नेहमी प्रमाणे आम्ही संगीत तबकडी सुरु केली आणि मिपा वाचायला सुरुवात केली... पराशेठचा खुषखबरी धागा वाचून संपायला आणि तबकडीवर खेबुडकरांचे दाम करी काम येड्या लागयला एकच गाठ पडली आणि आम्हाला तबकडीतून भलतेच बोल ऐकू येउ लागले
बारा डोळ्यांनी धागं सारी वाचकजन बगतो
प्रतिसादावर माणूस मरतो प्रतिसादावर जगतो
प्रतिसादाला पैसं मागतो 'परा'स नाही काम रे
काम करी दाम येड्या काम करी दाम रे
टिआरपीची जादू लई न्यारी, सार्या जालाला त्याची हाव
काम सोडून लिवतय लेख, प्रतिसादा मागूनी धाव
जल्मापासून सारी माणसं ह्या रोगाची गुलाम रे
कुनी टुकार कौलेबाज कुनी कुनी टंके पांचट फुटका
चांडाळ चौकडी जमवी कुनी रमवी जिव दो घटका
शंभर अकडा नक्की ठरला, सोडला त्यानं लगाम रे
ह्या वाव्वा बाडिस पाई, कुनी भंपक लावी जीव
कुनी खरडी निरोप धाडी, कुनी बदलून टाकी नाव
बगलंमंदी सुरी दुधारी, मुखी मैत्रीचं नाम रे
अचरटावानी लेखनी, धाग्याच्या गळ्याला फास
टंकल्यालं लगीच उडवितं. लेखाच होतय फसं
वाचक मेलं शरमंदीनं, वाचन होई हराम रे
पानावर पुढच्या जाती, हे धागं टाकोटाक
प्रोत्साहन मंडळ निघते, पॅकेज काढल झाक
शेड्युल ठरवून प्रतिसादाच,अता करावा अराम रे
वाढेल टिआरपी आता छनछन्नुक तालावरती
पैशानं नवोदित खुस, पैशानं ज्येष्ठ बी खुलती
प्रतिसादांच्या बादशहाला, "केश्या" करतो सलाम रे
प्रतिक्रिया
11 Oct 2010 - 10:22 pm | सुहास..
=))=))=))
अग्गग !!!
पर्या , नाउ व्हाट ?
11 Oct 2010 - 10:24 pm | गणपा
कलगी तुरा रंगणार का आता ;)
11 Oct 2010 - 10:27 pm | प्रभो
अगागागगागागागा!!!!
केसुसेठ, लई भारी!!
11 Oct 2010 - 10:31 pm | प्रियाली
केसुंना हल्ली फारच सुपीक माती मिळू लागली आहे. ;) खणा खणा.
11 Oct 2010 - 10:33 pm | प्रभो
सुपीक का मऊ?? ;)
11 Oct 2010 - 11:45 pm | प्रियाली
असे आपले आमचे (अ)ज्ञान. ;)
11 Oct 2010 - 10:37 pm | चतुरंग
तमाम हे काम रे!! ;)
('परा'गंदा)रंगा
11 Oct 2010 - 10:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अर्र, पर्याचा बाजार उठवून पुरती माती झाली की इथे!!
11 Oct 2010 - 10:58 pm | बेसनलाडू
(खोदकरी)बेसनलाडू
11 Oct 2010 - 11:50 pm | प्राजु
थ्ड थ्ड्..थ्ड! एकदम जोरदार ..!
परा.. हाऊ अबाऊट दिस??
12 Oct 2010 - 10:10 am | बिपिन कार्यकर्ते
दणका!!!
12 Oct 2010 - 1:01 pm | परिकथेतील राजकुमार
आ रा रा पार बाजार उठवला आमचा केसुशेठनी![](http://www.mimarathi.net/modules/smileys/packs/Example/24.gif)
तुमच्या पुढच्या धाग्याची आता मातीच केली पाहिजे.
12 Oct 2010 - 1:05 pm | केशवसुमार
करायचे रेट कार्ड पाठवा..
12 Oct 2010 - 1:56 pm | श्रावण मोडक
छ्या... अमुक मिनिटांत अमूक प्रतिसाद वगैरे गर्जना आणि त्यातील गोम यांचा या विडंबनात समावेश नसल्यानं हे विडंबन साफ फसलं आहे. किंवा ते मुद्दाम फसवलं असावं. ;)
12 Oct 2010 - 2:38 pm | केशवसुमार
वेगळा रेट आहे मोडकशेठ.. ;)
(वेगवेगळा)केशवसुमार
12 Oct 2010 - 3:02 pm | श्रावण मोडक
दाम करी काम हेच खरं... ;)
12 Oct 2010 - 1:59 pm | अवलिया
हा हा हा
=))
12 Oct 2010 - 3:23 pm | भाऊ ठाकुर
धुवांधार काव्य
चेष्टा का काय!!!
12 Oct 2010 - 8:09 pm | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!
(आभारी)केशवसुमार