विंडबकांच्या फळप्राप्तीसाठी युद्ध आमुचे सुरू
चिक्कु किंवा पेरु, चिक्कु किंवा पेरु !!
कविता आवश्यक विडबंनासाठी
कच्च्या मालावर अत्याचारासाठी
धावा कोणाचा करू, चिक्कु किंवा पेरु !!
आमुच्या थर्डक्लास काव्यप्रतिभेतुन
वाचे जी संपादकाच्या चाळणीतुन,
कोणाची कविता स्मरू, चिक्कु किंवा पेरू !!
विक्षिप्त,पुप्या,ममो ,रंगा अम्हास ठावे
थोर विडंबक औषधासही न गावे
कास कोणाची धरू, चिक्कु किंवा पेरू !!
प्रासंगिकही लेख न सापडे
पडलो धराशायी आम्ही बापुडे
एका जनार्दनी टारू , चिक्कु किंवा पेरू !!
ऊचलले दंडक संपादकानी रे सुहासा
पितृपक्षीय बाजे डंका,चाले तमाशा
बंद पडले बोरू, चिक्कु किंवा पेरू !!
प्रतिक्रिया
1 Oct 2010 - 3:42 pm | धमाल मुलगा
चांगलं चाललंय..चांगलं चाललंय!
हल्ली काय बदामाच्या तेलानं डोक्याला पॉलिश..हे आपलं...मालिश करताय वाटतं. :D
ते जरा मात्रा, वृत्त, निवृत्त, गण गोत ह्यामध्ये थोडी सुधारणा केली तर बहार येईल. (काव्य म्हणलं की हे वाक्य यायलाच पाहिजे असा नियम आहे म्हणे...म्हणुन हों!)
1 Oct 2010 - 3:44 pm | ब्रिटिश टिंग्या
जवळपास सहमत!
1 Oct 2010 - 6:54 pm | प्रभो
जवळपास सहमत!
1 Oct 2010 - 3:48 pm | गणपा
मस्त रे सुहास, चालीत म्हणुन पाहिल. एकदम मिटरमध्ये बसतय.
1 Oct 2010 - 3:55 pm | दत्ता काळे
विडंबकाची फळप्राप्ती म्हणजे " चिक्कू किंवा पेरु " ?
हा.. हा .. मजेशीर.
1 Oct 2010 - 3:55 pm | llपुण्याचे पेशवेll
सुहास काव्य अप्रतिम साधलं आहे. बाकी वृत्तबित्त फाट्यावर मारल्यापासून 'इष्ट तेच बोलणार शक्य तेवढे करणार' या तुमच्या उक्टीचा कृटित होनारा परिणाम पाहून अंबळ बरे वाटले. :)
1 Oct 2010 - 4:11 pm | जागु
" चिक्कू किंवा पेरु "
मस्तच.
1 Oct 2010 - 8:32 pm | पैसा
ही "रौद्ररस" असलेली कविता वाचून आम्हास अतिशय "भय" वाटले.