बंगलोरला धोका बीजिंगचा

मिसळभोक्ता's picture
मिसळभोक्ता in काथ्याकूट
5 Sep 2010 - 10:36 pm
गाभा: 

काही तथ्ये:

१. बंगलोरला दर वर्षी १ लाख नवीन नोकर्‍या तयार होतायत. बीजिंगला पाच लाख.
२. बंगलोरच्या घरंच्या किंमती ५ वर्षात दुप्पट झाल्यात. बीजिंगला दोन वर्षात.
३. बंगलोरच्या "आय आय एस सी" सोडल्यास एकाही विद्यापीठातून जगविख्यात लोक निघत नाहीत. बीजिंगला शिंघुआ तर आहेच, पण पेकिंग नॅशनल सारखी उत्तम उदाहरणे देखील आहेत.
४. बंगलोरला इंग्रजी भाषा सर्रास वापरली जाते. बीजिंगच्या इंजिनियर्स ला फारसे इंग्रजी येत, नाही. त्यामुळे बीजिंगच्या इंजिनियर्सना उत्कृष्ट काम करूनच त्यांची जागा मजबूत करायची असते. बंगलोरने आजवर त्यांच्या बोलबच्चनगिरीमुळे ती जागा व्यवस्थित सांभाळली आहे.
५. बंगलोरला एका अमेरिकन इंजिनियर ऐवजी ३ भारतीय नोकरीला ठेवता येतात, तेवढ्याच पैशात. त्यांचे आउटपुट एका अमेरिकन इंजिनियर एवढे असते. बीजिंगला ५, आणि त्यंचे ऑटपुट तीन अमेरिकन इंजिनियर्स एवढे असते. (माझ्याकडे ह्याची आकडेवारी स्वनुभवातून जमवलेली आहे.)
६. वर्क एथिक / लॉयल्टी मध्ये बंगलोरचा नंबर खूप खाली आहे. पैशांसाठी लोक जे२ईई देखील अभिमानाने करतात. बीजिंगला कुठल्याही कोअर टेक्नॉलॉजीशिवाय काहीही करणे आवडत नाही.
७. बंगलोरला जॉब मध्ये दोन वर्शे झाली, की लगेच म्यानेजमेंट करावीशी वाटते. बीजिंगला त्या डार्क साईडला जाणारे विरळा.

एकद बीजिंगने इंग्रजी शिकले, की बंगलोर खल्लास, ह्या मताचा मी झालोय. तुमचे काय मत आहे ?

(काळेकाका, पत्र पाठवा.)

प्रतिक्रिया

युयुत्सु's picture

5 Sep 2010 - 10:44 pm | युयुत्सु

\सहमत आहे. भारत महासत्ता होणे शक्य नाही कारण ते आपल्या रक्तात नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Sep 2010 - 10:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नी'हा!

सगळ्याच राजकीय पुढार्‍यांची मतं मला पटतात. म्हणून मी सगळ्याच भाषा शिकून घेते आहे!

मिसळभोक्ता's picture

5 Sep 2010 - 10:51 pm | मिसळभोक्ता

शेशे.

घरी परत गेल्यावर मँडारिन शिकणे आवश्यक आहे.

मिसळभोक्ता's picture

5 Sep 2010 - 10:50 pm | मिसळभोक्ता

बंगलोर अणि बीजिंगमध्ये एक निवडण्याचा निर्णय करण्यासाठी मला कंपनीने पाठवले. माझा निर्णय झाला. खरोखरच वेळेवर काम करून घ्यायचे असेल, तर (अमेरिकेव्यतिरीक्त) बीजिंग. कामाला उशीर का झाला, हे ग्राहकांना सुंदर भाषेत समजवून द्यायचे असेल, तर बंगलोर. बाय बाय बंगलोर.

मिभो,
कौतुक आहे तुमचं हा व्यावसायीक निर्णय पूर्णतः व्यावसायीक, कठोर पातळीवर घेतल्याबद्दल. पण एक सांगा कुठेतरी वाईट वाटलं का निर्णय घेतल्यानंतर ...... व्यक्तीशः ? काय आलं मनात की जे मनात आलं ते तुम्ही इथे शेअर केलत आहेत ऑलरेडी?

मिसळभोक्ता's picture

6 Sep 2010 - 10:53 pm | मिसळभोक्ता

फारसे कठोर वगैरे व्हावे लागले नाही. कॉमन सेन्स वापरायला हृदयावर दगड वगैरे ठेवावा लागत नाही.
व्यक्तिशः देखील अजीबात वाईट वाटलेले नाही. आय हॅव ऑलरेडी पेड माय ड्यूज. आय अ‍ॅम अ फ्री एजंट नाऊ.

छोटा डॉन's picture

7 Sep 2010 - 7:14 am | छोटा डॉन

>>बंगलोर अणि बीजिंगमध्ये एक निवडण्याचा निर्णय करण्यासाठी मला कंपनीने पाठवले. माझा निर्णय झाला.

ओह्ह, ओक्के !!!
निर्णय झाला असेल तर अजुन पुढे बोलण्यात काय अर्थ ? कुठल्यातरी विशिष्ठ स्किलसेट्स आणि पुर्वानुभव किंवा अजुन कसल्या कसल्या गोष्टींची बॅलन्सशीट मांडुन तुम्ही 'निर्णय घेतला' असे समजतो.
आता ती प्रोसेस कंप्लिट झाल्याने अजुन पुढे काय बोलायचे ?

बाकी समजा अजुन निर्णय झाला नसेल तर आम्ही सुंदर भाषेत एवढी बडबड करु की तुम्हाला हे काम बिजींग सोडुन बेंगलोर द्यावे वाटेलच पण त्यापुढेही जाऊन अमेरिकेतले हापिस बंद करुन बेंगलोरात येऊन बसावे असे वाटेल ;)
आम्हाला बोलबच्चन काय उगाच नाय म्हणत :)

- छोटा डॉन

विंजिनेर's picture

5 Sep 2010 - 10:51 pm | विंजिनेर

सध्या बेंगलोरला धोका नाहिये. बेजिंगवासी भल्या मोठ्या ट्राफिक जाम मधे अडकल्येत सो रिल्याक्स :)

बायदवे, मिभो तुम्ही मजल-दरमजल करत कुठवर आलात? हाँगकाँग की बेजिंग?

मिसळभोक्ता's picture

5 Sep 2010 - 10:57 pm | मिसळभोक्ता

बीजिंगला फक्त पाच वर्षे द्या.

चायना मोबाईल रिसर्च इंस्टिट्यूटच्या प्रमुखाला भेटलो. त्याचे प्रकल्प पाहिले. त्यावरून २ वर्षेच फक्त, असे वाटले. व्हावे चे पण तसेच.

काई फू ली ने नवा व्हेंचर फंड सुरू केलाय. त्यामुळे भविष्य उज्ज्वल आहे.

पण बाकी लोकांना अद्याप इंग्रजी येत नसल्याने, मल्टिनॅशनल कंपन्यांसमोर ती समस्या आहे. पण ५ वर्षात हे सगळे बदलेल.

शिल्पा ब's picture

5 Sep 2010 - 10:55 pm | शिल्पा ब

चीनी लोक आक्रमक आहेत...त्यांचे नेतृत्व आक्रमक आहे...ते कोणत्याही महासत्तेला फाट्यावर मारतात जे आपल्या लोकांना जमत नाही...काम करण्यात हयगय करीत नाहीत जे आपल्याला उत्तम जमते...भारत महासत्ता होणे नजीकच्या काळात तरी शक्य नाही..केवळ दोनतीन आयटी कंपन्यांना चांगले दिवस आले कि संपूर्ण देश महासत्ता कसा काय होईल हे मला कधीच कळले नाही...

चीनचे infrastructure भारतापेक्षा चांगले आहे...आणि मुख्य म्हणजे तिथले नेतृव त्यांना हवे ते करू शकते...भारतात लोकशाही आहे..

मिसळभोक्ता's picture

5 Sep 2010 - 11:01 pm | मिसळभोक्ता

.आणि मुख्य म्हणजे तिथले नेतृव त्यांना हवे ते करू शकते

हे चूक आहे. माझ्याकडे ठोस उदाहरणे आहेत.

शिल्पा ब's picture

5 Sep 2010 - 11:05 pm | शिल्पा ब

कृपया दोनतीन उदा. द्याल का? मला माहिती नाहीत...
माझा असा समज होता कि communist देशात सरकार आर्मीच्या जोरावर (विरोध झाला तर ) हवे ते बदल करू शकते...त्यांना हवे ते प्रोग्राम राबवू शकते..

मिसळभोक्ता's picture

5 Sep 2010 - 11:17 pm | मिसळभोक्ता

१. रिंग रोड क्र. २ च्या आतली एकमजली घरे पाडून बहुमजली स्वस्त निवासिका बांधण्यात सरकार यशस्वी झालेले नाही.
२. रिंग क्र. ६ पर्यंत आगगाडी नेण्यात अद्याप जुन्या घरमालकांचा विरोध सरकारला मोडता आलेला नाही.
३. घरांच्या किंमती वाढू नयेत, ह्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न निश्फळ ठरलेले आहेत.

शिल्पा ब's picture

5 Sep 2010 - 11:19 pm | शिल्पा ब

ह्म्म्म...मी याविषयी नेटावर वाचते..धन्यवाद.

नितिन थत्ते's picture

6 Sep 2010 - 10:23 am | नितिन थत्ते

आँ !!!!!

आम्ही तर गेली कैक वर्षे ऐकत आलो की नेतृत्व (पक्षी=सरकार) जिथे तिथे लुडबुड करीत असे म्हणून भारताची प्रगती झाली नाही.

तुम्ही तर म्हणताय चीनचे नेतृत्व(पक्षी=सरकार) त्यांना महासत्ता बनवतंय म्हणता? मला वाटलं तिथले कॉर्पोरेटस् त्यांना महासत्ता बनवतायत.

