दोन विडिओ लिंक्स देतो आहे. स्व. ईंदिरा गांधी ह्यानी बीबीसी ला दिलेल्या दोन मुलाखती आहेत.
ह्या पहिल्या मुलाखतीमध्ये. जेव्हा त्यांना विचारला जात -"युद्ध शक्य आहे का?" त्यावर अप्रत्यक्ष पण ठणठणित तस सुचवला आहे.
आणि हा दुसरी मुलाखत - ह्यात पाकिस्तानची दुसर्या महायुद्धातील जर्मनीशी तुलना करून बीबीसीच्या मुलाखत घेनार्या मानसाला अक्षरशः गप्प बसवला आहे.
देब करो आणि असो दुर्गावतार पून्हा भारतात जन्म घेवो. :) विजया-दशमीच्या हार्दीक शुभच्छा :)
प्रतिक्रिया
17 Oct 2010 - 11:27 pm | रन्गराव
लिन्क्स उशीरा येत असल्याने इथ परत टाकतो आहे आहे
http://www.youtube.com/watch?v=nRAfs_LPFI4
http://www.youtube.com/watch?v=fKiQboyDMUo
18 Oct 2010 - 5:01 am | शिल्पा ब
पहिल्या video त त्यांनी किती स्पष्टपणे सांगितलाय कि सगळ्या निर्वासितांनी परत त्यांच्या देशात गेलेच पाहिजे...वा!!! आता साले सगळे शेपूट घालून मतासाठी राजकारण करणारे निपजलेत.
दुसऱ्या मध्ये स्पष्ट सांगितलेय कि आम्ही आधी सांगितले असताना का नाही लक्ष दिले आणि आताच कसे काय सगळे जागे झाले? जर्मन नाझी उदा. मस्त पैकी प्रश्नकर्त्याला तोंडघशी पाडते.
आणि आता काय तर म्हणजे "मोठा देशात अशा छोट्या गोष्टी होताच असतात" वाह!!! सगळा इमान विकून खाणार्यांचा बाजार नुसता.
18 Oct 2010 - 8:04 am | स्पंदना
खरच बाई खणखणीत होती.
मला आठवतय कुटुम्ब नियोजना साठी अक्षरशः धरपकड करुन ही योजना यशस्वी करण्याचा प्रय्त्न केला होता तीन . आज कोण देशाच्या पुढील हिताला नजरेत ठेवुन मत घालवुन बसेल?
18 Oct 2010 - 8:23 am | तर्री
बाई अत्यंत दुट्टप्पी होती .
जनरल माणिक्शॉ आपल्याला "पदच्युत" करतील ह्या भीती ने पछाडलेली होती .
राजाजी / राधाकॄष्णन इ. बकुबाच्या नेत्यांनंतर "राष्ट्रपती " पदाची जी शान "प्यादी" बसवून बाईंनी घालवली की यंव रे यंव...
लोकांच्या डोळ्यात धुळ भरण्यात ह्या "दुर्गेचा " हात कोणी धरणार नाही.
स्वतःचा "inferiority complex" कुरवाळत "कोपिष्ट / क्रोधिष्ट " होत देशातील अनेक समस्याची जननी ठरली आहे. ( आणिबाणि / घटनेचे ३५६ कलमाचा वापर / राज्यसभेवर आपले चम्चे बसवणे.
एकदा आईंनी पायंडा पाडला , "वाट " (लागली) मोकळी झली .
पण "नव दुर्गे" पे़क्षा "आदिमाया "नक्कीच "बरीच" बरी होती .
विडिओ बद्दल आभार.
18 Oct 2010 - 8:39 am | गांधीवादी
ह्याला कोणीही उपप्रतिसाद देण्यागोदर सर्व माननीय मिपाकरांना एक नम्र विनंती.
नेहरू चूक कि बरोबर ?, काश्मीर प्रश्न, राष्ट्रपिता महात्मा गांधी,आणीबाणी, घटनेचे ३५६ कलमाचा वापर, फाळणी, वगेरे वगेरे आदि विषयांवर सविस्तर लेख लिहावेत (अगोदर दिलेले प्रतिसाद एकत्र करून त्यांचे दुवा दिलेत तरी चालेल)
जेणेकरू असे प्रसंग, असे प्रतिसाद आले कि ते लेख/दुवा वाचता येतील आणि त्याच त्याच विषयांची पुनरावृत्ती टळेल.
(माहित आहे कि थोडे अवघड आहे, पण जे काय ते एकदाच होईल)
अन्यथा अनंत काळ तेच तेच तेच.............................गुर्हाळ चालू राहील.
18 Oct 2010 - 9:04 am | शिल्पा ब
कसला inferiority complex होता इंदिरा गांधींना? आणि काय दुटप्पीपणा केला त्यांनी?
बाकी बरेच काही असले तरी भारताला आंतरराष्ट्रीय पटावर एक कणखर नेता म्हणून योग्य होत्या असे मला वाटते..
स्वतःच्या पदाची काळजी सगळ्यांनाच असते...कोणी लोचट होतं, कुणी लाचार होतं तर कुणी स्वतःचा अधिकार वापरून अधिक मजबूत होण्याचा प्रयत्न करतं.
तसेच, त्यांनी वरती व्हीडोत निर्वासितांबद्दल जे सांगितले त्याविषयी खरोखरच काही केले का? जेष्ठ असतील ते प्रकाश टाकू शकतील का?
