गुपित !

अथांग's picture
अथांग in जे न देखे रवी...
27 Sep 2010 - 1:45 am

शब्दांचे किती-कसे,
उभे आडवे वळसे..
भाव ओथंबले त्यात,
ओठीं काही येत नसे !

हो, डोळे बोलतात कधी,
भाषा एक साधी-सुधी..
ज्याची त्याला समजावी,
कुणी-कुण्णी नको मधी !

काही हलके इशारे,
उभ्या अंगाला शहारे...
भर उन्हातही जणु,
मनभर गार वारे !

क्षणी असे हरवणॆ,
आणि पुन्हा गवसणॆ...
तुझी-माझी लपाछपी,
सार्‍या गावाचे बहाणे !!

कविता

प्रतिक्रिया

राघव's picture

27 Sep 2010 - 2:32 am | राघव

मनभर गार वारे ... ही शब्दयोजना आवडेश. पु.ले.शु.

जुदिआ अर्थात जुने दिवस आठवले!

राजेश घासकडवी's picture

27 Sep 2010 - 10:50 am | राजेश घासकडवी

तिसरं कडवं मस्त जमलंय. शब्दांचे वळसे, गावाचे बहाणे हेही आवडलं. तिसऱ्या कडव्यात लयही छान जमली आहे. ती जर इतर कडव्यांत जमली असती तर बहार आली असती. लिहीत राहा.

नगरीनिरंजन's picture

27 Sep 2010 - 10:55 am | नगरीनिरंजन

अप्रतिम!

हो, डोळे बोलतात कधी,
भाषा एक साधी-सुधी..
ज्याची त्याला समजावी,
कुणी-कुण्णी नको मधी !

हे खासच.