प्रेरणा : सुधीर काळेंचा हा थ्रेड - http://www.misalpav.com/node/14446
माये का करु अजुनही सेवा तुझी ?
हा खेळ चाले जीवनी, पाहितेस का कधी ?
लहानपणी स्वप्नाळलेले मन माझे वेडे
असे रक्षणात सीमांच्या अखंड सताड उभे
आता करुनी मुर्खात गणना माझी
त्यागलेली ती कोमलता, पाहितेस का कधी ?
पुरुषात रुपांतर करुनी झाले
सुखवस्तु कातडीस पिळवटुन झाले
सग्या - सोयर्यांपासुन दूर वंचीत कायम
हरवलेले रोमांचीत जीवन, पाहतेस का कधी ?
धुक्यात विरघळूनी ..उन्हात होरपळूनी
रक्त सांडलेले तुझ्या पदरी ... पाहतेस का कधी ?
माये का करु अजुनही सेवा तुझी ?
हा खेळ चाले जीवनी, पाहतेस का कधी ?
कोठे कसाही असो, ना विचार तेंव्हा वेगळा
सज्ज कायम रक्षणास, वेळ येताच प्राणांची आहुती
काळ येता जेंव्हा, अमरत्वाची ग्वाही
सामोरा उभा सज्ज मृत्युच्या दारी
बोलशील तेंव्हा तू, काय अशी मोठी बात भारी
त्यागलेला हा शुल्लक जीव .. पाहतेस का कधी ?
खडतर आयुष्य.. आयुष्याची नाती
नोंद तुझ्या मनावरी.. आठवतेस का कधी
मी गेल्यावर पत्नीच्या कपाळावरील
गोंदलेले ओसाड रान .. पाहशील का कधी
सांग वाहिलेल्या शुद्र शवाची
येव्हडी इच्छा जाणशील का कधी?
आशा कोरडी जाणीवतेची
ना तू जाणलेली ती ही कधी
बेभानलेले माझे तेजरुप पाहताना
मरणाची सदैव काळझेप.. पाहतेस का कधी ?
नाव हि नसते ठावूक, आपुल्या तान्ह्या बाळाचे
बर्फावर विरघळणारे पितृत्व असे .. पाहतेस का कधी ?
ना सापडे तडफड पित्याच्या अतिंम श्वासांची
नाविक गस्त असे जरी विशाल समुद्रावरी
बुलंद आवाज ना माझा एकट्याच्या
मीच तो उंच उभा सदैव रक्षणात तुझ्या
उन्हा पावसात तू मुक्त बागडताना
हा खेळ चाले जीवनी, पाहतेस का कधी ?
मायेच्या रक्षणात सदैव आपण
हसण्याचे हेच कारण पुरे आयुष्यभर
अन तू बोलतेस जगाशी .. चमकतो भारत आहे
देवूनी धोका धारातीर्थ जवानांच्या आत्म्यास
सांग चकाकणारे सोंग हे .. तू कधी पर्यंत वठवणार आहे ?
तुच्छतेने लिहिले कोणी, अस्तित्व येथले
उपहासित हे माझे जगणे .. पाहतेस का कधी ?
उभारुन माझ्या जागी, बोलशील का कधी ?
हा खेळ चाले जीवनी, पाहितेस का कधी ?
ध्वज उंच दिमाखात फडकवण्यास तुझा
अजुनही जोखीम प्राणांची घेत आहे
प्रश्न परि अनुउत्तरीत माझे ..
माये का करु अजुनही सेवा तुझी ?
हा खेळ चाले जीवनी, पाहितेस का कधी ?
---- शब्दमेघ
मुळ कविता :
Why do I still serve you?
How you play with us, did you ever see?
At Seven, I had decided what I wanted to be;
I would serve you to the end,
All these boundaries I would defend.
