आमची प्रेरणा राजा बढे यांची अप्रतिम रचना दे मला गे चंद्रिके...गे मला गे चंडिके, भीती तुझी वाटते ही, ऐकुनी कीर्ती तुझी देहगंधा वारि जाता रे सख्याहासणे घोड्यापरी रीती तुझीतुज गळा हा लाभलेला गर्दभीसुस्वरे अन् रेकिते गीती तुझीसोशितो मी झीज केसांची अतायेवढी का बाळगू क्षीती तुझी
प्रतिक्रिया
10 Apr 2008 - 1:32 am | चतुरंग
शब्द योजना ठीक आहे चालीतही ठीक बसतंय.
पण माझ्या मते हे गाणे विडंबनाला फारसे सूट होणारे नाही.
नेहेमीची मजा नाही आली.
(खुसखुशीत चकली आणि पावसाळी हवेतली सादळलेली चकली ह्यातला फरक असतोना तसे काहीसे!;))
चतुरंग
10 Apr 2008 - 10:36 am | केशवसुमार
१०-१५ गाण्याच्या विडंबनाची सुपारी घेतली की असच होणार.. अजून ५-६ गाणी बाकी आहेत.. सोचना पडेंगा..धन्यवाद..
(सुपारीवाला)केशवसुमार