कुत्र्याचे शेपूट ...

मनीषा's picture
मनीषा in जे न देखे रवी...
11 Oct 2010 - 12:14 pm

पाठीला बाक, पोटाचा घेर
बायको यायच्या आधी,
काढून घेतो केर |
पगाराचे पाकीट, जन्माची ठेव
सत्यधर्म हाच
आहे माझा देव ||

पण काय करू, लक्ष सारखे
जाते शेजारणीकडे|
आहो, माहीत आहे हो म्हणतात
कुत्र्याचे शेपूट, वाकडे ते वाकडे||

लाडका पोर, माझ्या जीवाला घोर
उद्योग पाहून वाटे,
बरा फाशीचा दोर |
परीक्षा, नोकरी - नस्से याच्या गावी,
बाय डॅड, हाय मॉम
फिरवीत म्हणतो चावी ||

सरळ सरळ रस्ते
दिसती याला वाकडे |
आहो, तरी बरं म्हणे
कुत्र्याचे शेपूट, वाकडे ते वाकडे ||

ओढणी मॅचिंग, मॅचिंग चप्पल
आधी जाते मंडळात,
मग देवळात चक्कर |
बाराचा मॅटीनी, सहाची भिशी
गाठताना जीव
मेटाकुटी येई ||

कधी वाटे, पुरे आता
सोडून जावे सारे |
आहो पण करू तरी काय
कुत्र्याचे शेपूट... वाकडे ते वाकडे ||

रस्त्यावर गर्दी, बाजारपेठ भरली
काकू, मावशी, आत्या, मामी
दुकानी हरवली |
पॉपकॉर्न चा वास, जीन्समधली ती एक खास
कसले कसले आज
होतायत हे भास? ||

बायको सारखी सारखी
काय बोलतेय, न कळे |
आहो, माहीत नाही का तिला?
कुत्र्याचे शेपूट, वाकडे ते वाकडे ||

दिवाळीची फराळ पार्टी, हॉटेलात केली
पाडव्याची गुढी,
व्हर्च्युअलच लावली |
सासूबाईंना म्हणले
कामं करा थोडी
पुजा मी करते, मग वाचते पोथी ||

मंत्रजप करताना, मॅनेज करते सारे |
आहो, तुम्हीच सांगा काय करू?
कुत्र्याचे शेपूट ... वाकडे ते वाकडे ||

कविता

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

11 Oct 2010 - 6:43 pm | पाषाणभेद

मस्त कविता आहे. अजूनही येवू द्या.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Oct 2010 - 6:50 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त. तुमच्या ब्लॉगवरदेखील वाचली होतीच :)

अवलिया's picture

11 Oct 2010 - 7:16 pm | अवलिया

मस्त !

सुहास..'s picture

11 Oct 2010 - 8:04 pm | सुहास..

हा हा हा !!

झ का स

प्राजु's picture

11 Oct 2010 - 8:21 pm | प्राजु

सह्हि!! मस्तच!

बेसनलाडू's picture

11 Oct 2010 - 10:53 pm | बेसनलाडू

आवडली.
(पांढरपेशा)बेसनलाडू

राघव's picture

12 Oct 2010 - 6:48 pm | राघव

मस्त आहे कविता! :)

मनीषा's picture

13 Oct 2010 - 8:25 pm | मनीषा

धागे जिर्णोद्धार मंडळाच्या सदस्यांचे विशेष आभार !