Now you make me look like a fool,
When at seventeen and just out of school;
Went to the place where they made "men out of boys"
Lived a tough life …sacrificed a few joys…
In those days, I would see my "civilian" friends,
Living a life with the fashion trends;
Enjoying their so called "college days"
While I sweated and bled in the sun and haze…
But I never thought twice about what where or why
All I knew was when the time came, I'd be ready to do or die.
At 21 and with my commission in hand,
Under the glory of the parade and the band,
I took the oath to protect you over land, air or sea,
And make the supreme sacrifice when the need came to be.
I stood there with a sense of recognition,
But on that day I never had the premonition,
that when the time came to give me my due,
You'd just say, "What is so great that you do?"
Long back you promised a well-to-do life;
And when I'm away, take care of my wife.
You came and saw the hardships I live through,
And I saw you make a note or two,
And I hoped you would realise the worth of me;
but now I know you'll never be able to see,
Because you only see the glorified life of mine,
Did you see the place where death looms all the time?
Did you meet the man standing guard in the snow?
The name of his newborn he does not know...
Did you meet the man whose father breathed his last?
While the sailor patrolled our seas so vast?
You still know I'll not be the one to raise my voice
I will stand tall and protect you in Punjab Himachal and Thois.
But that's just me you have in the sun and rain,
For now at twenty-four, you make me think again;
About the decision I made, seven years back;
Should I have chosen another life, some other track?
Will I tell my son to follow my lead?
Will I tell my son, you'll get all that you need?
This is the country you will serve
This country will give you all that you deserve?
I heard you tell the world "India is shining"
I told my men, that's a reason for us to be smiling
This is the India you and I will defend!
But tell me how long will you be able to pretend?
You go on promise all that you may,
But it's the souls of your own men you betray.
Did you read how some of our eminent citizens
Write about me and ridicule my very existence?
I ask you to please come and see what I do,
Come and have a look at what I go through
Live my life just for a day
Maybe you'll have something else to say?
I will still risk my life without a sigh
To keep your flag flying high
but today I ask myself a question or two…
Oh India…. Why do I still serve you?
प्रतिक्रिया
16 Oct 2010 - 4:10 am | अथांग
आवडली !
16 Oct 2010 - 8:50 am | सुधीर काळे
गणेशा-जी,
आतापर्यंत तुमच्या पाकक्रियेवरील लेखांची शीर्षकेच पहात आलो होतो, पण तुमच्यात एक कवीही दडला आहे हे आताच कळले! (जेमतेम चहा करण्यापलीकडे कांहींही न येणारा मी पाककलेच्या वाटेला कधीच जात नाहीं!)
मूळ आंग्ल कवितेच्या माझ्या ओबड-धोबड गद्य भाषांतराच्या जागी तुम्ही अतीशय सुंदर कविता केलेली आहे. मनापासून धन्यवाद.
'प्रेरणे'बद्दलचे श्रेय मला न विसरता दिल्याचे कौतुक वाटले.
सुधीर
16 Oct 2010 - 8:50 am | नितिन थत्ते
आजच्या वर्तमानपत्रांमधील बातमी
पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देश भारतासाठी वाढत्या चिंतेचे विषय आहेत, असे प्रतिपादन लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी आज येथे एका परिसंवादात केले. पाकिस्तानी हद्दीतील भारतविरोधी दहशतवादी तळ आणि चीनची वाढती लष्करी ताकद, या गोष्टी आपल्यासाठी चिंतेच्या आहेत, असे सिंग म्हणाले. ‘इंडियन आर्मी- इमर्जिग रोल्स अँड टास्क्स’ या विषयावर आपले विचार मांडताना सिंग म्हणाले की, पाकिस्तानची स्थिती फार वेगळी आहे. तेथे अंतर्गत अस्थिरता असते आणि अतिरेक्यांना पाठबळ देणारा मोठा वर्ग सरकार व प्रशासनातही असतो. त्यामुळे पाकिस्तानचा धोका अधिकच गुंतागुंतीचा आहे. मात्र सरकार कोणतेही येवो आणि अंतर्गत स्थिती कशीही असो भारतविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांचे तळ कायम राहतात, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, असेही सिंग म्हणाले.
