जॉन मॅकक्रे ह्यांच्या In Flanders Field ह्या कवितेला We Shall Keep The Faith ह्या कवितेने उत्तर दिले आहे मोनिका मायकल ह्या अमेरिकन कवयित्रीने.
त्याच कवितेचा हा स्वैर अनुवाद.
तुम्ही सोपवलेल्या मशाली, विश्वास
आम्ही जपू
अविरत!
लालभडक खसखशीची फ़ुले
रणांगणावर पसरलेली
देताहेत संदेश आभाळाला
फ़्लॆंडर्सच्या रणावरील ते रक्त
केवळ अविस्मरीणयच!
ही मशाल आणि ही फ़ुले
नेहेमीच आठवण करून देतील
फ़्लॆंडर्सच्या रणात
शांतपणे निजलेल्यांची!
मूळ कविता
Oh! you who sleep in Flanders Fields,
Sleep sweet - to rise anew!
We caught the torch you threw
And holding high, we keep the Faith
With All who died.
We cherish, too, the poppy red
That grows on fields where valor led;
It seems to signal to the skies
That blood of heroes never dies,
But lends a lustre to the red
Of the flower that blooms above the dead
In Flanders Fields.
And now the Torch and Poppy Red
We wear in honor of our dead.
Fear not that ye have died for naught;
We'll teach the lesson that ye wrought
In Flanders Fields.
प्रतिक्रिया
19 Sep 2010 - 10:11 pm | श्रावण मोडक
जुगलबंदीच दिसतेय ही तर. छान.
20 Sep 2010 - 11:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
रूपांतर आवडलं.
20 Sep 2010 - 5:37 am | राजेश घासकडवी
मूळ कविता आणि अनुवाद दोन्ही आवडले. भाषांतरात थोडी शब्दांची काटकसर वाटली...
20 Sep 2010 - 5:22 pm | धनंजय
मॅकक्रेच्या हाकेला दिलेले आश्वासक उत्तर, आणि त्याचा अनुवाद आवडला.
23 Sep 2010 - 3:56 am | चित्रा
हे उत्तरही आवडले. मूळ कविता थोडी वेगळी वाटली. पण हा स्वैर अनुवाद आहे तर चांगलाच आहे.
एका कवितेतून दोन वेगवेगळ्या कविता (विडंबने नव्हे!) निपजल्या हे आवडले.