माझ्या ब्लॉग्ज वरील तुमच्या अभिप्रायांबध्दल आभार !

प्राजु's picture

20 Apr 2008 - 10:33 am | प्राजु

तुमची भावना अतिशय सुंदर आहे. पटले तुमचे म्हणणे..

मी ही तुमचे ब्लॉज्ग वाचते आहे. खूप छान वाटते आहे.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वरदा's picture

26 Apr 2008 - 12:22 am | वरदा

मी वाचली नाही आधी..
मस्त कविता आहे...माणूस.....इतका भावनाशून्य
कसा कांय देवाकडून घडला?

ह्म्म खरय्...