मिसळभोक्ता's picture

6 Sep 2010 - 9:55 pm | मिसळभोक्ता

समजा सरकारच कॉर्पोरेट सारखे विचार करू लागले, तर काय होईल ?

हा विचार करा.

आणि तेच चीनमध्ये होत आहे हे समजा.

आर ओ आय हा विचार सरकारात होतो आहे.

बंगलोरला एका अमेरिकन इंजिनियर ऐवजी ३ भारतीय नोकरीला ठेवता येतात, तेवढ्याच पैशात. त्यांचे आउटपुट एका अमेरिकन इंजिनियर एवढे असते.

मग कामं बेंगळुरुला पाठवायचा काय फायदा ? का अमेरिकेत लोकच नाहीत ??

बाकी तिथं लेबर तुलनेनं येव्हढं स्वस्त आहे का ? (जे भारतात काही वर्षांपूर्वी होतं )

मिसळभोक्ता's picture

5 Sep 2010 - 11:14 pm | मिसळभोक्ता

जशा प्रकारचे लोक हवे आहेत, तसे लोक खरेच अमेरिकेत नाहीत. आहेत ते शोधणे खूप कठीण आहे.

गेली दहा वर्षे भारताचा रेट एकास तीन असा अमेरिकेच्या तुलनेत आहे. पण ते तीन नग असे असतात, की एका अमेरिकन इंजिनियर इतके काम करून घेणे त्यांच्याकडून कठीण असते.

बीजिंग मध्ये मला खूप उत्कृष्ट लोक मिळाले. आणि फक्त मलाच नाही, तर मायक्रोसॉफ्ट, गूगल ह्यांना देखील मिळाले.

२-३ वर्षात बीजिंगचा रेट पण एकास तीन होईल. पण ह्या तिघांकडून मी दोन अमेरिकन इंजिनियरचे काम करून घेऊ शकतो. नक्की.

समद्यानाच मॅनेजर बनायचे.
ग्राउंड लेव्हलला लढाइ करायला आणि प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करायला कोणी तयार नाही .

मिसळभोक्ता's picture

5 Sep 2010 - 11:21 pm | मिसळभोक्ता

आजवर बंगलोरच्या कुठल्यही कंपनीतला "आर्किटेक्ट" हा अमेरिकेतल्या सीनियर सॉफ्टवेयर इंजिनियर पेक्षा अधिक चांगला आढळलेला नाही.

ता. क. श्रेणी खालीलप्रमाणे:

सॉफ्टवेयर इंजिनियर
सीनियर सॉ इं
टेक्निकल लीड
प्रिन्सिपल सॉ इं
सीनियर प्रिन्सिपल
आर्किटेक्ट
सीनियर आर्किटेक्ट

इ.

ह्या बद्द्ल जालावर माहिती कोठे मिळेल?

मिसळभोक्ता's picture

6 Sep 2010 - 10:00 pm | मिसळभोक्ता

कशाबद्दल माहिती हवी आहे ? श्रेणीबद्दल ? की बोलबच्चनांनी श्रेणीची कशी वाट लावलीये, याबद्दल ?

बोलबच्चनांनी श्रेणीची कशी वाट लावलीये, याबद्दल.

मिसळभोक्ता's picture

6 Sep 2010 - 10:50 pm | मिसळभोक्ता

तुम्ही भारतीय आयटी कंपनीत काम करता का ? असल्यास तिथल्या एका आर्किटेक्टचे नाव आणि फोन नंबर मला व्यनितून कळवा. मी त्याला फोन करतो, आणि आमच्या बंगलोर हापिसासाठी त्याची मुलाखत घेतो, आणि मग कळवतो तुम्हाला त्याचे निकाल.

(गंमत करतोय बरे का, नाहितर खरेच पाठवाल नाव आणि नंबर. आणि मग एथिक्सशून्य माणसांत तुमचीदेखील नोंद होईल.)

असो. उदाहरणे बरीच आहेत. खाजगी आहेत. त्यामुळे देऊ इच्छित नाही.

अवतार's picture

6 Sep 2010 - 11:41 pm | अवतार

http://in.answers.yahoo.com/question/index?qid=20100126004935AAv8XzS

पण त्यातही चिनी लोकाच्या इंग्रजी बद्द्ल ताशेरे ओढ्ले आहेत. तुमचा अनुभव काय आहे?

आजानुकर्ण's picture

6 Sep 2010 - 2:22 pm | आजानुकर्ण

भारतीय कंपन्यांमध्ये पदोन्नतीच्या चढती भांजणीतील लेबले वेगळी असू शकतात. हे म्हणजे आजवर भारताचा कोणत्याही राष्ट्राध्यक्षाला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाइतके हक्क नसतात असे म्हणण्यासारखे झाले.

छोटा डॉन's picture

6 Sep 2010 - 2:32 pm | छोटा डॉन

>>भारतीय कंपन्यांमध्ये पदोन्नतीच्या चढती भांजणीतील लेबले वेगळी असू शकतात.
+१, हेच म्हणतो.
इनफॅक्ट ही लेबले क्षेत्र ( उदा सॉफ्टवेअर, सर्व्हिसेस, ऑटो, बीपीओ ) व देश ह्याप्रमाणे बदलतात.

उदा :
समजा ऑटो क्षेत्रातल्या बेंगलोरमधल्या एखाद्या 'क्ष' या कंपनीत 'अ' हा इंजिनीयर ५ वर्षे अनुभव झाल्यानंतर 'टीम लिड' चे काम करत असेल तर त्याच्याएवढाच अनुभव असलेला पुण्यातल्या 'क' ह्या कंपनीतला इंजिनीयर त्याच्या बार्गेनिंग पॉवरप्रमाणे 'डेप्युटी मॅनेजर किंवा मॅनेजर' म्हणुन मिरवतो.
मात्र तेवढ्याच अनुभवाचा ( ज्ञानाचा नव्हे, त्याबद्दल वेगळी चर्चा होऊ शकते, त्याचेही बरेच पैलु आहेत, ज्ञान असुन जर ते सांगता किंवा दाखवता येत नसेल तर ते युसलेस ज्ञान आहे असे आमचे सुपरिचित मत आहे ) जर्मनीत 'ख' ह्या कंपनीत बसलेला इंजिनियर हा केवळ 'इंजिनियर'च असतो तर अमेरिकेत त्याच पातळीवर तो 'इंजिनियर किंवा टेक्निशियन' असु शकतो.

ह्यावर काय मत आहे ?

- छोटा डॉन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Sep 2010 - 2:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण प्रोफेसरपद मात्र कोणत्याच देशात सहजासहजी मिळू शकत नाही!

प्रोफेसरपद मात्र कोणत्याच देशात सहजासहजी मिळू शकत नाही!

आपल्याकडे बरेचदा आसि. लेक्चरर स्वतःला प्राध्यापक म्हण्वून घेतात
आणि क्लासेस चालवणारे प्रोप्रायटर स्वतःला प्रोफेसर असे म्हण्वून घेतात.
: ..........कधितरी अशाच प्रकारचा प्राध्यापक असलेला विजुभाऊ

परिकथेतील राजकुमार's picture

6 Sep 2010 - 6:46 pm | परिकथेतील राजकुमार

आपल्याकडे बरेचदा आसि. लेक्चरर स्वतःला प्राध्यापक म्हण्वून घेतात
आणि क्लासेस चालवणारे प्रोप्रायटर स्वतःला प्रोफेसर असे म्हण्वून घेतात.

काही काही रायटर पण स्वतःला प्राध्यापक म्हणवुन घेतात असे मध्ये पुनम मध्ये झालेल्या गजालीत ऐकल्याचे स्मरते.

मिसळभोक्ता's picture

6 Sep 2010 - 10:07 pm | मिसळभोक्ता

नोकरीला लेबल काय लावायचे हे कंपन्यांच्या हाती असते. ते लेबल देशांनुसार बदलू शकते.

परंतु श्रेणी पेक्षा पगाराची लेव्हल महत्त्वाची.

समजा अमेरिकेत कॉलेजातून नुकतेच बाहेर पडलेल्याला वर्षाला ७५००० यूएस्डी मिळत असतील, तर भारतातील कॉलेजातून बाहेर पडलेल्याला वर्षाला सहा लाख मिळतात. म्हणजे हे गुणोत्तर झाले १:६ असे. २-३ वर्षांचा अनुभव असला की सुरुवातीचे ३५% दरवर्षी पगारवाढीचे ध्येय लक्षात घेता, १:३ हे पगारांचे गुणोत्तर येते.

सीनियर सॉफ्टवेयर इंजिनियर आनी आर्किटेक्ट ह्यांच्यातील पगाराचे गुणोत्तर १:२ आहे.

म्हणजे भारतातील आर्किटेक्टने साधारणतः अमेरिकेतील प्रिन्सिपल इंजिनियर (७-८ वर्षे अनुभव) इतके काम करावे ही अपेक्षा.

पण खेदाची बाब अशी, की सदर लोक ४-५ वर्षाच्या अनुभवी लोकांएवढे काम करतात.

आजानुकर्ण's picture

6 Sep 2010 - 2:23 pm | आजानुकर्ण

भारतीय कंपन्यांमध्ये पदोन्नतीच्या चढती भांजणीतील लेबले वेगळी असू शकतात. हे म्हणजे आजवर भारताचा कोणत्याही राष्ट्राध्यक्षाला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाइतके हक्क नसतात असे म्हणण्यासारखे झाले.

अर्धवटराव's picture

5 Sep 2010 - 11:20 pm | अर्धवटराव

पण मुख्य मुद्दा असा कि बंगलोर (केवळ प्रातिनिधीक... हैदराबाद, पूणे काहि वेगळे नाहि) यापासुन काहि धडा घ्यायला तयार नाहि.