चीनबाबत ते म्हणाले, चीन आर्थिकदृष्टय़ा प्रगतीपथावर आहेच त्याच जोडीने तो लष्करीदृष्टय़ाही समर्थ होत आहे. ही गोष्ट बारकाईने लक्ष ठेवण्यासारखी आहे. चीन वा पाकिस्तानशी थेट युद्ध या घडीला वा नजिकच्या भविष्यातही अशक्य आहे तरी अतिरेक्यांच्या साह्याने चालणारे ‘छुपे युद्ध’ मात्र वेळोवेळी सुरूच असते आणि त्याला आपण समर्थपणे तोंड देत आहोत. आज देश पारंपरिक लढाईच्या दृष्टीनेही शस्त्रसज्ज राहिला पाहिजेच पण आण्विक धोका लक्षात घेऊनदेखील आपण सज्जता बाळगली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
(काळेकाकांचे आणि) मिसळपावच्या सदस्यांचे समाधान व्हावे यासाठीच केवळ लष्करप्रमुखांनी काही माहिती उघड केली आहे.
त्यात म्हटल्याप्रमाणे
१. चीन आणि पाकिस्तान काय करीत आहेत याची माहिती आपल्याला आहे. आपण गाफील आहोत हे मत चुकीचे आहे. कारण ही माहिती बहुधा लष्करप्रमुखांना काळेकाकांचे लेख आणि पत्रे वाचून मिळाली नसावी.
२. चीन वा पाकिस्तानशी थेट युद्ध या घडीला वा नजिकच्या भविष्यातही अशक्य आहे.
३. अतिरेक्यांच्या साह्याने चालणारे ‘छुपे युद्ध’ मात्र वेळोवेळी सुरूच असते आणि त्याला आपण समर्थपणे तोंड देत आहोत. म्हणजे आपण पुरेशी कारवाई करीत नाही हे मत चुकीचे आहे.
अवांतर : तो धागा इंचाइंचाने वर येऊ नये म्हणून या धाग्यावर उत्तर दिले आहे.
16 Oct 2010 - 9:31 am | गांधीवादी
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=108...
वरील बातमी वाचली, त्यातून मला एकच निष्पन्न झाले कि,
पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देश भारतासाठी वाढत्या चिंतेचे विषय आहेत, त्याला आपण समर्थपणे तोंड देत आहोत. आणि आपण (म्हणजे कोणी, लष्कर कि जनता ? माझ्या मते दोघांनी.) सज्जता बाळगली पाहिजे. म्हणून वेळोवेळी ह्या विषयी उहापोह व्हायलाच हवा.
16 Oct 2010 - 9:34 am | llपुण्याचे पेशवेll
चीन युद्धाच्या वेळेला सुधा सतर्क आहोत वगैरे वगैरे म्हटले गेल्याचे कळते. पण तेव्हा तर चांगलीच पाचर बसली होती. असो. "वुई आर सॉरी फोर द पीपल ओफ सिक्कीम" असे उद्गारही सतर्क राज्यकर्त्यांकडून निघाल्याचे कळते. प्रश्न खरंतर सतर्क असण्या नसण्याचा नाहीये. प्रश्न त्या सतर्कतेवर काहीही क्रिया न करण्याचा आहे. असो.
>>२. चीन वा पाकिस्तानशी थेट युद्ध या घडीला वा नजिकच्या भविष्यातही अशक्य आहे.
बाकी चीन पाकिस्तानशी थेट युद्ध करण्याची वेळ आली तर भारतीय लष्कराचे ३-१३ वाजण्याची शक्यता जास्त आहे. कमीतकमी पूर्व नौसेना प्रमुखांच्या विधानांवरून तसेच वाटते. आणि स्वातंत्र्यानंतर ५० वर्षात त्या दृष्टीने फार काही प्रगती झाली आहे असे वाटत नाही.
