चाललो मी....

स्वानंद मारुलकर's picture
स्वानंद मारुलकर in जे न देखे रवी...
1 Sep 2010 - 5:59 pm

व्याकूळसे उसासे टाकीत चाललो मी
आवेग आसवांनी झाकीत चाललो मी

माथ्यावरील जाचे ओझे युगायुगांचे
हा भार सोसवेना वाकीत चाललो मी

हा देह दग्ध होतो वणव्यात अंतरीच्या
वाटेवरी निखारे फेकीत चललो मी

मद्यास पूर येतो डोळ्यात आज माझ्या
प्याले उदासवाणे झोकीत चाललो मी

नाही कुणीच आले वाटेवरी पुसाया
का कोरडे खुलासे ऐकीत चाललो मी ?

हा क्रूर जीवघेणा रस्ता मला हवासा
होऊन पूर्ण त्याच्या अंकीत चाललो मी

-स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com/

करुणकविता

प्रतिक्रिया

विश्नापा's picture

1 Sep 2010 - 10:26 pm | विश्नापा

खूपचं छान!
खास करुन...........
माथ्यावरील जाचे ओझे युगायुगांचे
हा भार सोसवेना वाकीत चाललो मी

>> नाही कुणीच आले वाटेवरी पुसाया
का कोरडे खुलासे ऐकीत चाललो मी ? >>

वाचून गलबलून आलं. एकंदर कविताच करूण आहे.

NEWYORKER's picture

2 Sep 2010 - 4:57 am | NEWYORKER

आपले काव्य आवडले. काव्याचा झोक गझलकडे झुकणारा वाटला. गजलेच्या नियमा प्रमाणे आपल्या चार पाच कडव्यान्ची
एक गजल होउ शकते. मराठीत गजला लिहील्या गेल्या पाहिजेत. आपले अभिनन्दन.

निरन्जन वहालेकर's picture

2 Sep 2010 - 8:15 am | निरन्जन वहालेकर

मद्यास पूर येतो डोळ्यात आज माझ्या
प्याले उदासवाणे झोकीत चाललो मी
व्वा ! क्या बात है ! ! ! अतिशय आवडली गझल

मदनबाण's picture

2 Sep 2010 - 9:51 am | मदनबाण

अप्रतिम... :)

स्वानंद मारुलकर's picture

2 Sep 2010 - 7:48 pm | स्वानंद मारुलकर

सर्वांनचे खूप खूप धन्यवाद.

बबु's picture

3 Sep 2010 - 9:51 pm | बबु

कविते तुझी आठवण होते...

जेव्हां रक्तिम वर्ण पहातो
असो उषेचा वा क्रांतीचा
दिसतो कृषिवल वा श्रमजीवी
रण्रणत्या उन्ही विषमतेच्या
अंतर्मन घामेजते
कविते तुझी आठवण होते...