रसिक मिपाकर,
माझी मिपासाठी पहिलीवहिली रचना,
शाळा-कॉलेजाच्या दिवसांमध्ये लिहिलेली..
षड्ररसांनी भरलेल्या आपल्या प्रतिक्रिया अपेक्षीत...
आठवण
याद आहे अजून मजला,
श्रावणातल्या त्या बरसातीची |
याद आहे अजून मजला,
चित्त चिंब भिजविणार्या
त्या नाजूक श्रावणधारांची ||
कसा विसरेन मी,
तुझी ती पावसातील सोबत |
तुझ्या अन त्या श्रावणगगनाविना
भान न दुजाचं होतं मला
प्रेमाच्या पवित्र त्या नगरीत ||
तुझ्या मनातलं सारं काही
सांगत होत्या त्या जलधारा |
अबोल,नि:शब्द माझ्या मनाला,
बोलका करु पहात होता वारा ||
चालला होता श्रावणघनही तो ,
आपुल्याच मस्तीत |
नवप्रीतीचा संदेश देत घेत,
दोन मनं होता जुळवितं ||
धरती-मिलनासाठी जरी आकाश,
तडपत होते एकले,अधांतरी |
तृप्त धरणीला पाहून मात्र,
हसले होते,सुखावले होते अंतरी ||
थेंबागणिक कोमल कळी का होती उमलत,
अजूनही न उमजे मजला |
श्वासागणिक हळवी प्रीत का होती बहरत
अजूनही न कळे मजला ||
प्रिय, असाच श्रावण या जीवनी
आणखी बरसेल का?
अशीच श्रावणसोबत तेव्हा,
प्रिय तू देशील का?
प्रतिक्रिया
9 Sep 2010 - 8:52 pm | पैसा
पावसासारखीच छान!
9 Sep 2010 - 10:18 pm | विलासराव
आवडली.
10 Sep 2010 - 1:56 pm | काव्यवेडी
कविता आवडली. . त्या दिवसान्ची आठवण देवुन गेली.
धन्यवाद !!!
10 Sep 2010 - 10:39 pm | विश्नापा
धन्यवाद!