>> ३. अतिरेक्यांच्या साह्याने चालणारे ‘छुपे युद्ध’ मात्र वेळोवेळी सुरूच असते आणि त्याला आपण समर्थपणे तोंड देत आहोत. म्हणजे आपण पुरेशी कारवाई करीत नाही हे मत चुकीचे आहे.
सहमत आहे. २६/११ च्या हल्ल्याच्या वेळेला आपण पुरेशी कारवाई केली होती म्हणे.
16 Oct 2010 - 9:53 am | गांधीवादी
अजून एक बातमी वाचली
काश्मीर भारतात विलीन नाही, हे खरेच - कृष्णा
नवी दिल्ली - जम्मू-काश्मीर हे राज्य भारतामध्ये विलीन झालेले नाही, तर ते भारताला येऊन मिळालेले आहे, असे तेथील मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केलेले विधान योग्यच आहे, त्यात काही गैर नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी आज म्हटले.
उमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत बोलताना, आपले राज्य भारतात अद्याप विलीन झालेले नाही, ते केवळ भारताशी संलग्न आहे, असे म्हटले. स्वातंत्र्योत्तर काळात जुनागढ व हैदराबाद ही संस्थाने भारतात विलीन झाली, त्याप्रकारे जम्मू-काश्मीर विलीन झालेले नाही, त्यामुळे जम्मू-काश्मीरची तुलना या दोन संस्थानांशी करू नये, असेही उमर म्हणाले होते.
कृष्णा यांनीही जम्मू-काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे, असे म्हटले होते.
जर काश्मीर खर्च भारतात विलीन झालेले नसेल तर ते भारताचा अविभाज्य भाग कसे होऊ शकते ?
तो हिस्सा का भारताच्या नकाशात दाखवायचा ? आम्ही लाऊन घेऊ सवय जसा असेल तसा नकाशा बघण्याची. आणि का त्या काश्मीर पायी इतका आटापिटा करायचा आणि इतके मनुष्यबळ आणि पैसा वाया घालवायचा ? उगाचच वर्षानुवर्षे त्यापायी डोकेफोड का करायची ?
17 Oct 2010 - 1:54 pm | गांधीवादी
हि आहे भारतीय सरकारची सतर्कता.
US says 'threat info' shared with India before 26/11 attacks
Separately, an Indian source, who was involved in the investigations of the Mumbai terrorist attacks, told PTI on the condition of anonymity, that India did receive the information, which was general and it was not specific in nature.
आता specific in nature म्हणजे काय ह्यांना कोण कोण कुठून, कुठे कसे, किती वाजता, काय काय घेऊन येणार अशी माहिती अपेक्षित होती कि काय देव जाने.
specific in nature माहिती म्हणजे नक्की काय हवे असते ?
जो पर्यंत अशी specific in nature माहिती मिळत नाही तो पर्यंत कारवाई होत नाही का ?
17 Oct 2010 - 2:27 pm | नितिन थत्ते
नक्की काय इन्फो दिली होती हे आपल्याला माहिती आहे का?
की भारतीय अधिकारी म्हणतात ते चुकीचेच असणार असे समजून/दाखवण्यासाठी जीभ उचलून टाळ्याला लावली आहे?
17 Oct 2010 - 3:00 pm | गांधीवादी
>>नक्की काय इन्फो दिली होती हे आपल्याला माहिती आहे का?
नाही हो माहित नाही. पण specific in nature नव्हती हे नक्की.
माहिती specific in nature द्यायला हवी होती, तशी न दिल्याबद्दल अमेरिकेचा निषेध करतो.
बाकी भारतीय अधिकारी आपले काम एकदम चोख बजावितात हे मान्य. गुप्तहेरांनी काय एक specific in nature माहिती द्यायची मग ते एकदम चोख कारवाही करतात. हे मान्य करतो.