(आय. टी. वाला) अर्धवटराव

भारतीय असल्याचा पुरावाच नष्ट करायल निघाले तुम्ही तर? असले धडे वगैरे घेणे आमच्या रक्तात नाही..

मिसळभोक्ता's picture

5 Sep 2010 - 11:25 pm | मिसळभोक्ता

मान्य आहे.

रोमेनियातले बुखारेस्ट हे असेच शहर आहे (बीजिंगसारखे).

तिथे तर आणखी स्वस्ताई, संस्कृती, आणि ज्ञानाचे भांडार आहेत.

चिरोटा's picture

5 Sep 2010 - 11:45 pm | चिरोटा

नक्की? मला काही खास अनुभव नाही आला तिकडे.अर्थात लोकसंख्या खूपच कमी आहे त्यांची. पण घरे स्वस्त वगैरे नाही आहेत्. ज्ञानाचे भांडार? कुठल्या क्षेत्राबाबत म्हणताय ?

छोटा डॉन's picture

5 Sep 2010 - 11:30 pm | छोटा डॉन

ह्या लेखाचे शिर्षक वाचुन मिभोकाका आता पुढच्या दौर्‍यासाठी बीजिंगहुन डायरेक्ट बेंगलोरला येणार आहेत असा आमचा ग्रह झाला ;)
आता तो 'धोका' हा वेगळाच आहे असे समजले.

असो, बाकी ह्या विषयावर सविस्तर प्रतिसाद देईनच पण तुर्तास "कॉस्ट" ह्याबाबत मिभोकाकांचे काय म्हणणे आहे ते जाणुन घ्यायला आवडेल.
शिवाय "अमेरिकन घड्याळाप्रमाणे इथले इंजिनियर्स ( सर्वच नाही ) जे काम करतात तसे बीजिंगबाबत शक्य आहे" हे ही विचारतो.

- ( संभाव्य धोक्यामुळे (मिभोकाकांचा दौरा नव्हे) बेंगलोर सोडायच्या बेतात असलेला ) छोटा डॉन

मिसळभोक्ता's picture

5 Sep 2010 - 11:39 pm | मिसळभोक्ता

कॉस्ट हा चुकीचा शब्द आहे.

आर ओ आय, बघा. ऑपेक्स नको, असे आमचे मत सुपरिचित आहे.

डॉनराव, आपण बंगलोरात आहात असे कळते.

तुमचे मत कळलेले आवडेल.

वरवर काही तरी थातुरमातुर करून गंडवणे हा बंगलोरचा मुख्य धंदा आहे असे आमचे मत आहे. त्यावर तुमचे काय मत आहे ?

चिरोटा's picture

6 Sep 2010 - 12:13 am | चिरोटा

१. बंगलोरला दर वर्षी १ लाख नवीन नोकर्‍या तयार होतायत. बीजिंगला पाच लाख.

आय टी की एकूण सर्वच?

२. बंगलोरच्या घरंच्या किंमती ५ वर्षात दुप्पट झाल्यात. बीजिंगला दोन वर्षात.

गेल्या तीन वर्षात कीमती फार वाढलेल्या नाहीत.३५ लाखाचा ३ वर्षापूर्वीचा फ्लॅट ३८-३९ लाखापर्यंत आता मिळतो.
(बीजिंगला दोन वर्षात दुप्पट झाल्या असतील तर बरेच आहे!!)

३. बंगलोरच्या "आय आय एस सी" सोडल्यास एकाही विद्यापीठातून जगविख्यात लोक निघत नाहीत. बीजिंगला शिंघुआ तर आहेच, पण पेकिंग नॅशनल सारखी उत्तम उदाहरणे देखील आहेत.

हम्म. Third world countries मध्ये हा प्रॉब्लेम पूर्वीपासून आहे.चीनची आता सरशी झाली आहे हे मान्य.ACM मध्ये पण caltech,Berkeley ऐवजी रशिया किंवा हे लोक असतात.

४. बंगलोरला इंग्रजी भाषा सर्रास वापरली जाते. बीजिंगच्या इंजिनियर्स ला फारसे इंग्रजी येत, नाही. त्यामुळे बीजिंगच्या इंजिनियर्सना उत्कृष्ट काम करूनच त्यांची जागा मजबूत करायची असते. बंगलोरने आजवर त्यांच्या बोलबच्चनगिरीमुळे ती जागा व्यवस्थित सांभाळली आहे.

अमेरिकन गोर्‍या लोकांना बोलबच्चनगिरी आवडते असा माझा(आणि बर्‍याच लोकांचा) अनुभव आहे.शिवाय भारतिय अभियंते जास्त बोलत नाहीत असे गोर्‍या लोकांकडून ऐकले आहे.

५. बंगलोरला एका अमेरिकन इंजिनियर ऐवजी ३ भारतीय नोकरीला ठेवता येतात, तेवढ्याच पैशात. त्यांचे आउटपुट एका अमेरिकन इंजिनियर एवढे असते. बीजिंगला ५, आणि त्यंचे ऑटपुट तीन अमेरिकन इंजिनियर्स एवढे असते. (माझ्याकडे ह्याची आकडेवारी स्वनुभवातून जमवलेली आहे.)

तेवढ्याच पैशात आउटपूट तेवढेच असेल तर उपद्व्याप कराच कशाला तो?(कुशल टॅक्सी चालकाचे ड्राय्व्हींग सामान्य टॅक्सी चालकापेक्षा दुप्पट चांगले असु शकेल्.सॉफ्टवेयर्/अभियांत्रिकीत तो फरक बर्‍याच प्रमाणात असु शकतो(बर्‍याचवेळा असतोच. उ.दा. चांगला तंत्रज्ञ सामान्य तंत्रज्ञापेक्षा २५ पट चांगला असु शकेल.)थोडक्यात तंत्रज्ञ कुशल असेल तर त्याचा जॉब दुसर्‍या किनार्‍यावर जाण्याची शक्यता कमी.(भारतात आय टी संबंधीत येणारे जॉब्स हे बर्‍याच वेळा grunt work टाइपचे असतात्.अर्थात ह्याला अपवादही आहेत.)

६. वर्क एथिक / लॉयल्टी मध्ये बंगलोरचा नंबर खूप खाली आहे. पैशांसाठी लोक जे२ईई देखील अभिमानाने करतात. बीजिंगला कुठल्याही कोअर टेक्नॉलॉजीशिवाय काहीही करणे आवडत नाही.

वर्क एथिक, येस. पण ह्या घाणीला कंपन्याच कारणीभूत नाहीत का? पूर्वी भारतात सगळीकडेच एकदा लोक कुठेही चिकटले की चिकटायचेच की!! बॅन्क असो वा कंपनी वा रेल्वे. आणि J2EE अभिमानाने म्हणजे? जवळपास सगळ्याच कंपन्यांनी Y2K सोडवल्यावर जावाच्या नावाने तुतार्‍या फुंकल्याच की! त्यात भारतिय पण सामिल झाले.आता क्लाउडच्या नावाने कंपन्या ढोलकी वाजवत आहेत.

७. बंगलोरला जॉब मध्ये दोन वर्शे झाली, की लगेच म्यानेजमेंट करावीशी वाटते. बीजिंगला त्या डार्क साईडला जाणारे विरळा.

हम्म. हा कल्चरचा प्रॉब्लेम आहे.४५ वर्षाचा अभियंता हे ऐकायलाच काहीतरी वाटते. तो मॅनेजरच पाहिजे!!

शिल्पा ब's picture

6 Sep 2010 - 12:17 am | शिल्पा ब

किती वेळा एकाच प्रतिसाद update करताय?

चिरोटा's picture

6 Sep 2010 - 12:20 am | चिरोटा

किती वेळा एकाच प्रतिसाद update करताय

माझा एकच प्रतिसाद होता. मग एकच प्रतिसाद्च अपडेट करणार ना?

मिसळभोक्ता's picture

6 Sep 2010 - 10:38 pm | मिसळभोक्ता

आय टी की एकूण सर्वच?

सर्व.

हम्म. Third world countries मध्ये हा प्रॉब्लेम पूर्वीपासून आहे.चीनची आता सरशी झाली आहे हे मान्य.ACM मध्ये पण caltech,Berkeley ऐवजी रशिया किंवा हे लोक असतात.

"ऐवजी" नाही, "बरोबरच" हा शब्द जास्त योग्य ठरेल.

अमेरिकन गोर्‍या लोकांना बोलबच्चनगिरी आवडते असा माझा(आणि बर्‍याच लोकांचा) अनुभव आहे.शिवाय भारतिय अभियंते जास्त बोलत नाहीत असे गोर्‍या लोकांकडून ऐकले आहे.

फूल मी वन्स, फूल मी ट्वाईस.. वगैरे वगैरे. "बंगलोरच्या टीम ने काय सांगितले ? तीन महिन्यांचा वेळ मागितला ना ? मग आपण ९ महिने धरू." हे वाक्य मी स्वतः गेल्या आठवड्यात ३ दा ऐकले आहे.

हम्म. हा कल्चरचा प्रॉब्लेम आहे.४५ वर्षाचा अभियंता हे ऐकायलाच काहीतरी वाटते. तो मॅनेजरच पाहिजे!!

का ? वयाच्या वीस बाविसाव्यावर्षी हा माणूस अभियंता झाला, मग गेली पंचवीस वर्षांचा त्याचा तंत्रज्ञानाचा अनुभव काहीच किंमतीचा नाही का ?

निखिल देशपांडे's picture

6 Sep 2010 - 12:07 am | निखिल देशपांडे

म्हणुनच बंगालुरु च्या कंपन्या बिजिंग मधुन काम करायचे स्वप्न पहात असाव्यात.

