दुचाकीवर चारपायी

सुत्रधार's picture
सुत्रधार in कलादालन
19 Oct 2010 - 12:03 pm

दसर्‍याला दुचाकीवरुन जरा बाहेर पडलो आणि एक अविस्मरणिय द्रुष्य पहिल.

2V4

छायाचित्रण

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

19 Oct 2010 - 12:06 pm | ऋषिकेश

:)

परिकथेतील राजकुमार's picture

19 Oct 2010 - 12:15 pm | परिकथेतील राजकुमार

ह्यात अविस्मरणिय काय आहे ?

आंतरजालावर अशी चित्रे शेकड्यानी उपलब्ध आहेत.

दुचाकीमालक आणि त्याचा मित्र - गप्पा बर्राच वेळ चालु होत्या.

सहज's picture

19 Oct 2010 - 12:41 pm | सहज

१) ट्र्फीक तुरळक आहे,
२) दुचाकी वाहनचालक एकाच व योग्य रेषेत जात आहेत
३) रस्त्यावर खड्डे नाहीत

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Oct 2010 - 12:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

४) ड्रेनेजेच्या खड्ड्यावर (मॅनहोलवर) झाकणंही आहेत.
५) रस्त्यावर दिशादर्शक फलक आहे.

सहज's picture

19 Oct 2010 - 1:01 pm | सहज

सुत्रधार एकदा शहराचे नावही सांगून टाकाच! एक म्हण म्हणायची हुक्की आली आहे!

नावातकायआहे's picture

19 Oct 2010 - 1:07 pm | नावातकायआहे

आयला बुलढाणा त नाय?

म्हणून टाका. :)

सहज's picture

19 Oct 2010 - 3:25 pm | सहज

पुणे तिथे काय उणे!

उगाच पुण्यात गर्दी, रस्त्यावर खड्डे अश्या बोंबा मारायला लोकांना आनंद होतो.

अविस्मरणीय पुणे!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Oct 2010 - 5:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आहे खरं!

एकाच बाईकवर दोन मोठे, दोन पोरं आणि एक बोकड एवढा ऐवज विद्यापीठाच्या रस्त्यांवरून जाताना पाहिला आणि पुणं अविस्मरणीय असण्याची खात्री पटली.

सहज's picture

19 Oct 2010 - 5:32 pm | सहज

अगदी अगदी त्या बाईकची 'एम एच - ०४' पाटी पाहीली होती! अजुन काय काय अदभूत बघायला मिळणार पुणेकरांना कोणास ठावूक!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Oct 2010 - 5:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

एवढा अद्भुत प्रकार बाईकवर दिसत असताना नंबरप्लेट बघण्याचं सुचलं नाही! कदाचित MH-२० सुद्धा असेल.

सहज's picture

19 Oct 2010 - 5:44 pm | सहज

तुमच्याकडून असेच कांहीं तरी वाचायला मिळेल अशी कुशंका होतीच. ती खरी ठरली हे पाहून अंमळ हळवा झालो.

ऋषिकेश's picture

19 Oct 2010 - 5:55 pm | ऋषिकेश

आत नवी विटी नवं राज्य साहेब.. ..अजूनही "अंमळ हळवे" होता?

छ्या! डोळे पाणावले हे वाचून

परिकथेतील राजकुमार's picture

19 Oct 2010 - 12:37 pm | परिकथेतील राजकुमार

त्या भुभुचे नाव बहुदा तुंग्रुस असावे.

ऋषिकेश's picture

19 Oct 2010 - 5:44 pm | ऋषिकेश

पुणेच आहे.. दिशादर्शक पाटीच्या बाजुच्या पाटीवरचे घोडीवरचे महाराज आणि त्यावर पहिल्या ओळीतील दोन अक्षरी शब्द यावरून पुणे असल्याची पूर्ण शक्यता आहे

मराठमोळा's picture

20 Oct 2010 - 4:03 am | मराठमोळा

>>पुणेच आहे

सहमत आहे.
फोटुत दिसणारी समोरची पीएमटी, दत्तवाडी, दांडेकर पुल, आणि राजेंद्रनगरला रस्ता दाखवणारी पाटी (पाटीचा पॅटर्न पण पुणे महापालिकेचाच), आणि डिझेलवर चालणारी सहा आसनी रिक्शा.
दुचाकीचा नंबरः एम एच १२ - एफ जी - ९७९९
शेजारच्या दुचाकीचा नंबरः एम एच १२- सीडी-४१४९
डाव्या बाजुला कुदळे आणि पाटील बिल्डर्सची बिल्डींग.

सिंहगड रोडच्या आसपास किंवा मित्रमंडळ कॉलनीच्याअ आसपास असायला हवा हा रस्ता.
:)

शिल्पा ब's picture

19 Oct 2010 - 11:28 pm | शिल्पा ब

आईगं !!! त्या कुत्र्याच्या (फटफटीवरचा मागील प्राणी) सुरक्षेचं काय? भसकन ब्रेक मारला कि काय होईल त्या बिचार्याचं? काय लोक तरी !!!

ऋषिकेश's picture

19 Oct 2010 - 11:32 pm | ऋषिकेश

कुत्रा त्या चालकाचा आहे असे गृहित धरता येईल का? दुचाकी चालवताना मागे अचानक कुत्रा येऊन उभा राहिला (त्यालाही चालायचा कंटाळा आला असेल) तर त्या चालकाचे काय होईल बिचार्याचं? काय कुत्रे तरी!!!

शिल्पा ब's picture

19 Oct 2010 - 11:34 pm | शिल्पा ब

तुम्हाला काय वाटेल ते गृहीत धरा हो...नाही कोण म्हणतंय?

माजगावकर's picture

21 Oct 2010 - 9:59 pm | माजगावकर

साधारण माणिकबागेचा भाग असावा..

सुत्रधार मित्रा, घरची आठवण करुन दिलीस! मी बिग-बझार पाशी रहातो.. :)

पक्या's picture

24 Oct 2010 - 1:01 am | पक्या

हा सिंहगड रस्ता आहे.

ब्रिटिश टिंग्या's picture

24 Oct 2010 - 10:00 pm | ब्रिटिश टिंग्या

शिंगडरोडच्या इंडिनॉयल पंपासमोरचा रस्ता आहे!

आज काल इंडीका गाडीमधून गाय भरून नेतात... मग त्या हिशोबात दुचाकीवर कुत्राच येणार ना.. ! ;)

यकु's picture

7 Nov 2010 - 1:07 am | यकु

पहावं ते नवलच!
मंगेश तेंडूलकरांचं व्यंगचित्र ष्टाईल दिसतंय अगदी.

मागे एका दुचाकीस्वार आईने लहानगीला गाडीवर उलटं (तिच्याकडं पाठ करून ) बसवलं होतं आणि रस्त्यावरच्या खड्यांमुळे ती एवढीशी मुलगी सतत अंगात आल्यासारखी हलत होती.. आता पडते की मग पडते असं झालं होतं...
त्यांना चालत्या गाडीवरच गाठून ते सांगितलं तर म्हणे, "ती सरळ बसतच नाही गाडीवर, तिला तशीच सवय आहे.. पडत नाही!!!" ;-)

एकदा भर दिवसा गाडीवरून जाताना एका गाडीवाल्याला "तुमचा हेड लाईट चालु आहे" अशा अर्थाचे हातभाव केले... तो वळून परत आला आणि आम्हालाही त्याने तसेच हातभाव केले... पाहिलं तर आमच्याही गाडीचा हेड लाईट चालु होता.. ;-)