तरले म्हणजे ताडगोळ्याच्या नुकत्याच उगवलेल्या रोपाचे मुळ. ताडफळ झाडावरच पिकुन खाली पडतात. त्याला पावसाळ्यात मोड धरतात. हेच मोड जमिनीत रुजुन त्याला चे रोप बनते. पण ह्या छोट्या रोपाची उंचीही किमान १ फुटापेक्षा जास्त असते. हे मुळ काढण्यासाठी मुळाच्या बाजुने गोल खोल खड्डा करत अलगद हे मुळ काढतात. एवढे परिश्रम करुनही हे तरले अपरीचीत असल्याने त्यांना योग्य तो भाव मिळत नाही. केवळ १० रुपयांना एक जुडी मिळते. एका जुडीत ५ तरले असतात.
लागणारे साहित्य:
गरजेनुसार तरल्यांच्या दोन-तिन जुड्या
मिठ
उकडण्यासाठी पाणी
कृती :
प्रथम तरले धुवुन त्यांचे दोन इंचाइतके किंवा आपल्या आवडीनुसार तुकडे करावेत.
तुकडे एका टोपात ठेउन ते बुडतील इतक पाणी घालावे. मग अंदाजे मिठ घालून १५ ते २० मिनीटे शिजुन द्यावेत.
शिजुन थोडे थंड झाले की प्लेट मध्ये सर्व करावेत. (कामवाली नसेल किंवा भांडी घासायचा कंटाळा आला असेल तर अश्याप्रकारे पेपरडिशमध्ये काढा. फार उपयोगी टिप आहे हो ही)
कस खायचे हे तरले ह्या बाबत तुम्ही गोंधळला असाल म्हणून हा खालील फोटो. पहिला बाजुच साल काढुन घ्या. मग निघालेला गर मधुन फोडा. हाताने सहज तुटतो. आता त्यातील मधली कडक दांडी काढून टाका. राहीलेला गर मिटक्या मारत खा. साधारण कसर्यासारखे लागतात.
प्रतिक्रिया
11 Oct 2010 - 3:50 pm | मनि२७
जागू ताई...
just तुला online पाहिलं आणि पाककृती सदराकडे click केल....
मला १००% खात्री होती कि तू नक्की पाकृ टाकली असणार...
आणि तसच झाल.....!!!
थांब...आता पाकृ पाहते...
!
!
!
!
!
हम्म....नवीनच आहे.... मी पहिल्यांदा पाहते आणि वाचतेय...
छानच असणार...... मस्त...
11 Oct 2010 - 3:52 pm | सूड
काय बोलणार!! मस्त आणि नवीन अॅझ युझ्युअल.
11 Oct 2010 - 3:59 pm | गणपा
खुप दिवसांनी पाहिले ग तरले.
11 Oct 2010 - 4:08 pm | जागु
मनी तुझा प्रतिसाद आवडला.
सुधांशु, गणपा धन्यवाद.
11 Oct 2010 - 4:13 pm | प्राजक्ता पवार
छान . नविन माहिती मिळाली :)
11 Oct 2010 - 4:21 pm | स्वाती२
नविनच प्रकार!
11 Oct 2010 - 4:40 pm | परिकथेतील राजकुमार
__/\__ धन्य आहेस.
आता आधी कसर्या म्हणजे काय ते समजाव.
11 Oct 2010 - 4:51 pm | जागु
प्राजक्ता, स्वाती, राजकुमार धन्यवाद.
राजकुमार, कसर ही तळ्यातली कंद असतात. दिसायला अगदी छोट्या केसवाल्या करांद्या सारखी . पण अगदी टणक असतात. ही सोलायलाही कठीण असतात. सुरीने किंवा दातानेच सोलावी लागतात. खातानाही कडकच लागतात. पण चविष्ट असतात. अलिबागला जास्त मिळतात ती. आता आली की फोटो टाकते.
11 Oct 2010 - 4:59 pm | परिकथेतील राजकुमार
माहितीबद्दल धन्स ग :)
11 Oct 2010 - 8:41 pm | प्राजु
कसरा आणि तेरले....छान. पण आता हे करंदे कसे असते? (कसर्या सारखे असते असे सांगू नका..)
नेहमीप्रमाणेच मस्त.. वेगळाच प्रकार. :)
11 Oct 2010 - 6:26 pm | रेवती
पहिल्यांदाच हा प्रकार पाहिला.
तुझ्या पाकृ माहितीपूर्ण असतात.
11 Oct 2010 - 8:50 pm | प्रभो
मस्तच!!
11 Oct 2010 - 8:58 pm | मदनबाण
ताई तुझे हे धागे म्हणजे एक अमोल ठेव आहे... :)
जब तक भाजी-पाला रहेगा जागु ताई तेरा नाम रहेगा... ;)
11 Oct 2010 - 9:13 pm | प्राजु
बाणा... तुला ..जबतक रानभाजीपाला रहेगा.. असं म्हणायचं आहे का? ;)
12 Oct 2010 - 1:10 pm | जागु
वा. श्लोगन आवडले मदनबाण. धन्यवाद.
11 Oct 2010 - 9:34 pm | निवेदिता-ताई
पहिल्यांदाच तरले हे नाव वाचले............
विचारायला पाहिजे शेतकरी लोकांना.......तरले आणी कसर ....मिळाली तर करुनच पाहिन.
11 Oct 2010 - 9:36 pm | निवेदिता-ताई
आम्च्याकडे ढेसे म्हणून एक असाच प्रकार मिळ्तो.
12 Oct 2010 - 1:06 pm | जागु
ढेसे हा भाजीचा प्रकार आहे. माठाची मोठी जात असते. त्याचे मधले खोड जाड असते. हे खोड म्हणजेच ठेसे. हे ठेसे आमटीत, कोलंबीच्या कालवणात टाकतात. लाल व हिरवे असे दोन प्रकार असतात ह्याच्यात.
12 Oct 2010 - 4:39 am | priya_d
जागु
नवीन व माहितीपूर्ण पाकृ. परंतु मला फोटो दिसत नाहीये. असे ब-याचवेळा होते. कोणी सांगु शकेल कां, कशामुळे होत असावे?
प्रिया
12 Oct 2010 - 10:00 am | चिंतामणी
मिपाचे standerd उत्तर तुला माहीत नाही का?
पापी लोकांना फटु दिसत नाही. ;)
12 Oct 2010 - 5:29 am | पिंगू
आता येत्या विकांताला घरी गेल्यावर मावशीला आणायला सांगतो.. तरले आणि कोन.. ह्यावेळेस मूड आहे खाण्याचा आणि खाऊ घालण्याचासुद्धा..
- पिंगू
12 Oct 2010 - 9:35 am | स्पंदना
एकदम नविन प्रकार आमच्या साठी.
आम्ही घाटावरचे ..
12 Oct 2010 - 10:17 am | सहज
एखाद्या जंगलवाल्याला मराठीत माहीतीपूर्ण लेखन ना धो महानोरांचे*,
एखाद्या गडकिल्लेवाल्याला मराठीत माहीतीपूर्ण लेखन गोनीदांचे*
अस्स्सल मराठी, अन्नधान्यवाल्याला मराठीत जालावर माहीतीपूर्ण लेखन जागूतैंचे!
* - नंदन कृपया योग्य जागी योग्य लेखक भरणे
12 Oct 2010 - 12:56 pm | विसोबा खेचर
मस्त..:)
12 Oct 2010 - 2:24 pm | स्मिता_१३
जागु ताई __/\__
तुझ्या ह्या माहिती कोशाचे खरच एक छान पुस्तक होउ शकेल.