इन्फि ने साधारण २००३ च्या आसपास चायना मधे सब्सिडरी सुरु केली.
टिसीएस ने ही २००२ मधे चीन मधे काम सुरु केली. टिसीएस चे चीन मधे पाच सेंटर्स आहेत. या कंपन्या सुद्धा तिथे जम बसवायचा प्रयत्न करतच आहेत.

चीन चा तुम्ही वर्तवलेला धोका भारतीय कंपन्यांना नक्कीच आहे, यातल्या काही कंपन्या सध्या अमेरिकेतुन मिळणारे काम चायना मधुन पण डिलीवर करत आहेतच. त्यामुळे कंपन्या कदाचीत टिकतीलही पण त्यांचा कर्मचार्‍यांचे काय???

चतुरंग's picture

6 Sep 2010 - 12:52 am | चतुरंग

अगदी खरे आहे तुमचे निरीक्षण. बीजिंग इज गोइंग टु सरपास बेंगलोर/हैद्राबाद/पुणे (चेन्नै बद्दल मी इतके ठाम विधान करु शकणार नाही कारण मला चेन्नैचा अनुभव नाही. पण तमिळ लोक तसे एक्सेंट्रिक आणि चिवट असतात त्यामुळे ते कदाचित ह्या बदलाला वेगळ्या प्रकारे सामोरे जातीलही.)

आमच्या कंपनीच्या तैवानमधल्या आणि त्यानंतर शांघायमधल्या हाफिसात मी काही महिन्यांपूर्वी गेलो होतो. इंजिनिअरांना इंग्लिश फार कमी येते. प्रत्यक्ष काम करुनच त्यांना आपली जागा सिद्ध करावी लागते. भारतातले इंजिनिअर्स आणि तिथल्या इंजिनिअर्स मधे फरक जाणवतो. एखादी गोष्ट मुळापासून समजून घेण्याची गरज त्यांना जाणवते. शांघाय टेक्निकल इंस्टिट्यूट मधे जगातले यच्चयावत नवनवीन कोर्सेस अगदी नॅनोटेक्नॉलॉजीसकट आहेत. तिथल्या इंजिनिअरशी बोललो त्यांची सगळी इंजिनिअरिंग टेक्स्टबुके सुद्धा मँडरिनमधेच आहेत. इंग्लिश ते अगदी जुजबीच वापरतात. आपल्याकडे थोडेफार माहिती झाले की इकडून तिकडून उचलेगिरी करुन कधी एकदा लॅडरमधे वरती सरकतोय असे होऊन जाते. त्याने सगळ्यात मोठा धोका हा असतो की नेमकी ग्रासरुट लेवलला कोणत्या स्किलसेटची गरज आहे, कामासाठी कोणता काँपिटन्स आवश्यक आहे ह्याचा आवाका मॅनेजमेंटला येतच नाही काही कारण मिडल लेवल मॅनेजर्स बर्‍याचदा असे अर्ध्या हळकुंडात वर सरकलेले असतात.

वरती डॉनरावांनी अमेरिकन घड्याळाप्रमाणे काम करण्याबद्दल विचारले आहे - होय तिथले इंजिनिअर्स काम करतात. मी संध्याकाळी साडेपाचला ईमेल पाठवलेली असली तर शांघायमधे/तैवानमधे सकाळचे साडेपाच झालेले असतात. हटकून तासा दीडतासात उत्तर आलेले असते! वीडिओ कॉन्फरंसिंग तर सतत चालूच असतात. सकाळी ७ ते रात्री १०-११.

एकूण चित्र असे आहे की भारतातल्या लोकांनी ह्या गोष्टींचा अंदाज तातडीने घेऊन पावले उचलायला हवीत अन्यथा दिवस अवघड होत जाणार आहेत!

सुनील's picture

6 Sep 2010 - 2:16 am | सुनील

आयटीमध्येही भारत इंचा-इंचाने माघार घेतोय तर! (छ्या. पत्र पाठवायलाच हवं!)

चतुरंग's picture

6 Sep 2010 - 5:18 am | चतुरंग

घेताय का ड्राफ्ट करायला? ;)

सुनील's picture

6 Sep 2010 - 8:37 am | सुनील

ते काम सध्या जाकार्ताला आउट्सोर्स झालय म्हणतात!

ते बुदबळांच्या ड्राफ्टचे काय झाले की...

सहज's picture

6 Sep 2010 - 5:12 am | सहज

काय योगायोग बघा, काल आमच्याकडे डिनरला एक उच्चशिक्षीत मुळच्या बेजींगच्या तै होत्या. बरेच बोलणे झाले ह्या विषयावर.

फॅक्टरी वर्कर कमी पैशावर तसेच पांढरी कॉलरवाले देखील कमी पैशात काम करत आहेत. तसेच स्वःता ह्या तै त्यांच्या टिम मधील इतर मंडळी वेळेचा 'सुदूपयोग' कसा करतात व ह्या ताई किती राबतात व तसे राबायची त्यांची श्रमसंस्कृती आहे हे कळले त्यामुळे मुद्दा क्रमांक ५ शिक्कामोर्तब

तुम्ही भारतीय लोक फार छान इंग्रजी बोलता असे त्या ताईंनी अनेक वेळा ऐकवले, मिभोंनी एकच शब्द वापरला बोलबच्चन!

बाकी ह्या तैंचा मोठा भाउ पि एच डी, स्वताचा सॉफ्टवेयर डेव्हेलपमेंट बिझनेस फारसा चालेना म्हणून साईडबदली आता सिग्रेटी विकतो, बक्कळ पैसा कमावतो. आपल्याकडे किती जण पीएचडी करुन दोन्-चार वर्षात पूर्ण वेगळे क्षेत्र निवडतील?

मुक्तसुनीत's picture

6 Sep 2010 - 5:58 am | मुक्तसुनीत

१.. बंगलोरला दर वर्षी १ लाख नवीन नोकर्‍या तयार होतायत. बीजिंगला पाच लाख.
जसे बीजींग > बंगलोर तसे हैदराबाद, मुंबई, पुणे, दिल्ली, मद्रास यांचे काउंटरपार्टस उपलब्ध आहेत किंवा कसे याबद्दल आतापावेतो काही माहिती मिळाली का ?

२. बंगलोरच्या घरंच्या किंमती ५ वर्षात दुप्पट झाल्यात. बीजिंगला दोन वर्षात.
या मुद्द्याचा बीजींग बंगलोर वर मात करत आहे या मुद्द्याच्या दृष्टीने कसा उपयोग होईल ? (असलाच तर हा मुद्दा काउंटरपॉईंट नाही का होणार ? म्हणजे जर बीजींग मधे इतकी मागणी असेल तर त्याचा अर्था असा लावायचा का , की बीजींगला ऑल्टरनेटीव्ह तयार झालेला नाही. (जशी भारतातली उपरोक्त केंद्रे आहेत. ) )

३. बंगलोरच्या "आय आय एस सी" सोडल्यास एकाही विद्यापीठातून जगविख्यात लोक निघत नाहीत. बीजिंगला शिंघुआ तर आहेच, पण पेकिंग नॅशनल सारखी उत्तम उदाहरणे देखील आहेत.

हा मुद्दा बरोबर वाटतो खरा. आय आय् टी सारख्या संस्थाही चायनात असल्या पाहिजेत असे धरतो.

४. बंगलोरला इंग्रजी भाषा सर्रास वापरली जाते. बीजिंगच्या इंजिनियर्स ला फारसे इंग्रजी येत, नाही. त्यामुळे बीजिंगच्या इंजिनियर्सना उत्कृष्ट काम करूनच त्यांची जागा मजबूत करायची असते. बंगलोरने आजवर त्यांच्या बोलबच्चनगिरीमुळे ती जागा व्यवस्थित सांभाळली आहे.

ज्यांना इंग्रजी येते - म्हणजे जे तुमच्या भाषेत बोलबच्चन आहेत - त्यांचे काम (इंग्रजी चांगले येत असल्याने आपोआपच !) सरसकट निकृष्टच असते असे तुमचे म्हणणे असल्यास तुमचा मुद्दा रोचक आहे इतपत म्हणता येईल.

५. बंगलोरला एका अमेरिकन इंजिनियर ऐवजी ३ भारतीय नोकरीला ठेवता येतात, तेवढ्याच पैशात. त्यांचे आउटपुट एका अमेरिकन इंजिनियर एवढे असते. बीजिंगला ५, आणि त्यंचे ऑटपुट तीन अमेरिकन इंजिनियर्स एवढे असते. (माझ्याकडे ह्याची आकडेवारी स्वनुभवातून जमवलेली आहे.)

या आकडेवारीत कम्युनिकेशनही धरले आहे काय ?

६. वर्क एथिक / लॉयल्टी मध्ये बंगलोरचा नंबर खूप खाली आहे. पैशांसाठी लोक जे२ईई देखील अभिमानाने करतात. बीजिंगला कुठल्याही कोअर टेक्नॉलॉजीशिवाय काहीही करणे आवडत नाही.

हा मुद्दा मला कळला नाही. थोडा कळेल अशा विस्ताराने सांगितले तर आनंद होईल. माझ्याकडे आकडेवारी नाही पण एकंदर भारतीय कंपन्या हमाली करत करत का होईना , पण साधारण दहाएक वर्षांत तीन-चारशे मिलियन्स च्या टर्नओव्हरच्या टप्प्यापर्यंत येतात. विप्रो-इन्फि-टाटा सारखे लोक जास्त यशस्वी कारण जास्त हमाल एकदम कामाला लावतात. यापेक्षा वेगळे बीजींगचे लोक नक्की काय करतात ?

एकद बीजिंगने इंग्रजी शिकले, की बंगलोर खल्लास, ह्या मताचा मी झालोय. तुमचे काय मत आहे ?

तुमच्या मुद्द्यात अर्थातच तथ्य वाटते. परंतु काही "फिल इन द ब्लँक्स" हव्यात असे वाटले.

