एक कविता....(हे कवितेचे नाव नाही) पण शीर्षक हवेच...मग काय करा?

अथांग's picture
अथांग in जे न देखे रवी...
9 Sep 2010 - 5:10 am

प्रथमच मिपावर काही लिहु धजत आहे. गेले काही दिवस येथे वाचन करत आहे, प्रतिक्रिया बघत आहे..यावर माझी प्रतिक्रिया अशी की आपण आपले वाचक म्हणूनच रहावे. कशाला उगीच काही पोस्ट करण्याचा आटापिटा? पण आज मनाचा हिय्या करुन माझी पहिली कविता आपणांसमोर ठेवत आहे. तिचे पोस्टमार्टम होवु शकते याची पूर्ण कल्पना आहे. ते झाले तरी कवितेचा "आत्मा" माझ्यापुरता तरी मी सांभाळून ठेवेनच! बाकी मिपावरची दर्दी मंडळी जे काही पदरात टाकतील ते गोडच असेल असा माझ्यापुरता समज मी करुन घेत आहे, किंवा ते गोड'च' मानून घेण्याची मनाची तयारी पण करत आहे.
कवितेला नावे नाहीत कारण पूर्ण कवितेची भावना अशी एका/काही शब्दात कशी बांधायची याबद्दल मनात बराच संभ्रम आहे. त्यामुळे माझी कविता ही जो जो जशी वाचेल तशी त्यालाच अर्पण...

कुठला ना बंध
ना कुठला दुवा...
वाऱ्यावरती झुंजत झुंजत
लढत चाललो खुळा !

रुजण्याचे भाग्य ना मजला,
ना जगण्याचे भान,
आठवणींचे हिंदोळे अन
साठवणींचे गान !

ना एक ठिकाणा माझा,
ना वसण्याचे वरदान -
मी न कुणाचा जिवलग
ना माझी कोणी जान !

आज इथे तर उद्या तिथे,
भरकटण्याचा शाप मला....
तरी वाऱ्याशी झुंजत झुंजत,
लढत चाललो खुळा,

मी पाचोळा, मी पाचोळा !!!

कविता

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

9 Sep 2010 - 8:00 am | पाषाणभेद

अथांग, लिहीत रहा हो. तुमच्या मनात येईल ते कागदावर (येथे) उतरवत रहा. काळजी करू नका.

धनंजय's picture

9 Sep 2010 - 8:25 am | धनंजय

शुभेच्छा

मस्त कलंदर's picture

9 Sep 2010 - 9:56 am | मस्त कलंदर

छान कविता.. वाचताना मला "मी मोर्चा नेला नाही" ची आठवण झाली.

अथांग's picture

9 Sep 2010 - 12:42 pm | अथांग

मंडळी, वेळात वेळ काढून प्रोत्साहन दिलेत त्याबद्दल मनापासून आभार! आता (कीबोर्ड-रुपी) लेखणी उचलली आहेच, तर माघार नाही. काही ना काही खरडत राहू. आपल्या सबळ पाठिंब्याच्या कृपेने आता भीड पण चेपत आहे.

मस्त कलन्दर : संदीप खरेंच्या "मोर्चा" ची आठवण झाली म्हणता...भरुन पावलो !!!
धन्यवाद!

अश्विनीका's picture

9 Sep 2010 - 1:49 pm | अश्विनीका

छान आहे कविता , आवडली.

काव्यवेडी's picture

9 Sep 2010 - 2:14 pm | काव्यवेडी

तुमची कविता खुप आवडली. पण कवितेच्या भाषेवरुन लक्शात येतेय की
भाषा एकदम परिपक्व आहे. बरेच लिखान केले असणार !!
लिहित रहा. खुप शुभेच्छा !!!!

विश्नापा's picture

9 Sep 2010 - 7:21 pm | विश्नापा

करा आपलं मन इथे मोकळे!

पैसा's picture

9 Sep 2010 - 7:47 pm | पैसा

पोस्ट मार्टेम करणारे असतील तसे कौतुक करणारे पण भेटतील. छान लिहिलं आहे. आणि शेवटी आपण काय लिहिलं आहे हे प्रत्येकालाच माहिती असतं. सो, डोण्ट वरी!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Sep 2010 - 7:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रुजण्याचे भाग्य ना मजला,
ना जगण्याचे भान,
आठवणींचे हिंदोळे अन
साठवणींचे गान !

वरील ओळी आवडल्याच पण, ’आठवणींचे हिंदोळे अन साठवणींचे गान’ लै भारी.
अजून येऊ दे...!

-दिलीप बिरुटे

विलासराव's picture

10 Sep 2010 - 12:57 am | विलासराव

कविता आवडली.
लिहित रहा.