मी तशी खास कोणत्याही पक्षाची समर्थक नाही हे जाता जाता नोंदू इच्छिते.
18 Oct 2010 - 9:28 am | तर्री
त्यांना "स्वत:च्या " कुरुप दिसण्याचा / कमी शि़क्षणाचा / वागण्याचा complex होतो असे त्यांच्या आत्या " विजया बाईनी "लिहिले आहे.
दुटप्पीपणाची दोन ऊदाहरणे :
१.बँकाचे "सरकारी करण" करून "कौतिक करून घेणे पण "काम " करू दिले नाही . त्याकाळी म्हणे बँकांचे "डायरे़क्टर" दिल्ली ला जायला पण घाबरयचे . ( ईतकी "मायक्रो मॅनेजमेंट" पंतप्रधानांनी करवी का ?)
२.बाई " निर्वासितांनी परत त्यांच्या देशात गेलेच पाहिजे " हे नेहमी बोलायच्या , पण कॄतीत कही आणले नाही . त्यांना हे सहज शक्य होते हो. पण प्.बंगाल मधल्या मताचे राजकारण आड आले.
गांधीवादींची सुचना चांगली आहे. एकमत होणे अश्क्य नही , कठिण आहे !
जोपर्यंत आणिबाणी नही तोपर्यंत हे "गुर्हाळ चालू राहील".
आणिबाणी मध्ये "अग्रलेखांचे "बादशाह / राजे / जेष्ट संपादक वगैरे सुध्दा " हवामानावर" लिहित होते.
मिपा सारखे "खुले " व्यासपिठ व आणिबाणी . विचार नाही करवत.
गुर्हाळ चालू आहे ते बरे आहे.
18 Oct 2010 - 9:52 am | नितिन थत्ते
काय सगळे आपल्या आधीच्या पिढीतले करंटे.....
इतक्या कणखर, देशहितदक्ष नेतृत्वाला आणीबाणीसारख्या क्षुल्लक कारणावरून घरी पाठवले. ;)
18 Oct 2010 - 10:08 am | वेताळ
इंदिरा गांधी खुप कनखर व व्हीडो सांगितल्या सारख्या मोठ्या नेत्या होत्या. त्या कुरुप???? असल्या तरी त्याना राजीव गांधींना सारखा देखणा पोरगा होता ,आता राजीव गांधी म्हणजे आताच्या मोबाईल व कॉम्पुटर क्रांतीचे जनक व भारताचा देखना युवराज राहुल चे पप्पा होते.त्यामुळे त्या खुप मोठ्या नेत्या होत्या.
तळ टीपः मी कॉग्रेसचा समर्थक नाही आहे.
18 Oct 2010 - 10:37 am | नावातकायआहे
युवराज राहुलच्या आजी? वा! वा! म्हणजे नक्किच मोठ्या असणार आणि त्यांनी जे काही केले ते ही बरोबरच असणार...
आय्च्या काँगेसचा समर्थक
18 Oct 2010 - 10:23 am | अविनाशकुलकर्णी
समाजवादाचा अतिरेक केला..देश भिकेस लागला
18 Oct 2010 - 10:41 am | वेताळ
झाल्या. आता मुक्त अर्थव्यवस्था असुनही आपल्या देशात भिकार्याची संख्या खुप आहे. जवळ जवळ २९% लोक उपाशी झोपतात.ह्याला कोन दोषी आहे?
18 Oct 2010 - 10:58 am | गांधीवादी
>>ह्याला कोन दोषी आहे?
असा प्रश्न विचाराने खूप सोपे असते, पण ह्याचे उत्तर थोडे अवघड आहे.
साठ वर्षांपूर्वी आपण एका लोकशाहीची कल्पना केली होती, त्या प्रमाणे तिची घटना आपण करून घेतली. ती घटना जेव्हा तयार झाली त्यावेळेस ती बनविणाऱ्या व्यक्तींनी त्या काळातीलच लोकांच्या मानसिकतेचा विचार केला. तिथून पुढे ५०/१००/२०० वर्षानंतर लोकांची मानसिकता कशी असेल ह्याचा अंदाज बांधून ते तशी घटना बनवतील अशी अपेक्षा करणे चूक आहे. घटनेत वेळोवेळी दुरस्तीहि झालेली आहे. पण तरीसुद्धा परिपक्व अशी राज्यपद्धती अजून भारताला गवसलेली नाही.
'असलेल्या सर्व पर्यायांपैकी लोकशाही हाच सर्वोत्तम पर्याय आहे' हे जरी मान्य केले तरी लोकशाही हा पर्याय परिपक्व होण्यासाठी कोणतेही राजकीय पक्ष पुढाकार घेत नाहीत. कारण त्यांनी आताच्या घडीला असलेल्या राज्यपद्धती मधून त्यांना सोयीचे मार्ग शोधून ठेवलेले आहेत आणि ते मार्ग बंद होणे त्यांच्या राजकीय वर्चस्वाला घातक आहे.
त्यामुळे दोषी कोण ? ह्याचे उत्तर सद्याच्या स्थितीला कोणीही देऊ शकत नाही.
आपण एक बटन दाबून सर्व हक्क विना नियंत्रण त्यांच्या ताब्यात देतो. आणि ५ कोटी घेऊन एखाद्या पक्षाला पाठींबा द्यायचा का नाही हे जव्हा एखादा नेता ठरवितो तेव्हा तो यशस्वी नेता होतो.