येत्या दहा वर्षांत अ‍ॅपल/ऑर्कल/मासॉ यांच्याशी स्पर्धा करणारे प्रोडक्ट बीजींगमधून येईल असे तुम्हाला वाटते काय ? की तुमची सर्व निरीक्षणे सर्व्हिस-ओरिएंटेड धंद्यापुरतीच आहेत ? तसे असेल तर , वोंट दे कम अ लिटील शॉर्ट ऑफ युअर एक्स्पेक्टेशन्स ?

भारताच्या सॉफ्टवेअर सर्व्हिसेस च्या प्राबल्याला आव्हान रशियाकडून असेल असे मी साताठ वर्षांमागे ऐकत आलो. कदाचित त्यांच्याकडे संख्येने इतके हमाल एकदम नसतील. चायना मधे अर्थात तो प्रश्नच नाही.

तुमच्या लेखात बंगलोरच्या लोकांना (चोता दोन, तुम्हाला वैयक्तिक संबोधून नाही ! ) काही सल्ले असते तर आणखी चांगले झाले असते. अजूनही द्या. आनंद होईल.

सन्जोप राव's picture

6 Sep 2010 - 6:11 am | सन्जोप राव

एकंदरीत काहीतरी सनसनाटी लिहायचे आणि मग धूमधडाका उडवून द्यायचा अशा लिखाणाची सध्या मिसळपाववर चलती दिसत आहे. चला, मीही तसा एक लेख लिहायला घेतो.
स्वीपिंग स्टेटमेंट्स हा बागुलबुवासारखा दोष सोडला तर मिसळभोक्ता यांच्याशी सहमत होण्याला पर्याय दिसत नाही. भारतियांची प्रॉडक्टिव्हिटी (चुकून 'प्रॉडॉक्टिव्हिटी' लिहीत होतो ) यावर लिहिण्यासाठी ग्रीन कार्ड असावेच लागते का हा एक रोचक मुद्दा आहे. मुसुराव, यावर काही प्रकाश टाकता?

मुक्तसुनीत's picture

6 Sep 2010 - 7:06 am | मुक्तसुनीत

भारतियांची प्रॉडक्टिव्हिटी (चुकून 'प्रॉडॉक्टिव्हिटी' लिहीत होतो ) यावर लिहिण्यासाठी ग्रीन कार्ड असावेच लागते का हा एक रोचक मुद्दा आहे.

हाहा. नाही नाही. यू एस सिटीझनशिप लागते.
- बोलबच्चन-आय्टी-हमाल

चतुरंग's picture

6 Sep 2010 - 7:25 am | चतुरंग

खास रावांचा पंच!! ;)

(नॉनायटी)चतुरंग

सन्जोप राव's picture

6 Sep 2010 - 10:54 am | सन्जोप राव

सिटीझनशिपच. बरोबर. मग हिरव्या कोचावर (की काऊचवर? बरोबर अमेरिकन उच्चार शोधा बुवा!) बसून बारा-चौदा वर्षांची जुनी शिवास ( की चिवास? ब.अ.उ.शो.बु!) पितापिता भारतात कायकाय चुकीचे आहे (आणि म्हणून आम्ही भारतात रहात नाही बुवा!) असले वामकुक्षाळ विचार करता येतात.

मिसळभोक्ता's picture

6 Sep 2010 - 10:13 pm | मिसळभोक्ता

जकार्तात बसून चीन भारताचा भूभाग बळकावते आहे, अशी आरडाओरड करणे म्हणजे सनसनाटी, हे नक्की.

पण बंगलोरला दहा-वीस लोकांना नोकरीला लावून, त्या ऐवजी बीजिंगचे तीन लोक देखील ते काम चांगले करू शकतील, अशी खात्री पटल्याने बंगलोरच्या चमूला राम राम ठोकणे, आणि बीजिंगला ५ लोकांना नोकरी देणे, असे प्रत्यक्ष करून जे लिहिले जाते, त्याला वस्तुस्थिती म्हणावे, सनसनाटी लेखन नाही, असा माझा प्रामाणिक समज आहे.

फक्त शिवास पीतापीता "भारतात काय चुकीचे आहे" अशी बोंबाबोंब करणारे असतील कदाचित. आम्ही त्यातले नाही. आणि आमची शिवास १८ वर्षे जुनी आहे. १२ तर सगळेच पितात.

विंजिनेर's picture

7 Sep 2010 - 6:34 am | विंजिनेर

पण बंगलोरला दहा-वीस लोकांना नोकरीला लावून, त्या ऐवजी बीजिंगचे तीन लोक देखील ते काम चांगले करू शकतील, अशी खात्री पटल्याने बंगलोरच्या चमूला राम राम ठोकणे, आणि बीजिंगला ५ लोकांना नोकरी देणे, असे प्रत्यक्ष करून जे लिहिले जाते, त्याला वस्तुस्थिती म्हणावे,

सो इज धिस धागा अबाउट अस्वेजिंग युअर गिल्ट - दॅट यु चोज स्लाण्टाआईज ओव्हर देसिज अँड नाउ यु वाँट टु समहाउ कन्व्हिन्स समवन लाईक मिपाकर्स(हु डोण्ट मॅटर एनिवे) द्याट इट इज ओके?

सहज's picture

7 Sep 2010 - 6:48 am | सहज

म्हणजे बोलबच्चनगिरीचा अजुन एक नमुना म्हणायचे आहे का?

मुक्तसुनीत's picture

7 Sep 2010 - 6:56 am | मुक्तसुनीत

अ लॉट ऑफ पोलिटिकल इनकरेक्टनेस हिअर.

विंजिनेर's picture

7 Sep 2010 - 7:03 am | विंजिनेर

मेबी सर मेबी. बट अ‍ ओनेस्ट डाउट.

>>बंगलोरला धोका बीजिंगचा
मला असे वाटत नाही, माझा स्वतःचा अनुभव थोडा विपरीत असा आहे.
चीनी जागतिक स्पर्धेत फार काळ टिकून राहतील कि नाही हे मला जरी माहित नसले तरी, काही अनुभव इथे मांडावेसे वाटतात.
१) ह्यांना धंदा करण्यापेक्षा दुसर्याला लुबाडण्यातच जास्त रस असतो. दुसर्याशी सन्मानाने, प्रामाणिकपणे धंदा करणे ह्यांच्या रक्तातच नाही.
२) सोन्याची अंडे देणारी कोंबडी मारून खाण्याची जात आहे हि. हे जगाच्या रथावर जरी स्वार झाले तरी त्यांच्या स्वार्थी वृत्तीमुळे ते लवकरच आपटेल देखील जातील.
३) हि लोक अतिशय क्रूर, निर्दयी आहेत. पैशासाठी वाट्टेल ते करण्याची यांची तयारी आहे. हे लक्षण दीर्घकाळ साथ देत नाही. याउलट भारतीय लोक सदरुदयी, सहिष्णू म्हणून गणली जातात.
४) आपल्याकडील नोकर मंडळी व धंदा करणारी लोक त्यांच्या पेक्षा जास्त प्रामाणिक आहेत. त्यांनी जागतिक बाजारपेठांत आपला एक वेगळा ठसा उमटविलेला आहे. चीनी लोकांचा (भारतीय लोकांच्या तुलनेने) जगाशी अजून काही जास्त संबंध आलेला नाही. भारतीय लोकांनी आपली हुशारी कर्तबगारी ह्याच्या जोरावर जगभरात आपले नाव कमाविले आहे. जागतिक बाजारपेठेत नाव कमविणे यासाठी खूप मेहेनत घ्यावी लागते, पण नाव घालवायला फार वेळ लागत नाही.

चिन्यांच्या बाबतीत एक उदाहरण मला नेहमी द्यावेसे वाटते,
चीन म्हणजे असा एक माणूस आहे कि जो श्रीमंत आहे पण फक्त आपल्या घरात, जो कधी अजून घराच्या बाहेर पडला नाही. सर्व सुखसुविधा आहेत, पण घरात. बाहेरच काही माहित नाही.

हा एक लेख आले होता मागे.
चिमणे डोळे... मोठी स्वप्ने!
ह्यातील एक वाक्य
>>आपल्याकडच्या "बिजली - सडक - पानी'च्या राजकीय कंठाळ्या, अनिर्बंध वैयक्तिक स्वातंत्र्य आणि मतांचा गलबला बरा की चीनमधला पोलादी पण सुरक्षित पिंजरा बरा हे न कळे.
चीन म्हणजे पोलादाचा सुरक्षित पिंजरा . (पण पिंजरा म्हणजे पिंजराच कि हो )
घरातून बाहेर पडून जरा जगाशी लढा म्हणावं, मगच कळेल खरा धोका कोणाला ते. जी काही ह्यांनी प्रगती केलेली दिसत आहे ती प्रगती नसून राजकार्यांचे एकाच दिशेने चालेली वाटचाल आहे.

भारताला खरा धोका बाहेरून नसून अंतर्गत आहे. तो कसा हे मी इथे सांगण्याची आवश्यकता नाही.
आपण आख्या जगाला पुरून उरू, (ह्यात अतिशयोक्ती अजिबात नाही) पण जरा इथेच थोडी घाण साफ करायची वेळ आलेली आहे.

मृत्युन्जय's picture

6 Sep 2010 - 10:23 am | मृत्युन्जय

मिभो तुम्ही एकांगी विचार करत आहात असे वाटते आहे. एक सोफ्टवेअर कंपनी चालवायची म्हणजे केवळ संगणक अभियंते असुन चालत नाही. सगळेच व्यावसायिक पाहिजेत तिथे. आय आय एस सी शिवाय बँगलोर मध्ये एकही चांगली शिक्षणसंस्था नाही हे तुमचे मत म्हणजे या एकांगे विचाराचाच प्रभाव आहे. बँगलोर मध्ये नेशनल स्कूल ओफ लॉ आणि आय आय एम अश्या २ उच्च तोडीच्या शिक्षणसंस्था आहेत जिथुन बाहेर पडणारे विद्यार्थी हे कुठल्याही देशात चांगले आउटपुट देउ शकतात. संगणक कंपनी चालवण्यासाठी हे २ व्यावसायिक देखील लागतात.

