देवा तू चुकलास....
माणसाला बनवताना मन का दिलेस?
सगळं साठवण्याची कुवत का दिलीस?
टोचत रे खूप आत्ता.....सहन होत नाही
मन दिलेस ते दिलेस.....भावना ही दिल्यास
आत्ता लहान सहान गोष्टींतले...हेतू कळतात...
न कळते तर बरं झालं असतं....
आता केलीस ती चूक केलीस
पुन्हा मात्र चुकू नकोस.....
माणसासारखा बनू नकोस....
माणूस काय...... मुखवटाधारी
काय खरे काय खोटे कैसे समजावे म्या पामरी
मला वाटत तुला सुद्धा प्रश्न पडत असेल कधीतरी ,
की ज्याला निर्मिला मी ,तो मानव आहे का 'तोच ' तरी?
पुढच्या वेळेला सृष्टी निर्मिताना हे सार लक्षात ठेव....
काहीच innovative नाही जमल तर मन , भावना , हे "parts " manufacture करताना असले फौल्ट्स बाजुला ठेव....
एका चेहर्यावर दुसरा चेहरा.....हे सगळ मला नवीनच होत
जेव्हा कळल तेव्हा "नात्या"वर विश्वास ठेवण कठीण होत
सरडा सुद्धा इतक्या चटचट रंग नसेल बदलत
जितका सत्वर तुझा हा मुखवटाधारी असतो बदलत.....
विश्वासावरचा विश्वास उडून गेलाय
तितक्यात कोणीतरी बोलल, तो ना ,कधीचाच मरुन गेलाय.....
प्रत्येक नात्यातला स्वार्थ मज भासे
आणि म्हणून म्हणते....
देवा तु चुकलास......
अगदी काल - परवा पर्यंत 'तो' कित्ती गोड वागत होता....
आणि आज....
आज सगळे 'संदर्भ ' उलटे भासतात....
जीवाला जीव देईन जिथे तुझा जीव घेईन बनत......
काय उरला रे " त्या " माया-ममतेला अर्थ?
हे अस सगळ आता सोसवत नाही
दुसरा भोगतो ते ही पहावत नाही...
आणि म्हणून म्हणते....
देवा तु चुकलास......
प्रतिक्रिया
30 Aug 2010 - 5:47 pm | अस्मी
सुंदर... :)
30 Aug 2010 - 6:49 pm | अवलिया
मस्त !!
30 Aug 2010 - 9:23 pm | एक अनामी
अतिशय सुंदर कविता...
ही कविता वाचल्यावर संदीप खरे यांची एक कविता आठवली...
(देवाला उद्देशून) "जाब तुला रे कुणी पुसावा...."
30 Aug 2010 - 10:15 pm | अर्धवट
मस्त आहे..
31 Aug 2010 - 4:50 am | शुचि
मस्त आहे.
31 Aug 2010 - 9:55 am | अनुप बंगाली
खुपच छान & सत्य , अजुन येवु द्या.....
31 Aug 2010 - 10:46 am | प्रीत-मोहर
धन्यवाद लोकहो.... त्यातल्या उणीवाही दाखवा, अजुन काही करु शकेन का हेही सांगा..:)
हा पहिलाच प्रयत्न होता माझा......
31 Aug 2010 - 8:00 pm | एक अनामी
तुम्ही उणीवा ही सांगा असं म्हण्ताच आहात तर एकच सांगतो...
ही तशी उणीव नाही म्हणता येणार पण...
तुमची कविता वाचून वाटलं नाही की तुम्हाला कधी मराठी शब्दांची उणीव भासावी पण मग
एका ओळीत इंग्रजी शब्द वापरायचं प्रयोजन नाही कळलं...
1 Sep 2010 - 10:19 am | प्रीत-मोहर
सहज वापरले.....आपण जस बोलताना वापरतो ना तस....कारण माझ्या मनात जसजस येत गेल लिहित गेले मी......त्याला शुद्ध लिहायचा ही प्रयत्न केला नाही....
असो..तुमच्या सुचनेबद्दल आभार ..यापुढे अस नाही करणार.....
ही कविता आता मी बदलु नाही शकत..सो...
1 Sep 2010 - 10:18 am | मदनबाण
मस्त... :)
1 Sep 2010 - 10:24 am | अनिल २७
छान कविता..
प्रेमभंग झालाय का कुणाचा तरी?
1 Sep 2010 - 10:24 am | अनिल २७
छान कविता..
प्रेमभंग झालाय का कुणाचा तरी?
1 Sep 2010 - 10:28 am | वेताळ
देव नाही म्हणणार्या लोकाच्या तोंडावर हा देव असण्याचा पुरावा फेकता येईल.
1 Sep 2010 - 10:30 am | शिल्पा ब
ठीक आहे...आता तुम्ही लोकं नाही का artificial intelligence च्या मागे लागलाय...मी ते करून पाहिलं माणसाच्या बाबतीत...फारसं काही जमलं नाही..सगळ्या घरचाच (पक्षी : पृथ्वीचा) नाश करायला निघालात तुम्ही...
आता पुढच्या वेळी वेगळं काहीतरी करेन..आणि सगळ्याच बाबतीत मलाच का हो वेठीला धरतात तुम्ही मानव? (मानवच म्हणवून घेता न तुम्ही ? नाव काही लक्षात राहत नाही आजकाल)..देव सुद्धा चुकतो.. :-) असो..
कविता, गाणं काय म्हणतात ते छान जमलंय.
1 Sep 2010 - 10:39 am | प्रीत-मोहर
हाहाहा :D
13 Sep 2010 - 11:55 am | गंगाधर मुटे
मनाला एक हुरहूर लावून गेली कविता. कदाचित मागचे-पुढचे संदर्भ जुळले असतील मनात.