सख्या...

अथांग's picture
अथांग in जे न देखे रवी...
17 Sep 2010 - 11:42 pm

सलील कुलकर्णी यांचे - 'सखे कसे सांग तुला, अगदीच नाही भय' हे ऐकले आणि त्याची धून डोक्यात चांगलीच भिनली. पुढची कविता त्याच चालीवर सुचली. ती वाचताना प्रत्येक वेळी माझ्याकडून ह्याच चालीवर म्हंटली जाते.

सख्या कशी सांगु तुला मनाची या हुर-हुर..
दाह याचा सोसु कसा ? तू ही असा दूर-दूर...

मृगजळासम भासे कधी तुझा सहवास,
तापुनही मग थंड, माझे अगतिक श्वास...

घेऊनिया पंख नवे, स्वप्नदेशी उडे मन,
एकलेच मागे फ़िरे, आणि हरवून भान...

रानातील पायवाट, करु लागे खाणा-खुणा,
देह नवा पांघरोनी, पळू लागे मी ही पुन्हा..

थकुनिया जेंव्हा मग, होते काळीज हे चूर,
भिरभिर भटकुन, अंती डोळा महापूर !!!!

कविता

प्रतिक्रिया

प्राजु's picture

18 Sep 2010 - 2:05 am | प्राजु

चांगले आहे..

नगरीनिरंजन's picture

18 Sep 2010 - 9:07 am | नगरीनिरंजन

छान!

अवलिया's picture

18 Sep 2010 - 12:22 pm | अवलिया

छान !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Sep 2010 - 5:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता...!

-दिलीप बिरुटे

स्वानंद मारुलकर's picture

18 Sep 2010 - 9:10 pm | स्वानंद मारुलकर

मस्त!!

काव्यवेडी's picture

26 Sep 2010 - 10:51 pm | काव्यवेडी

अथान्ग च्या सगळ्याच कविता अर्थ पुर्ण आहेत.
तरी ही भाषा अगदी सहज, सुलभ !!!! छान !!!