भारतात हे असं होताना कधी दिसणार?

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
27 Sep 2010 - 10:41 am
गाभा: 

मूलभूत शिक्षण फुकट उपलब्ध व्हावे या ध्यासातून तयार झाले १६०० दृक्-श्राव्य पट...

भारतात हे असं होताना कधी दिसणार?

Please go to www.khanacademy.org

प्रतिक्रिया

गांधीवादी's picture

27 Sep 2010 - 10:46 am | गांधीवादी

वाचून हे आठवले.
खान ऍकॅडमी

अविनाशकुलकर्णी's picture

27 Sep 2010 - 3:45 pm | अविनाशकुलकर्णी

भारतात हे असं होताना कधी दिसणार???

आपण सारे मिपा मंडळेी असे करु शकतो...आपण सार्यांनेी मनावर घेतले तर शक्य होईल.....असे वाटते...

गांधीवादी's picture

27 Sep 2010 - 5:28 pm | गांधीवादी

चांगला विचार आहे. तज्ञांनी मार्गदर्शन केल्यास नक्की पुढे पाऊल पुढे पडू शकते.

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Sep 2010 - 5:34 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्तच!!!

विकास's picture

27 Sep 2010 - 7:11 pm | विकास

असे भारतातही होत आहे. आपले सगळ्यांचेच लक्ष हे अधुनिक (स्पर्धात्मक) शिक्षण आणि शहरी/निमशहरी समाजाकडे असल्याने (थोडे टोकाचे उदाहरण म्हणून) तेथे फुकटचे कोचींग क्लासेसच्या नोट्स मिळणारी संकेतस्थळे यांच्याकडे नकळत जाऊ शकते आणि वाटू शकते की असे काही होत नाही.

या संदर्भात शेतकर्‍यांना माहीती आणि शिक्षण मिळण्यावरून चालू असल्याचे (सरकारी आणि खाजगी/विनानफा तत्वावर) ऐकलेले आहे. आत्ता दुवा नाही.

अशोक खोसला यांची डेव्हलपमेंट आल्टरनेटीव्ह ही संस्था आणि त्या संस्थेचाच तारा-अक्षर नावाचा एक प्रकल्प पहा ज्यात अशिक्षितांना किमान वाचता येईल इतके शिकवले जाते. हे आजच्या घडीस तितकेच महत्वाचे आहे.

असे अजून अनेक आहेत. वेळ मिळाल्यास लिहीन...

गोरिला's picture

27 Sep 2010 - 8:43 pm | गोरिला

हा प्रश्न पुणेरी पाटीवर हवा होता .

अहो इथे फ्रेश हवा हवी तर tax वसुली करावी असा विचार मंत्री मंडळ करती आणि तुम्ही...................

चतुरंग's picture

27 Sep 2010 - 8:55 pm | चतुरंग

फारच उपयुक्त दिसते आहे हे काम.
दुव्याबद्दल धन्यवाद युयुत्सु! :)

चतुरंग