आई..मिटलेला श्वास - ३

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
26 Oct 2010 - 1:26 pm

आई..मिटलेला श्वास - २ ... http://www.misalpav.com/node/15014

पार्श्वभुमी: मळकट पायवाट .. गावाला दूर गेल्यावर ही तेथील प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्या आई बद्दलच्या दाटुन आलेल्या भावनांच्या या पारंब्या

ते वडाचे झाड वाळके
दोरा बोहताली करकच्च
स्वप्नझुल्यांच्या पारंब्या ओस
भावना दाटलेल्या भरगच्च

आकाशात किंचाळते वीज
सुनसान मी भयभीत
स्मरणात तुझीया संपते
खोल हुंदक्यांची रात

रस्त्यात उभे वारुळ
मनाचे उडलेले डाग
स्वप्नपारंब्या खाली
निजते माझे विचारगाव

----- शब्दमेघ

करुणकविता

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

27 Oct 2010 - 8:59 am | पाषाणभेद

अजून काही कडवी पाहिजे होती. बाकी मस्तच.

प्रकाश१११'s picture

26 Nov 2010 - 11:40 am | प्रकाश१११

मस्त लय जमलीय.! आईच्या कविता!! .खूप छान!!! .