बाकी चीन बद्दल मला अनुभव नाही. कदाचित ते लोक आपल्यापेक्षा चांगले असतीलही. पण तुम्हीच म्हणता तसे इंग्रजी चा मुद्दा आहेच. या बाबतित खुप आनंदी आनंद आहे.

विसुनाना's picture

6 Sep 2010 - 11:05 am | विसुनाना

६. वर्क एथिक / लॉयल्टी मध्ये बंगलोरचा नंबर खूप खाली आहे. पैशांसाठी लोक जे२ईई देखील अभिमानाने करतात. बीजिंगला कुठल्याही कोअर टेक्नॉलॉजीशिवाय काहीही करणे आवडत नाही.

-हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे असे म्हणतो. हे नुसते आयटीबाबत नाही तर सर्वच तंत्रज्ञानाबाबत आहे. (ही चर्चा वाचण्यापूर्वीही माझे असेच मत होते.)
भारत सर्वच बाबतीत वरवरची कामे करत आहे. 'भारताने निर्माण केलेले (तथाकथित) नवे तंत्रज्ञान' म्हणजे इतर देशांनी निर्माण केलेल्या कच्च्या मालाची जुळवाजुळव असते. (जॉट = जुगाड ओरिएंटेड टेक्नॉलॉजी...) तो कच्चा माल (किंवा ओईएम्/ऑफ द शेल्फ माल) मुळातून तयार करण्याची कुवत जोवर भारतात येत नाही तोवर त्या 'नव्या' तंत्रज्ञानाचे पोकळ पडघम वाजवण्यात काहीच अर्थ नाही.
इथे चीन भारताच्या कैकवर्षे पुढे आहे.

(ही कुवत भारतीयांच्यात नाही असे नाही. पण ती कुवत त्यांना परदेशात जाऊन सिद्ध करणे भाग पडते ही खरी समस्या आहे. तोवर ते भारतीय रहात नाहीत. :()

संजय अभ्यंकर's picture

6 Sep 2010 - 8:50 pm | संजय अभ्यंकर

एकदम चपखल शब्द!

"भारत सर्वच बाबतीत वरवरची कामे करत आहे. 'भारताने निर्माण केलेले (तथाकथित) नवे तंत्रज्ञान' म्हणजे इतर देशांनी निर्माण केलेल्या कच्च्या मालाची जुळवाजुळव असते. (जॉट = जुगाड ओरिएंटेड टेक्नॉलॉजी...) तो कच्चा माल (किंवा ओईएम्/ऑफ द शेल्फ माल) मुळातून तयार करण्याची कुवत जोवर भारतात येत नाही तोवर त्या 'नव्या' तंत्रज्ञानाचे पोकळ पडघम वाजवण्यात काहीच अर्थ नाही.
इथे चीन भारताच्या कैकवर्षे पुढे आहे."

You summed it up!

सुधीरभाऊंनी चीनच्या बद्दल सुरु केलेल्या धाग्याच्या संदर्भातही भारत - चीन तुलना करता, संरक्षण संशोधन व उत्पादनात आपण इथेच मार खातो.

भारतीय संरक्षण संस्था (तसेच इतर क्षेत्रातील खाजगी कंपन्या) एखादे तंत्रज्ञान विकत घेताना ते आधी जगात कोठे घेतले गेलेले असेल / सिद्ध झाले असेल तरच घेतात. कुठलेही तंत्रज्ञान मुळातुन निर्माण करायला कचरतात.

कुठल्याही क्षेत्रात मुलभुत व नवीन कार्य (Pioneering Work in Technology) करायची आमची तयारी नाही.
त्यामुळे इतकी बौद्धीक संपदा असूनही आम्ही शेवटी हमालच आहोत.

संजय अभ्यंकर's picture

6 Sep 2010 - 9:13 pm | संजय अभ्यंकर

बाकी मिभोसाहेब पहील्या चीन भेटीत चीनवर भाळलेले दिसतात!

वारंवार चीन मध्ये जाणारे लोक सांगतातकी चीन मध्ये तयार झालेल्या मुलभूत सुविधांमध्ये जर्मनीचा सहभाग फार मोठा आहे.
अजून काहीवेळा चीन मध्ये गेल्यावर कदाचीत मत वेगळे होइल.

आपल्या "बोलबचनगीरी" बद्दल वाद नाही. भारतीयांवर केलेल्या टीके बद्दलही वाद नाही.
आपल्या देशात केबीन दिली नाही, कार दिली नाही, ड्रायव्हर (शोफर) दिला नाही म्हणून कंपनी सोडणारे, राजीनामा देणारे महाभाग जगोजागी आहेत.

परंतु अजून काहीवेळा चीनला जावे मगच मत बनवावे, कदाचीत मत वेगळे होइल.

(एका जर्मनाने मला खिजवण्या साठी एकदा सांगीतले की चीन मध्ये पहा चिमुरडी पोरंसुद्धा फाडफाड इंग्रजी बोलतात. मी ही आश्चर्याने डोळे मोठे केले. त्याला खेदाने सांगीतले की आमच्या देशात आम्हि फक्त मोठे झाल्यावरच इंग्रजी बोलायला लागतो)

मिसळभोक्ता's picture

6 Sep 2010 - 10:21 pm | मिसळभोक्ता

परंतु अजून काहीवेळा चीनला जावे मगच मत बनवावे, कदाचीत मत वेगळे होइल.

प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. मुक्तस्रोत प्रकल्पांत जगातील सर्व कान्याकोपर्‍यांतून सॉफ्टवेयरचे कोड निर्माण होत असते.

त्यात चायनीज अ‍ॅकेडमी ऑफ सायन्सेस, शिंघुआ, पेकिंग नॅशनल इत्यादि विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांचे योगदान बघा, आणि त्याची आय आय टी, आय आय एस सी, किंवा भारतातील इतर कुठल्याही विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे योगदान बघा, आणि फरक समजून घ्या.

किंवा चायना मोबाईल, बायडू, तावबाव, व्हावे ह्यांनी मुक्तस्रोत केलेले प्रकल्प बघा, आणि शोधा इन्फी, विप्रो, टी सी एस ह्यांनी जगाला काय दिले आहे, ते.

त्यासाठी चीनमध्ये प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही.

इट्स द कोड. नथिंग एल्स मॅटर्स.

चिरोटा's picture

6 Sep 2010 - 10:45 pm | चिरोटा

शोधा इन्फी, विप्रो, टी सी एस ह्यांनी जगाला काय दिले आहे, ते.

भारतातल्या आय टी कंपन्या प्रामुख्याने पॅकेज सॉफ्ट्वेयरवर काम करतात्.(पूर्वी म्हणजे ९६/९७ पर्यंत वेगळी परिस्थिती होती). पॅकेज सॉफ्ट्वेयरला genealized software(c/C++/Linux/mysql) पेक्षा जास्त डिमांड गेल्या १५ वर्षात आला. पॅकेज सॉफ्टवेअरची मागणी त्यामुळे वाढली. मुक्तस्रोत प्रकल्पांकडे कमी कंपन्या अर्थातच कमी लोक आकर्षित झाले.
मुक्तस्रोत प्रकल्पांत भारताचा सहभाग कमी असण्याचे मुख्य कारण पॅकेज सॉफ्टवेयरला जास्त मागणी हे आहे.
कोड मॅटर्स पण इकॉनॉमिक्स मॅटर्स टू. चीनमध्ये मुक्तस्रोत प्रकल्पांत जास्त लोक सहभागी आहेत त्यामागे मुख्य कारणे काय आहेत?

मिसळभोक्ता's picture

6 Sep 2010 - 10:46 pm | मिसळभोक्ता

पॅकेज सॉफ्टवेयर (म्हणजे काय?) काही उदाहरणे द्याल का ?

चिरोटा's picture

6 Sep 2010 - 11:03 pm | चिरोटा

Siebel/SAP/Informatica/weblogic वगैरे. मोठ्या प्रॉड्क्ट कंपन्यांनी बनवलेले सॉट्वेयर समजून घेणे आणि client च्या गरजेप्रमाणे customized करणे. हे करण्यासाठी insertion sort आणि bubble sort मधिल फरक जाणून घेण्याची गरज नाही!! मोठ्या कंपन्या मुख्य्त्वे अशा सॉफ्ट्वेयरवर काम करतात.

मिसळभोक्ता's picture

6 Sep 2010 - 11:13 pm | मिसळभोक्ता

हे करण्यासाठी insertion sort आणि bubble sort मधिल फरक जाणून घेण्याची गरज नाही!!

सिबेल कस्टमायझेशनसाठी ऑरॅकल आणि डीबी२ ऑर्डर-बाय कसे इंप्लिमेंट करते, हे माहिती असण्यची आवश्यकता नाही ?

आणि इन्सर्शन सॉर्ट ? बबल सॉर्ट ? दोघांची कॉम्प्लेक्सिटी महिती आहे ना ? दोघांनाही फाट्यावर मारून हीपसॉर्ट किंवा क्विकसॉर्ट वापरावे, हे तरी किमान माहिती असायला हवे.

म्हणजे उरलेले कस्टमायझेशन म्हणजे फक्त वेबपृष्ठांचे रंग बदलणे, एवढेच. खरे ना ?

सीबेल मध्ये लोड बॅलन्सिंगसाठी सिस्कोचा लोड बॅलन्सर घ्यावा की सिबेल मधला बिल्ट-इन सॉफ्टवेयर लोड बॅलन्सर वापरावा ? ह्या प्रश्नाचे उत्तर मला आजवर सिबेलचा एकही भारतीय प्रोफेशनल-सर्विसदाता देऊ शकलेला नाही.

