गाभा:
मिपाकरांनो मला १ आठवड्यापासुन खुप जोराचा खोकला येत आहे. खुप सारे टॉनिक्स आणि काढे घेऊन पाहिले परन्तु काहि फरक पडत नाही.
आपल्याकडे जर काहि उपाय असतील तर कृपया सांगावे.
मी खोकल्याने खुप हैराण आहे एक शब्द धड बोलु शकत नाहिये . तेंव्हा आपण मला मदत केल्यास मी आपला आजन्म ऋणी राहिन.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
25 Oct 2010 - 7:52 pm | अवलिया
आपण मिपावर सल्ला विचारण्यापेक्षा एखादा चांगला डॉक्टर अथवा वैद्य अथवा हकीम गाठावा !
25 Oct 2010 - 7:55 pm | छोटा डॉन
अवलियाशी सहमत आहे.
मिपा ह्या मंचाचा उपयोग जरा अवधान ठेऊन करावा ही विनंती.
सर्वांनीच असे केल्यास मी सर्वांचाच खरोखर आजन्म रुणी राहिन :)
- छोटा डॉन
25 Oct 2010 - 8:21 pm | Nile
आमचे ऋण फेडा मग आता लवकर. ;-)
26 Oct 2010 - 5:52 pm | मेघवेडा
तुमचे आजन्म ऋणी राहणार असल्याने परतफेड वगैरे चिल्लर गोष्टी जन्म संपल्यावर. आता लगेच डान्याला संपवायला धावू नका! :D
25 Oct 2010 - 7:56 pm | शुचि
हळद्-दूध घेणे.
हळद-गूळाची गोळी घेणे
नक्की आराम पडेल
25 Oct 2010 - 8:24 pm | गांधीवादी
हळद्-दूध(साखर न घालता)
नक्की आराम पडेल.
25 Oct 2010 - 8:00 pm | धमाल मुलगा
व्हायरल इन्फेक्शन असेल. रोगार पिऊन बघा. सगळे किडे मरतात.
25 Oct 2010 - 8:31 pm | नगरीनिरंजन
ह्याला लागलाय खोकला मधाचं बोट कुणी चाटवा..
25 Oct 2010 - 8:35 pm | धमाल मुलगा
निर्या, एटले हायकल्लास रे!
25 Oct 2010 - 9:28 pm | ईन्टरफेल
डॉ़क्टर नका? जाऊ
पकिस्तानात जा !
आनि
खोकल्याईला
नारळ
फोड....................
बघ ...........
तुझा ,,,,,,,,,,,
खोकला............... बरा
नाय ................
झाला ..............
तर,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
मि,////////////////////////////////
मन मोनहनाशि /.............
बोलतो/,,/......................,/.,////,
25 Oct 2010 - 11:14 pm | विजुभाऊ
उई उई करत बोलणे कमी करा
25 Oct 2010 - 11:18 pm | इंटरनेटस्नेही
अडीच क्वार्टर रम कच्ची मारुन पडा निवांत. सर्दी पण जाईल आणि आम्हीही जरा सुटकेचा निश्वास टाकू!
(नशाबाज पण हुशार) इंट्या.
26 Oct 2010 - 6:53 am | शरद
एकास एकास एक या प्रमाणात मिसळून लहान गोळ्या करा. तोंडात गोळी घेऊन हळुहळु विरघळू द्या. सर्व प्रकारचा खोकला जातो.
शरद
26 Oct 2010 - 7:54 am | नेत्रेश
सद्दम हुसेन,
नया नौ दिन, पुराना सौ दिन|
खाँसिंके लिये तो बस, ग्लायकोडिन, ग्लायकोडिन |
- मुद्दाम हसेन
26 Oct 2010 - 9:12 am | सद्दाम हुसैन
मिपाकरांच्या मोलाच्या सल्ल्याबद्दल मी खुप आभारी आहे. ग्लायकोडिन , डी कोल्ड न काय काय काढे काय ट्राय नाही केलं म्हणुन सांगु ? पण फरक पडेल तर शप्पथ !
आणि दारु पिऊ शकत नाही अम्मी जान ला तसा वादा केला आहे की अजुन एक महिना तरी दारु पिणार नाहीये म्हणुन. न्यु इयरला तर दारुच्या सिंधु वाहातील पण :)
मधाचे चाटण ट्राय करतो आज . सगळ्यांचे धन्यवाद.
विजुभाऊ , आमचा उई उई एवढा कमी झाला तरी तुम्हाला कसा दिसला नाही ? गणपा तर आता काउंट सुद्धा करु शकतात.
26 Oct 2010 - 5:43 pm | मितभाषी
श्री सद्दाम,
स्वाईन्फ्लू तपासुन घ्या. लै डेन्जर ताप. लवकर तपासा नाहीतर कार्यक्रम व्हायचा तुमचा.
27 Oct 2010 - 4:08 pm | अनुराग
खोकत जा.
21 Mar 2017 - 8:27 am | औरंगजेब
टिबी चाचणी करा. २१ दिवस झाले असतील तर.