मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वीट कॉर्न घालुन आप्पे.

चिंतामणी · · पाककृती
स्वीट कॉर्न घालुन आप्पे. आप्पे बनवण्यासाठी साहित्य:- १.५ कप तांदुळ, ३ कप मका दाणे, १/४ कप उडीद डाळ, १ /२ कप खवलेला नारळ,आले, मीरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ. Image removed.Image removed.From APPE" alt="" /> कृती:- तांदुळ आणि डाळ वेगवेगळे ५-६ तास भिजत घालावेत.नंतर पाणी काढुन टाकुन मिक्सरमधुन वाटुन घ्यावे. तयार झालेले पीठ ५-६ तासचे झाकुन ठेवले तर आप्पे जस्त हलके होतात. (पीठ रात्री करून ठेवावे) आप्पे करायचे आधी थोडावेळ स्वीट कॉर्नचे दाणे मिक्सरमधून बारीक करून घ्यावेत. बारीक करताना थोडे आले, कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकावी. Image removed.Image removed.From APPE" alt="" /> तयार झालेल्या पिठात हे मिश्रण घालावे व खवलेला नारळ आणि चविनुसार मीठ घालुन एकजिव होई पर्यंत ढवळावे. आप्पे पात्राला थोडेसे तेल लावुन गॅसवर ठेवावे. आप्पेपात्र थोडेसे गरम झाले की त्यात चमच्याने पीठ घालावे. Image removed.Image removed.From APPE" alt="" /> आता उलटवुन थोडेसे तेल सोडुन पुन्हा भाजुन घ्यावेत. Image removed.Image removed.From APPE" alt="" /> अशा प्रकारे आप्पे तयार करुन नारळाच्या चटणी अथवा सॉसबरोबर गरम गरमच खायला द्यावेत. [फोटो3.JPG ] Image removed.Image removed.From APPE" alt="" /> खाद्यश्रींना सुचना- गरम गरम आप्प्यांवर "बटर" घालुन खावे. चव अजून छान लागते.

वाचन 9496 प्रतिक्रिया 0