चिरोटा's picture

7 Sep 2010 - 7:03 pm | चिरोटा

आणि इन्सर्शन सॉर्ट ? बबल सॉर्ट ? दोघांची कॉम्प्लेक्सिटी महिती आहे ना ? दोघांनाही फाट्यावर मारून हीपसॉर्ट किंवा क्विकसॉर्ट वापरावे, हे तरी किमान माहिती असायला हवे.

हे माहित असायलाच हवे हे मान्य पण गेल्या काही वर्षात चित्र असे आहे की बर्‍याच वेळा(९९% केसेस्मध्ये) ह्याची गरज भासत नाही. पॅकेज सॉफ्टवेयरवाल्या कंपन्या 'आमचे प्रॉड्क्टच under the hood सगळी काळजी घेतील. तुम्ही business functionality वर लक्ष केंद्रित करा' अशा जाहिराती करतातच ना?
दररोजच्या कामात सॉर्टिंगचा प्रोग्रॅम लिहिणारे/अभ्यासणारे किती असतील?(१% किंवा २%)? सर्विस आय टी मध्ये कुठल्या प्रकारची कामे येतात?वर सांगितलेच आहे-JOT ची कामे बहुतांशी असतात्.
अशा प्रकारच्या कामातून मुलभूत काही घडेल अशी अपेक्षा करणे म्हणजे हिमेश रेशमिया एखादा शास्त्रिय हिंदुस्तानी नविन राग शोधून काढेल अशी अपेक्षा करण्यासारखे आहे!.

म्हणजे उरलेले कस्टमायझेशन म्हणजे फक्त वेबपृष्ठांचे रंग बदलणे, एवढेच. खरे ना ?

अशा प्रकारची कामे मिळवून विप्रो/इन्फि बराच पैसा मिळवत असतील तर त्यांच्या सेल्स्/मार्केटिंग टीमला सलाम.!!

युयुत्सु's picture

7 Sep 2010 - 8:06 am | युयुत्सु

किंवा चायना मोबाईल, बायडू, तावबाव, व्हावे ह्यांनी मुक्तस्रोत केलेले प्रकल्प बघा, आणि शोधा इन्फी, विप्रो, टी सी एस ह्यांनी जगाला काय दिले आहे, ते.

भारतात आजतागायत एकही समाधान कारक देवनागरी ocr किंवा text to speech साधन तयार झालेले ऐकले नाही.

युयुत्सु's picture

7 Sep 2010 - 7:53 am | युयुत्सु

त्यामुळे इतकी बौद्धीक संपदा असूनही आम्ही शेवटी हमालच आहोत.

ही श्रींची इच्छा!

ramjya's picture

6 Sep 2010 - 11:18 am | ramjya

शक्य आहे ....माझ्या वाचनात आले आहे की चीन जगात दुसर्‍या नम्बरची आर्थीक महासता झाली आहे......आणी चीन ने औलम्पीक स्पधा यशस्वी करुन दाखव्ली होती........आणी आपली कौमनवेल्थ ची तयारी

समंजस's picture

6 Sep 2010 - 2:31 pm | समंजस

>>आणी चीन ने औलम्पीक स्पधा यशस्वी करुन दाखव्ली होती........आणी आपली कौमनवेल्थ ची तयारी....
तुम्हाला काय वाटतंय? कोण जबाबदार आहे आपल्या कॉमनवेल्थ च्या तयारीला?

परिकथेतील राजकुमार's picture

6 Sep 2010 - 12:53 pm | परिकथेतील राजकुमार

अवांतर :- भारत 'महासत्ता' होणार म्हणजे नेमके काय होणार आहे हे कोणी सांगु शकेल काय ?

मंजी , अमरिका, चीन आणि पाकिस्तानला मागं टाकणार.

मंजी , अमरिका, चीन आणि पाकिस्तानला मागं टाकणार.

चिरोटा's picture

6 Sep 2010 - 5:02 pm | चिरोटा

भारत 'महासत्ता' होणार म्हणजे नेमके काय होणार आहे हे कोणी सांगु शकेल काय

ते अब्दुल कलाम ह्यांना नेमके माहित आहे.

ऋषिकेश's picture

6 Sep 2010 - 12:56 pm | ऋषिकेश

बंगलोरला दर वर्षी १ लाख नवीन नोकर्‍या तयार होतायत. बीजिंगला पाच लाख.

अरे वा! रेझ्युमे कुठे पाठवावा? :P

(जगाचा नागरीक) ‍ऋषिकेश

मिसळभोक्ता's picture

6 Sep 2010 - 10:24 pm | मिसळभोक्ता

२०० चिन्यांपैकी एक भारतीय आहे बीजिंगच्या आम्च्या ऑफिसात. भारतीय म्यानेजरला कंटाळून त्याच्या कष्टाचे चीज होईल म्हणून आलाय इथे. आणि प्रचंड खूष आहे.

पण एक अट. कॉम्प्युटर सायन्स वाला हवा. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवाला नको.

>> भारतीय म्यानेजरला कंटाळून >>
I am not the only one !!!! Thank God!

ऋषिकेश's picture

7 Sep 2010 - 1:26 pm | ऋषिकेश

>>कॉम्प्युटर सायन्स वाला हवा. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवाला नको.
अरेरे अटीत बसत नाही :( (म्हंजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवाला मागितलात तरी अटीत बसत नाहीच (आमचं कागदोपत्री शिक्षण ह्या दोन्हीमधे नाही)

कुंदन's picture

7 Sep 2010 - 2:45 pm | कुंदन

बँगलोर तुझ्यासाठी योग्य ठरेल का?

पैशासाठी लोक जे२ईई देखील अभिमानाने करतात

जे२ईई मध्ये काम करण्यात नक्की वाईट काय आहे? सर्वलेट, जेसपी, जेएसएफ, स्प्रिंग, फ्लेक्स, वेब सर्विसेस (मेट्रो, जेडब्लूएस, ऍक्सिस), हायबरनेट यापैकी नक्की कलप्रिट कोण आहे ते सांगा बुवा. उद्या कोणी सी++ मध्ये काम केले तर त्याला सी मध्ये काम करत नाही म्हणून हाणायचे. सीमध्ये काम करणाऱ्याला असेंब्ली लॅँगवेजमध्ये काम करत नाही म्हणून हाणायचे. अशी पॉलिसी आहे काय?

उद्या चिन्यांनी जे२ईईमध्ये काम केले असते आणि भारतीय प्रोग्रामर सी मध्ये काम करत असते तर चिन्यांनी तंत्रज्ञानात कशी प्रगती केली आहे हे तुम्हीच आम्हाला दाखवले असते.

असो.. खालील चित्र पाहा व हसा.

मिसळभोक्ता's picture

6 Sep 2010 - 10:25 pm | मिसळभोक्ता

जे २ ई ई चे अ‍ॅब्स्ट्रॅक्शन चुकीचे आहे असे तुला वाटत नाही का ?

कंटेनर म्हणजे काय, हे नक्की समजवून सांग मला. मग बोल.

जे २ ई ई चे अ‍ॅब्स्ट्रॅक्शन चुकीचे आहे असे तुला वाटत नाही का ?

नाही.

कंटेनर म्हणजे काय, हे नक्की समजवून सांग मला. मग बोल.

इथे इंटर्व्यू चालला आहे का? कोणता कंटेनर ? इजेबी की वेब?

मल्टिथ्रेडिंग, सेक्युरिटी आणि लाईफसायकल म्यानेजमेंट करणारे वेब कंटेनर असते बॉ. आता टॉमक्याट हा ऍप सर्वर कसा नाही हे विचारु नका.

(जेबॉस) आजानुकर्ण

समंजस's picture

6 Sep 2010 - 2:32 pm | समंजस

आपल्याला एकदम पटलंय. केव्हा पासून वाट बघतोय मुंबईची शांघाई होण्याची :) म्हणजे काय आपसूकच चीनच्या आर्थिक उन्नतीत भागीदार व्हायला मिळेल.

[अवांतर: कुठे गेलेत ते राजकारणी, नेते, सरकार ज्यांनी मुंबईची शांघाई करण्याची घोषणा करून मला हुरळून टाकलंय. बंगलोरचं बीजींग करून टाकता येईल का?]

चीन सध्यातरी आपल्या पुढे आहे हे मान्य करायलाच हवे,परंतु आपल्याला जास्त चिंता करायला पाहिजे असे मला तरी वाटत नाही.
डेल आपला चायना बेस सोडुन हिंदूस्थानात येत आहे,गुगल चीन वाद तर आता सार्‍या जगालाच माहित झाला आहे.
http://www.2point6billion.com/news/2010/03/23/dell-switching-pc-exports-...
http://www.2point6billion.com/news/2010/03/26/u-s-tech-companies-follow-...
हे देखील वाचा :--- http://www.allvoices.com/contributed-news/6674537-foreign-companies-losi...
http://www.caclubindia.com/articles/shifting-in-out-of-china--4720.asp

चीन मधुन हिंदूस्थानात आयात होण्यार्‍या वस्तुंवर जरी निर्बंध घातले तरी चीनला त्याचा चांगलाच फटका बसु शकतो.
(टेलिकॉम रिलेटेड सामुग्री चीन्यांकडुन अजिबात घेउ नये अशी स्थिती आहे,कारण चीनी अशा वस्तुंचा वापर करुन हेरगिरी करतो.) डॉटने सुरक्षिततेच्या कारणास्तव टेलिकॉम कंपन्यांना चीनी उपकरणे वापरु नका असे बजावले आहे.
http://www.business-standard.com/india/news/dot-for-keeping-chinese-outt...
चीन मधे सध्या दुसराच उद्योग तेजीत आहे,कुठला ? ( http://bit.ly/9IE6EE ) ;)

बोलघेवडा's picture

6 Sep 2010 - 4:54 pm | बोलघेवडा

येत्या काही वर्षात भारतातली परिस्थिती कठीण होणार आहे हे निश्चित.
१. भारत महासत्ता होणार आहे हा फुगा लवकरच फुटेल.
२. अमेरिकेतून येणाऱ्या आयटी व्यवसायात मोठ्या प्रमाणात घट होईल. (अगदी आयटी हमाली करने सुद्धा कठीण होइल)
३. उपलब्ध नोकर्या आणि भारताची लोकसंख्या यांचे प्रमाण अगदीच व्यस्त होत जाईल.
४. भारतात मिळणाऱ्या व्यावसायिक शिक्षणाचा दर्जा इतका खालावेल कि बाहेर पडणारे पदवीधर केवळ नावाचे पदवीधर असतील. कोणत्याही व्यवसायिक समस्येचे ते निराकरण ते करू शकणार नाहीत.

