पुण्यात औन्ध मधे बंगला उभा आहे ऐटित
जळू नका लोकहो ... राव आहे आय़् टीत
पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ' मोरुची मावशी ' ,
........ चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.
पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
.... आहेत आमचे फार नाजुक.
चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा,
मी आहे म्हैस तर............ आहे रेडा.
अधिकमासात आईने दिली चांदिची परात,
सखींनो २७ फेब्रुवारीला .... ची आली होती हत्तीवरुन वरात.
मिताली बिल्डींग,तिसरा मजला घर नं - ११ , घराला लावली घंटी,
वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी.
गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
... माझी बायको आहे मोठी सच्ची.
इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
... घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!
श्रीरामाने भोगिला चौदा वर्षाचा वनवास,
....चे नाव घेते सखींनो आता करू नका सासुरवास.
समोरच्या कोनाड्यात ठेवला होता गहु
..राव गेल्रे दौर्यावर आता जरा .. रावाकडे पाहु.
न पटल्यास हा धागा काढुन टाकावा.
आपलाच
विवेक विद्वा॑स.
प्रतिक्रिया
17 Apr 2008 - 9:03 pm | शितल
काय हो लग्नाच्या सीझन चालला आहे म्हणुन हे उखाणे की काय ?
18 Apr 2008 - 1:08 pm | वडापाव
मस्त आहेत, उखाणे लिहायला अन् वाचायला मलाही मजा येते.
मी सुध्दा काही उखाणे सुचल्यावर लिहीन म्हणतो.
आपला नम्र,
वडापाव
23 Apr 2008 - 1:38 pm | सत्या
रावणाला आला राग
बिभिशण हसल्यावर...............
रावणाला आला राग
बिभिशण हसल्यावर...............
.......रावा॑चे नाव घेते ......ला बसल्यावर.....!!!!!!!!!!!!!
23 Apr 2008 - 1:46 pm | सत्या
रावनाच्या देशात रम आणि वोड्का...........
......राव दिस्ल्यावर सर्वानि मिळुन झोड्पा.