मी आज ही त्या रक्ताच्या शोधात आहे.
ज्यांनी अटकेपार झेंडे गाढले.
मी आज ही त्या रक्ताच्या शोधात आहे.
ज्यांनी मराठी मनगटांना
स्वराज्याचे बळ दिले......
आज जो मराठ्यांना पुन्हा
लढायला लावेल...
हर हर महादेव पुन्हा
गगन भेदून राहेल.....
फूंकून रणशिंग ज्याने आकाशालाही आव्हान दिले..
मी आज ही त्या रक्ताच्या शोधात आहे...
पूर्वी सारखे आज ही
परकीय आक्रमण वाढत आहे....
माझ्याच मातीत आज माझी
मराठी गाढली जात आहे.....
सावरण्या तिचा हात मला बळ देणारा हवा आहे..
मी आज ही त्या रक्ताच्या शोधात आहे...
-पंचम..
प्रतिक्रिया
11 Sep 2010 - 12:25 pm | शानबा५१२
म्हणजे दुस-यामधे शोधायच................आपला ढनढन गोपाल...हो का?
11 Sep 2010 - 2:01 pm | पंचम
नाही कदाचित कविता मराठीत असल्यामुळे तुम्हाला समजली नसावी...माफी असावी..!
11 Sep 2010 - 1:30 pm | गांधीवादी
मी त्या रक्ताच्या शोधात आहे....
शोधून सापडल्यावर, आम्हाला पण कळवा.
11 Sep 2010 - 1:57 pm | पंचम
अवश्य..!! त्याची चिंता तुम्ही करू नये..!
11 Sep 2010 - 2:19 pm | निखिलेश
कविताच आहेना ती !!
13 Sep 2010 - 10:47 am | गंगाधर मुटे
छान विररसातील कविता.
13 Sep 2010 - 10:52 am | llपुण्याचे पेशवेll
आम्ही पण त्याच रक्ताच्या शोधात आहोत. म्हणजे आमच्यात आहे ते रक्त सळसळत अजून पण आमचे रक्त किरकोळ आहे. आम्ही घाऊक रक्ताच्या शोधात आहोत. मिळाले की कळेलच.