माझी फुलांची रांगोळी

जागु's picture
जागु in कलादालन
1 Oct 2010 - 3:35 pm

आमच्या साखरचौतीच्या गणपतीच्या दिवशी मी ही रांगोळी काढली होती. खुप फुले उरली होती त्यातुनच ही रांगोळी काढली झर्ब्रेरियाची फुले आदल्या दिवशी वाहिलेल्या कंठीतुन काढली. त्यावरच ते मणी होते. खालची टोकेरी पाने गेलार्डीयाच्या काडीतील कापुन घेतले. हिरविगार गोलकार पाने आमच्य कंपाउंडच्या झाडाची काढली आहेत. त्यावर तगडीच्या कळ्या लावल्या आहेत. तसेच मध्ये मध्ये गेलार्डीया आणि ऑरगंडी ची फुले लावली आहेत. ऑरगंडीच्या फुलांच्या खाली कडू मेहंदीची पाने लावली आहेत. हयावर्षीची ही रांगोळी खास आकर्षण ठरली होती.

कला

प्रतिक्रिया

गणपा's picture

1 Oct 2010 - 3:48 pm | गणपा

सुंदर.

नगरीनिरंजन's picture

1 Oct 2010 - 3:52 pm | नगरीनिरंजन

सुंदर

छानच आहे रांगोळी !! पण साखरचौत म्हणजे काय गं ??

प्राजक्ता पवार's picture

1 Oct 2010 - 4:09 pm | प्राजक्ता पवार

सुरेख रांगोळी :)

दत्ता काळे's picture

1 Oct 2010 - 4:11 pm | दत्ता काळे

सुंदर. रांगोळी आवडली. जरबेराच्या फुलात मणी भारी छान दिसताहेत.

सुधांशू साखरचौत म्हणजे गणेश चतुर्थीच्या नंतर येणारी संकष्टी. ह्या दिवशी गुळा ऐवजी साखरेचे मोदक बनवण्याची प्रथा आहे. तसेच, काकडी, केळ वगैरे फळे घेउन गोल कपुन त्यावर झेंडूची देठासकट फुले टोचुन ताट सजवतात. त्यातच दिवे व अगरबत्ती लावुन त्याची आरती गणपतीला व चंद्राला ओवाळतात.

सूड's picture

1 Oct 2010 - 6:54 pm | सूड

धन्स ! साखरचौतीच्या माहीतीबद्दल.

यशोधरा's picture

1 Oct 2010 - 4:23 pm | यशोधरा

जागू, मला दिसत नाहीये गं रांगोळी.

रेवती's picture

1 Oct 2010 - 6:30 pm | रेवती

सुंदर!

परिकथेतील राजकुमार's picture

1 Oct 2010 - 6:34 pm | परिकथेतील राजकुमार

फुलावली झक्क्कास :)

साखरचौतीची माहिती दिल्याबद्दल धन्स. हि जागुतै एक दरवेळी ज्ञानात भर घालुन जाते बॉ !

गणपा's picture

1 Oct 2010 - 6:39 pm | गणपा

हि जागुतै एक दरवेळी ज्ञानात भर घालुन जाते बॉ !

+१

प्रियाली's picture

1 Oct 2010 - 6:39 pm | प्रियाली

आवडली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Oct 2010 - 6:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर.......!

आपला उत्साह घालवतोय असे समजू नका. फक्त एक अवांतर प्रश्न : रांगोळी म्हटलं की, कोणत्या तरी दगडाचा कूट करुन त्यात विविध रंगांचे मिश्रण करुन कलात्मक रितीने अंगण रंगवणे म्हणजे रांगोळी. फूलांची जेव्हा अशी कलात्मक रितीने सजावट केली जाते त्यालाही रांगोळी म्हणावे का ? की फक्त 'रंगवणे' म्हणजेच रांगोळी.

-दिलीप बिरुटे

अशा सजावटीला रंगावली सारखे "पुष्पावली " म्हणावे.
जागूजी , सुंदर सजावट . साखरचौतीच्या माहितीबद्द्ल धन्यवाद.

पैसा's picture

2 Oct 2010 - 6:24 pm | पैसा

सुंदरच आहे

दीपा माने's picture

1 Oct 2010 - 11:02 pm | दीपा माने

इथे अमेरिकेत आम्ही प्रथम प्रथम फक्त फुलान्चीच रान्गोळी काधायचो. कारण रान्गोळीची पुड तेव्हा इथे भारतीय दुकानात मिळत नव्हती.

दीपा माने's picture

1 Oct 2010 - 11:02 pm | दीपा माने

इथे अमेरिकेत आम्ही प्रथम प्रथम फक्त फुलान्चीच रान्गोळी काधायचो. कारण रान्गोळीची पुड तेव्हा इथे भारतीय दुकानात मिळत नव्हती.

शिल्पा ब's picture

1 Oct 2010 - 11:52 pm | शिल्पा ब

सुंदर रांगोळी..

डावखुरा's picture

2 Oct 2010 - 12:11 am | डावखुरा

मस्त..!!
तसेच साखरचौत च्या माहिती साठी धन्स...

राजेश घासकडवी's picture

2 Oct 2010 - 12:30 am | राजेश घासकडवी

रांगोळी म्हटलं काय किंवा पुष्पावली म्हटलं काय... कुठच्याही नावाने सुंदरच!

पिंगू's picture

2 Oct 2010 - 6:19 pm | पिंगू

सुरे़ख आणी इको फ्रेंडली रांगोळी...

- (रांगोळीप्रेमी) पिंगू

मदनबाण's picture

2 Oct 2010 - 10:10 pm | मदनबाण

आवडेश... :)

सहज's picture

3 Oct 2010 - 8:28 am | सहज

नेटकी, सुंदर सजावट

सगळ्या सगळ्यांचे धन्यवाद.
डॉ. तुमच म्हणण पटल.
पक्या तुम्ही दिलेल पुष्पावली नाव आवडल.
रांगोळीचा नेमका अर्थ काय होतो ते जाणकारांना माहीत असेल. कदाचित रांगेत काढलेल्या ओळी, रंगांच्या ओळी मलाही माहीत नाही.

विसोबा खेचर's picture

4 Oct 2010 - 12:25 pm | विसोबा खेचर

शब्द नाहीत..!

तात्या.

--
आमच्या संगीताच्या सार्‍या व्याख्या अन् अपेक्षा इथे पूर्ण होतात!

shiv shankar rajguru's picture

4 Oct 2010 - 5:03 pm | shiv shankar rajguru

तुमचि कल्पकता सुरेख आहे