आई..मिटलेला श्वास -१ http://www.misalpav.com/node/14964
पार्श्वभुमी: कातरवेळी अंधाराकडे झुकलेले नभ आणी त्या वेळेस आठवणींच्या झोक्यावर आसवांची शब्दांध रात्र श्वासधागे कशे उसवत आहे हे वर्णन
तळ्याचे नीर दर्पण | विखुरले नभांकण |
वाळलेले नक्षीपर्ण | तरंगीत ||
ढळलेली सांजसंध्या | निजलेले सूर्यपक्षी |
स्वप्नफ़ुले जागलेली | सुगंधीत ||
धरणीची ग्लान झोप | तार्यांचे सूरेल गीत |
उसवले श्वासधागे | अंतरात ||
छतावर रातवैरी | तेवलेला ह्रदयदीप |
शब्दांध झाली आसवे | आठवात ||
----- शब्दमेघ
प्रतिक्रिया
20 Oct 2010 - 6:34 pm | पैसा
आणि भावपूर्ण शब्दयोजना!
26 Nov 2010 - 1:37 pm | प्रकाश१११
ढळलेली सांजसंध्या | निजलेले सूर्यपक्षी |
स्वप्नफ़ुले जागलेली | सुगंधीत |
छानच लिहिले आहे .
नंतरच्या कवितेपेक्षा थोडी निराळी वाटली .
आवडली !!
26 Nov 2010 - 2:50 pm | गणेशा
हो वेगळी आहे ..
प्रत्येक कडव्यातील पहिल्या ३ ओळीमध्ये ओवी प्रमाणे ८ अक्षरे आहेत मात्र शेवट अभंगाच्या लास्टच्या अपुर्ण ओळीप्रमाणे (साडेतीन ओळींचे अभंग) केला आहे