स्वीट कॉर्न घालुन आप्पे.

चिंतामणी's picture
चिंतामणी in पाककृती
2 Sep 2010 - 6:21 pm

स्वीट कॉर्न घालुन आप्पे.
आप्पे बनवण्यासाठी साहित्य:- १.५ कप तांदुळ, ३ कप मका दाणे, १/४ कप उडीद डाळ, १ /२ कप खवलेला नारळ,आले, मीरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ.

From APPE" alt="" />

कृती:-
तांदुळ आणि डाळ वेगवेगळे ५-६ तास भिजत घालावेत.नंतर पाणी काढुन टाकुन मिक्सरमधुन वाटुन घ्यावे. तयार झालेले पीठ ५-६ तासचे झाकुन ठेवले तर आप्पे जस्त हलके होतात. (पीठ रात्री करून ठेवावे)

आप्पे करायचे आधी थोडावेळ स्वीट कॉर्नचे दाणे मिक्सरमधून बारीक करून घ्यावेत. बारीक करताना थोडे आले, कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकावी.

From APPE" alt="" />

तयार झालेल्या पिठात हे मिश्रण घालावे व खवलेला नारळ आणि चविनुसार मीठ घालुन एकजिव होई पर्यंत ढवळावे. आप्पे पात्राला थोडेसे तेल लावुन गॅसवर ठेवावे.

आप्पेपात्र थोडेसे गरम झाले की त्यात चमच्याने पीठ घालावे.

From APPE" alt="" />

आता उलटवुन थोडेसे तेल सोडुन पुन्हा भाजुन घ्यावेत.

From APPE" alt="" />

अशा प्रकारे आप्पे तयार करुन नारळाच्या चटणी अथवा सॉसबरोबर गरम गरमच खायला द्यावेत.
[फोटो3.JPG ]

From APPE" alt="" />

खाद्यश्रींना सुचना- गरम गरम आप्प्यांवर "बटर" घालुन खावे. चव अजून छान लागते.

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

2 Sep 2010 - 6:23 pm | परिकथेतील राजकुमार

वाह ! क्या बात है चिंका, आजारपणातला वेळ अगदी सत्कारणी लावत आहात की ;)

फोटु तर एकदम झ क्का स !!

चिंतामणी's picture

2 Sep 2010 - 8:56 pm | चिंतामणी

धन्यु.

मेघवेडा's picture

2 Sep 2010 - 9:11 pm | मेघवेडा

बाकीच्यांनी काय पाप केलंय?

मदनबाण's picture

2 Sep 2010 - 6:23 pm | मदनबाण

अरे चिंत्या का जळवतोस ? ;) हे असले फोटु पाहुन अजुन खा खा होते रे !!! :)

चिंतामणी's picture

2 Sep 2010 - 9:03 pm | चिंतामणी

फोटु नाही टाकला तर आजकाल पाकृ पचनी पडत नाही मिपाकरांना. म्हणुन फोटु टाकाया लागतात.

ते चांगले आले आहेत हा अभीप्राय पोहोचला.

धन्यु.

अवलिया's picture

2 Sep 2010 - 6:26 pm | अवलिया

जबरा !!

विसोबा खेचर's picture

2 Sep 2010 - 6:31 pm | विसोबा खेचर

शब्दच संपले..!

मेघवेडा's picture

2 Sep 2010 - 6:37 pm | मेघवेडा

शॉल्लेट पाकृ आणि फोटुही!

आप्पेपात्र नसेल तर काही अन्य पद्धत?

स्वाती दिनेश's picture

2 Sep 2010 - 6:34 pm | स्वाती दिनेश

अप्पे मस्त दिसत आहेत. कॉर्न घालून अप्पे कधी केले नव्हते, करुन पाहिन.
स्वाती

यशोधरा's picture

2 Sep 2010 - 6:34 pm | यशोधरा

मस्त!!

प्रभो's picture

2 Sep 2010 - 7:22 pm | प्रभो

ज ह ब ह रा!!!!!!

पहिल्या फोटोत आलंमिरचीच्या शेजारच्या छोट्या वाटीत खाण्याचा सोडा आहे का ? कारण मीठ कोथिंबीरीच्या शेजारी दिसतंय.

चिंतामणी's picture

2 Sep 2010 - 9:05 pm | चिंतामणी

पिठ चांगले हलके झाले नाही तर अप्पे कमी फुगतील. तसे झाल्यास थोडा खाण्याचा सोडा घालावा.
सुदैवाने इथे घालायला न लागल्यामुळे उल्लेख राहीला.

स्मिता_१३'s picture

2 Sep 2010 - 7:29 pm | स्मिता_१३

मस्तच !

प्रीत-मोहर's picture

2 Sep 2010 - 7:30 pm | प्रीत-मोहर

मस्त.......