चिरोटा's picture

6 Sep 2010 - 5:10 pm | चिरोटा

ही 'ओरड' कित्येक वर्षापासून चालु आहे.फोर्ब्स्,ईकॉनॉमिस्ट्,फॉर्चुन,फॉरेस्टरच्या लोकांना अधून मधुन झटके येत असतात.झटका आला की ते फासे टाकून कुठलातरी देश निवडतात. कुठल्या देशाला हरभर्‍याच्या झाडावर चढवायचे आणि कोणाला उतरवायचे हे ठरते.आणि मग आपण कुठलीतरी 'सक्सेस स्टोरी' वाचतो.तर कधी त्याच देशात देशात पाणी प्यायचे वांदे असेही वाचतो. इन्फ्रास्ट्रक्चर सुधारल्याशिवाय काही खरे नाही असे सांगून लेखाचा शेवट होतो आणि आपली तेवढीच करमणूक होते.

छोटा डॉन's picture

6 Sep 2010 - 5:18 pm | छोटा डॉन

फोर्ब्स्,ईकॉनॉमिस्ट्,फॉर्चुन,फॉरेस्टरच्या लोकांना अधून मधुन झटके येत असतात.झटका आला की ते फासे टाकून कुठलातरी देश निवडतात. कुठल्या देशाला हरभर्‍याच्या झाडावर चढवायचे आणि कोणाला उतरवायचे हे ठरते.आणि मग आपण कुठलीतरी 'सक्सेस स्टोरी' वाचतो.तर कधी त्याच देशात देशात पाणी प्यायचे वांदे असेही वाचतो. इन्फ्रास्ट्रक्चर सुधारल्याशिवाय काही खरे नाही असे सांगून लेखाचा शेवट होतो आणि आपली तेवढीच करमणूक होते

+१, क्या बात है !
एकदम मार्मिक भाष्य, अगदी कट टु कट सहमत .

मध्यंतरी 'रिसेशन आणि बेल-आउट्'च्या पिरियडमध्ये तर ह्यांनी मनोरंजनाचा असा धडाका लावला की ज्याचे नाव ते.
मी तर मटाचे 'हसा लेको' सोडुन हे वाचत बसायचो ;)

- छोटा डॉन

हमम्म्म्म्म्म्म्म्म्म,
किती जणांनी अभ्यास/विचार करुन प्रतिसाद दिला आहे बरं? आणि हा लेख एका माणसाच्या स्वानुभवावरुन आहे हेही सत्यच.
असो,
मला तरी वैयक्तिक रित्या लेख अनावश्यक/पँडेमिक वाटला, म्हणजे ४०-५० वर्षे अनुभव असलेल्या अथवा मोठ्या मोठ्या विचारवंतांना वेड्यात काढले आहे सरळ सरळ..
असो,
चालु द्या.. मराठी माणसांनो... चालु द्या...

शिल्पा ब's picture

7 Sep 2010 - 5:51 am | शिल्पा ब

असले प्रश्न पडतात त्यावरून तुम्ही मराठी नाहीत असं वाटतं...नुसतंच नाव घेतलंय मराठमोळा म्हणून...

गोगोल's picture

7 Sep 2010 - 7:23 am | गोगोल

ज्यांना ४०-५० वर्षांचा अनुभव आहे ते कोण आहेत?
Or did you just pull these "facts" out of your head?

संपादक - गोगोल, कृपया भाषा संयत असूदेत, विचार काहीही असले तरी बिलो द बेल्ट वार नको!)

परवा जेवायचे हॉटेलचे वांदे होते .आता एकदम चीन इझ बेस्ट...
पण काही ही असो चीन मला खुप आवडतो.मिचमिच बघणारे लोक इतके पुढे आहेत हे बघुन मन भरुन आले.

विसोबा खेचर's picture

6 Sep 2010 - 7:44 pm | विसोबा खेचर

मिचमिच बघणारे लोक इतके पुढे आहेत हे बघुन मन भरुन आले.

सहमत..:)

चिक्कन चिल्ली लेकाचे..!

तात्या.

बाकी भारत सोडुन सध्या तरी कुठला देशाचा अनुभव नाही आयटी क्षेत्रात काम करण्याचा. पण भारतीय आयटी कंपनीत बोलबच्चनगिरी भयानक आहे ..कदाचीत आयटी क्षेत्रात काम करतांना सर्विकड्ची हीच स्थीती असेल.

सर्व नुसत हवेत बोलायच Quality,standard,process etc..अबे नक्की काय करायच ते सांग ना..साला बेसीक मधेच मार खातो आपण.....

बोलबच्चान्गिरी म्हणजे नेमकं काय करतात हो लोकं? काम केल्याशिवाय तर कोण पैशे देणार नाही...

नगरीनिरंजन's picture

7 Sep 2010 - 8:47 am | नगरीनिरंजन

मिभो,
तुमचं संगणक शास्त्राचं ज्ञान जेवढं आहे त्याच्या एक दशांश जरी तुम्हाला अर्थशास्त्राचं ज्ञान असतं तर तुम्हाला कळालं असतं की बंगलोरला बीजिंगचा काहीही धोका नाही, असलाच तर अमेरिकेच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेचा आहे (पण त्यातून फायदा ही होऊ शकतो).
शिवाय अमेरिकन अभियंते फार हुषार आणि कार्यक्षम असतात हा जो तुमचा भयंकर गैरसमज आहे ना तो काढून टाका. अमेरिकन अभियंते एवढे भारी असते तर अमेरिकेत रशियन आणि त्या खालोखाल भारतीय लोकाना एवढी मागणी नसती आली आणि बिल गेट्सने H1 विजाचे प्रमाण वाढवण्यासाठी एवढी बोंब नसती मारली.
चिनी माल आणि चिनी गुणवत्ते बद्दल एवढ्या ममत्वाने बोलणारे मी पाहिलेले तुम्ही पहिलेच! इथे सिंगापुरात एखादी वस्तू विकायची असेल तर ती 'मेड इन चायना' नाही असं आधी सांगावं लागतं.
परिस्थिती हवी तेवढी चांगली नसली तरी इतर देशांच्या मानाने बरीच चांगली आहे आपल्याकडे. पुढे स्पर्धा वाढेल तशी गुणवत्ता ही वाढवावीच लागेल लोकाना. मागणी-पुरवठ्याप्रमाणे स्वतःला कसं बदलावं हे भारतीयाना व्यवस्थित कळतं, काळजी नसावी.
अवांतर: भारतीय कंपन्यांनी काहीच नवीन दिले नाही अशी (फक्त)बोंब मारायची फॅशन आहे आजकाल. ज्यानी स्वतः काही नवीन केलं आहे त्यानाच तो अधिकार आहे. बाकीच्यांच्या बोंबलण्याला काहीही अर्थ नाही.

विसुनाना's picture

7 Sep 2010 - 10:50 am | विसुनाना

नाही हो. मी मारलेली बोंब फ्याशन म्हणून मारलेली नाही.
"ज्यानी स्वतः काही नवीन केलं आहे त्यानाच तो अधिकार आहे."
-ह्या क्याटयागिरीत येण्याचा आटोकाट प्रयत्न करून मगच बोलत आहे.
पुन्हा सांगतो - ऑपरेटिंग सिस्टिम्स, इंटेग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट्स, मेम्स टेक्नॉलॉजी सेन्सर्स आणि मायक्रोकंट्रोलर्स जोवर भारतीय कंपन्यांमध्ये (भारतात) मोठ्या प्रमाणावर निर्माण होत नाहीत तोवर भारताची इलेक्ट्रॉनिक्स आणि काँप्युटर सायन्समधली प्रगती पांगळी आहे.
बाकी आयटी वगैरे डेरिव्हेटिव्हज आहेत. म्हणजे दुधाची आयात करून भारतीय लोणी बनवण्यासारखे.

अजितजी's picture

7 Sep 2010 - 2:33 pm | अजितजी

या सर्व चर्चेत इन्ग्लिश हे माध्यम कायम राहिल हे ग्रुहित धरले आहे . पण उद्या अशीही परिस्थीती येइल की चायनिज भाषे मधे सर्व जागतिक व्यवहार करावे लागतिल कारण आपल्या कडे म्हण आहेना " बलिश्ठाचा खान्द्यावर ".
अर्थात आपल्या कडे ही इन्ग्लिश चा काय उजेड आहे हे मुम्बाइ,पुणे, बन्गलोर च्या शहरा च्या बाहेर जा मग तो काय आहे ते दिसेल च .---आणि शहरामधे कौल सेन्टर मधले काही पोपट सोडले तर तेथे ही काय उजेड आहे हे ही दिसेल

मला येथे "मनोगत" प्रमाणे शुध्ह लेखना ची काही सोय येथे पण आहे का या बद्दल मार्गदर्शन हवे आहे मिळेल का?