ह्रुदयी तव ठेवुनी माथा,हलकेच मी विसावता
भिनली ही नीज नयनी,शांत झाली आर्तता !
अवचित मग जाग येता,तुझ्या ह्रुदय्-स्पन्दनी
मिटले नेत्र जाणती रे,व्यथा ज्या तुझ्या मनी !
मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी
जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी !
वाटे साद घाली, मज रातराणीचा सुगंध
की सुवास हा तव तनुचा,नशीला अन मंद-धुंद !
बघ कसे बिलगुनी जाती,मोरपंखी लुब्ध वारे
की श्वास हे तुझेच सखया,केसांतुन मम सळसळणारे !
राहु दे एकांत आपुला,शांत सुंदर अन स्तब्ध
मौन हे राहु दे उशाशी,नको बोलबाला अन शब्द !
चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला
पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला !
~ पल्लवी ~
प्रतिक्रिया
18 Apr 2008 - 8:31 am | चतुरंग
बघ कसे बिलगुनी जाती,मोरपंखी लुब्ध वारे
की श्वास हे तुझेच सखया,केसांतुन मम सळसळणारे !
हे एकदमच खास!
चतुरंग
18 Apr 2008 - 9:34 am | प्राजु
पल्लवी,
राहु दे एकांत आपुला,शांत सुंदर अन स्तब्ध
मौन हे राहु दे उशाशी,नको बोलबाला अन शब्द !
चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला
पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला !,
कविता अतिशय सुंदर आहे.
हे खूप आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Apr 2008 - 9:57 am | विसोबा खेचर
मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी
जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी !
ओहोहो खल्लास..!
राहु दे एकांत आपुला,शांत सुंदर अन स्तब्ध
मौन हे राहु दे उशाशी,नको बोलबाला अन शब्द !
क्या बात है....
चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला
पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला !
वा! सुरेख कविता..
पल्लवी, औरभी लिख्खो..
तात्या.
18 Apr 2008 - 10:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरीजाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी !
राहु दे एकांत आपुला,शांत सुंदर अन स्तब्धमौन हे राहु दे उशाशी,नको बोलबाला अन शब्द !
चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुलापहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला !
एकापेक्षा एक सुंदर ओळी आहेत !!! कविता आवडली.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
18 Apr 2008 - 10:21 am | मनस्वी
सुंदर!
18 Apr 2008 - 10:24 am | आनंदयात्री
मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी
जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी !
व्वा उस्ताद वा !
18 Apr 2008 - 11:43 am | अभिज्ञ
छान कविता.
कविता फारच आवडली.
अशाच कविता येउ द्यात.
अबब
18 Apr 2008 - 3:58 pm | पल्लवी
त्रिवार धन्यवाद !!!
इरसाल मराठमोळ्या चकाट्या आणि त्या पिटणारे त्याहुनही इरसाल वल्ली प्रचंड भावल्या ! एक नंबर कट्टा !!
तर कट्टेकरी लोकहो, कवितेसाठीच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल ठेंक्यु !!!
तात्या, प्रत्येक शेरास दाद दिलीत,खूप ध्न्यवाद ! :)
18 Apr 2008 - 5:27 pm | शितल
मस्तच काव्य रचना झाली आहे,
आता आणखी आम्ही काय बोलु कविते बद्दल, मौनच बाळ्गतो.
18 Apr 2008 - 6:05 pm | अन्जलि
ख्उप खुप छान कविता अशिच कविता करत रहा
18 Apr 2008 - 6:06 pm | अन्जलि
ख्उप खुप छान कविता अशिच कविता करत रहा
18 Apr 2008 - 6:27 pm | सुवर्णमयी
चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला
पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला !
सुरेख कविता आवडली.
19 Apr 2008 - 12:41 pm | जयवी
चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला
पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला !
क्या बात है....... पल्लवी , खूप आवडली कविता. अगदी हळुवार भिनत जाताहेत ओळी.
28 Mar 2013 - 5:39 pm | उत्खनक
खूप नितळ कविता!
खूप आवडली.
मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी
जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी
या ओळी अगदी खास..
31 Mar 2013 - 3:19 pm | गंगाधर मुटे
अतिशय सुंदर कविता. :)