कवितेला नाव देण्याची (ठेवण्याची) आमच्यात प्रथा नाही, पण इथे आपली चार अक्षरं प्रकाशित करायची म्हणजे तिचे आधी नामकरण करणे आवश्यक असल्याने ही नवी कला आत्मसात करायच्या प्रयत्नात आहे. जिथे काही नाव सुचणार नाही तिथे
कवितेची पहिली ओळच शीर्षकात घालावी म्हणते. हा मधला मार्ग चालून जावा अशी आशा आहे !
तुझ्या-माझ्या 'आपल्याचं',
हे 'माझं-तुझं' कधी पासुन ?
शरीरात वाहत्या रक्ताचं...
हे असं गोठणं कधी पासुन ?
तुझी-माझी एकरुपता
शब्दांत न मावणारी.....
मग भावनांना असं तराजूत
हे तोलणं रे कधी पासुन ?
स्वप्नांमध्ये मुक्तपणे
आपल्या पाखरांचं फिरणं --
अन अचानक व्यवहारी
हे असं बोलणं कधी पासुन ?
तुझं-माझं दोघांचं,
अद्वैताचं नातं ना ?
मग हात सोडून अनोळखी,
हे चालणं रे कधी पासुन ?
प्रतिक्रिया
15 Sep 2010 - 4:25 am | नंदू
आवडली.
15 Sep 2010 - 11:49 am | अनुप बंगाली
" कधी पासुन " हे नाव कसे वाटते ???
कविता तर खुपच आवडली & हे नाव सुचले...
अनुप...
15 Sep 2010 - 11:31 pm | अथांग
मला वाटते की मी तेच नाव दिलेय! असेही कोणी म्हंटलेच आहे, ' ग्रेट माइंड्स थिंक अलाईक ' !!
आपली उगीच गम्मत हो. मिपाकरांच्या स्पेशल भाषेचे मला अजून एवढे ज्ञान नाही, पण काय
म्हणतात ते..हलके घ्या..हो ना?
अभिप्रायासाठी खूप सारे आभार, अनुप.
15 Sep 2010 - 4:10 pm | चिंतामणराव
"स्वप्नांमध्ये मुक्तपणे
आपल्या पाखरांचं फिरणं --
अन अचानक व्यवहारी
हे असं बोलणं कधी पासुन ?"
आवडलं हे कडवं. छान आहे कविता.
15 Sep 2010 - 11:39 pm | अथांग
दिवसभराच्या कामाच्या धावपळीत काहीतरी हलके-फुलके वाचायला मिळाले तर लोकांना हवे असते.याला मी पण अपवाद नाही. त्यात माझ्या या थोड्याशा सिरीयस कविता वाचून, त्याला अभिप्राय देऊन आपण सर्वजण जे प्रोत्साहन देताय ना, खूप बरे वाटते. आभार !!!
अथांग...
16 Sep 2010 - 1:39 am | NEWYORKER
कवितेचा आशय गहन असूनही आपण तो साधे पण प्रभावी शब्द वापरुन अचूकपणॆ साधला आहे.
आपले अभिनंदन!
16 Sep 2010 - 1:50 pm | काव्यवेडी
अगदी सोप्या शब्दात खूप खोल विचार व्यक्त होतात.
आणि पट्कन अर्थ मनाला भिडतो !!!! अभिनन्दन !!