यशवंतकुलकर्णी's picture

2 Sep 2010 - 8:40 pm | यशवंतकुलकर्णी

माय गॉड!! जरा दहा मिनिटं आधी हे वाचलं असतं तर आप्पे नसते का बनवले??? आत्ता आम्ही सगळेजण मधुमक्का खातोय!! क्या बात है!!! पुढच्या वेळी करणार आहे आई आता...सेव्ह करून घेतोय...कॉपीराईट ढिला करा..

चिंतामणी's picture

2 Sep 2010 - 9:12 pm | चिंतामणी

कॉपीराईट ढिला केला आहे.

सर्वांनी आनंद ध्यावा ही इच्छा आहे. म्हणुनच फोटु सकट पाकृ टाकली आहे.

खाओ और खिलाओ.

निवेदिता-ताई's picture

2 Sep 2010 - 8:41 pm | निवेदिता-ताई

मस्त ..मस्त ...अजुन केव्हा करणार आहात ...खायलाच येते.

बेसनलाडू's picture

2 Sep 2010 - 9:09 pm | बेसनलाडू

पटकन उचलून तोंडात टाकावेतसे दिसत आहेत.
(हावरा)बेसनलाडू

सुनील's picture

2 Sep 2010 - 10:02 pm | सुनील

वेगळे आप्पे. फोटो जबराच!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Sep 2010 - 10:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त, मस्त, मस्त!

हल्ली मक्याला स्वीटकॉर्न म्हणण्याची फॅशन आल्ये का?

जासुश's picture

3 Sep 2010 - 10:31 am | जासुश

आप्पे खुपच छान दिसत आहेत. कुठल्याही प्रकारचे आप्पे करत असताना गॅस वर किती वेळ भाजू.
[मी या आधी कधीही आप्पे बनविले नाहीयेत आणि खाल्लेही नहियेत. पण फोटो खूपच टेंप्टिंग आहे.]
आप्पे पात्र विकत घेण्याच्या विचारात..जासुश..

चिंतामणी's picture

3 Sep 2010 - 11:50 am | चिंतामणी

आजकाल निर्लेपचे आप्पे पात्र मिळ्ते. ते जास्त चांगले आहे.

साधारणतः ५ मिनीटे लागतात.

त्या आप्पे पात्राबरोबर एक टोकदार लाकडी दांडी/काडी येते. त्याने एक बाजु झाली की पलटी मारायची. आणि झाले की त्यानेच काढायचे.

अस्मी's picture

3 Sep 2010 - 11:41 am | अस्मी

फोटो मस्त...आणि पाकृ तर लाजवाब :)

काजुकतली's picture

3 Sep 2010 - 1:28 pm | काजुकतली

पाकृ एकदम आवडली. आणि आप्पेपात्रासहित दाखवलीत म्हणुन विशेष आभार. मी आप्प्यांच्या पाक्रू खुप वाचल्यात पण त्या आप्पेपात्रात कशा करायच्या, 'तेल सोडुन उलटवुन घ्या' म्हणजे नक्कीच उलटतील की पात्रालाच चिकटुन बसतील, मग अर्धे आप्पे तयार आणि अर्धे पात्रालाच चिकटलेले व्.व. सगळे सिन कल्पनेत आणुन कधी आप्पेपात्र आणायचा विचारही केला नाही.

वरचा फोटो पाहुन जरा धीर आला. आता एक लहान आप्पेपात्र आणुन करुन पाहिन.

काजुकतली's picture

3 Sep 2010 - 1:33 pm | काजुकतली

बीडाचेही आप्पेपात्र मी पाहिलेय बाजारात. ते घ्यावे की निर्लेपचे घ्यावे??

चिंतामणी's picture

3 Sep 2010 - 4:13 pm | चिंतामणी

निर्लेपचे आप्पेपात्र बिडाच्या आप्पेपात्रापेक्षा जास्त चांगले आहे.

बिडाच्या पात्राला चिकटण्याचे प्रमाण जास्त असते. वेळ आणि तेलसुध्दा जास्त लागते.

चतुरंग's picture

3 Sep 2010 - 4:16 pm | चतुरंग

छान आलाय फोटू! एकदा खाऊन बघायलाच हवेत.

रंगा

प्राजक्ता पवार's picture

3 Sep 2010 - 4:47 pm | प्राजक्ता पवार

मस्त . मी नेहमी फक्त डाळ , तांदुळ यांचे अप्पे करते . आता कॉर्न वापरुन देखील करेल.

चिंतामणी's picture

3 Sep 2010 - 8:54 pm | चिंतामणी

प्रतिक्रीया देणा-या सर्वांचे आभार.

धन्यु.

भाग्यश्री's picture

3 Sep 2010 - 11:46 pm | भाग्यश्री

मस्तंय!! एकदा करून पाहीन!!