पी.चिदंबरमला वाटते़ की भगवा दहशतवादच सर्व समस्यांचे मुळ आहे,

शेलार मामा मालुसरे's picture
शेलार मामा मालुसरे in काथ्याकूट
27 Aug 2010 - 11:01 am
गाभा: 

आपल्या देशात आता सर्व मशिदींच्या इमामांना आता पगार देण्यात येणार असे नुकतेच संसदेत सलमान खुर्शिद ह्या मंन्त्र्याने सांगीतले त्यानंतर आता पी(ऊन) चिदंबरम यांनी आता अकलेचे तारे तोडले आहेत.
अल कायदा पेक्षाही त्याना आता साध्वि आणि साधु,तमाम भगवे वाले सर्व त्याना अतिरेक्यांपॅक्षाही भयानक वाट्त आहेत.
अबब केव्हढीही जागृरुकता !!

आपल्या देशाला मुसलमानी आक्रमणापासून अजिबात धोका नसून बाटग्या हिंदूंपासूनच सर्वात जास्त धोका आहे.

असेच मला वाटते .

हे फक्त आणि फक्त आपल्या देशातच घडु शकते.
राजे आम्हाला माफ करा.
आम्हि आपुला मुलुख आणि वचक आमच्या डोळ्यादेखत संपताना निश्चलपणे पाहत आहोत.

बुडती हे जन न देखवे डोळा !

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

27 Aug 2010 - 11:44 am | विसोबा खेचर

'भगवा दहशतवाद..' हा शब्दच अत्यंत चुकीचा आहे..

दहशतवादाला कोणताही रंग नसतो.. दहशतवादाला केवळ स्वभाव असतो.. भ्याडपणाचा..!

चिदामामांनी हा शब्द वापरण्यापूर्वी भाषेचा आणि शब्दांच्या व्याप्तीचा अभ्यास करायला हवा होता परंतु इटालियन मूळ असलेल्या एका स्त्रिची सेवा करताना त्याना वेळच मिळाला नसेल..

तात्या.

शेलार मामा मालुसरे's picture

27 Aug 2010 - 9:09 pm | शेलार मामा मालुसरे

सहमत तात्या.
अगदी बरोबर.

सागर's picture

31 Aug 2010 - 2:13 pm | सागर

चिदामामांनी हा शब्द वापरण्यापूर्वी भाषेचा आणि शब्दांच्या व्याप्तीचा अभ्यास करायला हवा होता परंतु इटालियन मूळ असलेल्या एका स्त्रिची सेवा करताना त्याना वेळच मिळाला नसेल.

अगदी अगदी सहमत आहे तात्या,

संकेतस्थळावर लिहिताना सर्वमान्य भाषेचा वापर करावा. या प्रतिसादातील मजकूर संपादित केला आहे. - संपादक मंडळ

नितिन थत्ते's picture

1 Sep 2010 - 11:01 am | नितिन थत्ते

प्रकाटाआ

केशवपुत's picture

27 Aug 2010 - 11:57 am | केशवपुत

विसोबाशी सहमत!!!

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Aug 2010 - 12:03 pm | llपुण्याचे पेशवेll

१. गेल्या काही दिवसात चिदंबरम यांची विधाने अनेक आंग्ल वृत्तपत्रे प्रसिद्ध करताना 'चिदू' असा त्यांचा उल्लेख करतात. भारताच्या गृहमंत्र्यांचा उल्लेख असा द्वाड बालकाप्रमाणे करणे अत्यंत निषेधार्ह आहे. असो.
२. पण हल्ली ते 'चिदु' या शब्दाला जागेल अशा वयाच्या बालकाप्रमाणे विधाने करत आहेत त्याचे अधिक वाईट वाटते.

विसोबा खेचर's picture

27 Aug 2010 - 12:30 pm | विसोबा खेचर

पण हल्ली ते 'चिदु' या शब्दाला जागेल अशा वयाच्या बालकाप्रमाणे विधाने करत आहेत...

हे मात्र खरेच. आवडले.. :)

-- तात्यामामा.

या बालकाला कोणी दारू पाजलीये का?

बेभान's picture

27 Aug 2010 - 2:52 pm | बेभान

जेंव्हा भगवा नेता म्हणतो जर तुमची 'लष्कर-ए-तोयबा' असेल तर आम्हीही 'लष्कर-ए-शिवबा' निर्माण करू. तेंव्हा टाळ्या काय शिट्ट्या काय. आणि आता त्याच संकल्पनेला भगवा दहशतवाद नांव दिले तर एवढा तिळपापड होण्याच काय कारण? मुळात त्या दहशतवादी संघटनेशी नावसाध्यर्म करून भगवा 'काळा' केला. गावांकडं तर भीषण परिस्थिती आहे. सनातन, रा.स्व.सं. यात तिकडे काय होतं हे वेगळं नको सांगायला. स्वानुभवानं पाहीलं आहे म्हणुन म्हटलं.हो आणि हो कोणीही कोणत्याही धर्माला कुठल्याही एका रंगामध्ये बांधून ठेवू शकत नाही.

तुमच्यासाठी पुन्हाएकदा..

[चांगले वागणे, चांगले असणे, सुसंकृत असणे हा कुठल्याही जातीचा, धर्माचा, देशाचा मक्ता नाहीये. सर्व जातीत, धर्मात, देशात चांगली माणसे आहेत, नीचसुद्धा आहेत. गुणाला गुण म्हणताना मन मोठे करायला हवे. दोषाला दोष देतानाही हिंमत दाखवायला हवी! 'जातीसाठी माती खावी' या म्हणीसारखा आपल्या जातीच्या लोकांचा वाईटपणा झाकून ठेवण्याचा दांभीकपणा आणि हीनपणा कुठेही नसेल.]
जगन्नाथ कुंटे यांच्या नर्मदे हर हर मधुन.

शेलार मामा मालुसरे's picture

27 Aug 2010 - 5:08 pm | शेलार मामा मालुसरे

हिरव्यावरही थोडे बोला की !!

शेलार मामा मालुसरे's picture

27 Aug 2010 - 5:08 pm | शेलार मामा मालुसरे

हिरव्यावरही थोडे बोला की !!

बेभान's picture

27 Aug 2010 - 11:14 pm | बेभान

हिरवा माझ्या आवडत्या रंगापैकी एक आहे. हिरवा निसर्ग मला खुप भावतो. पानातील असलेल्या हरीतद्रव्यामुळे झाडांच्या पानाचा रंग हिरवा असतो. फुलराणीचं "हिरवे हिरवे गार गालिचे हरीत तृणांच्या मखमालीचे..." हे गाणं ही खुप आवडतं. आपल्या राष्टीय ध्वजामध्ये ही हिरव्या रंगाला स्थान आहे. ते देशाच्या खुशहालीचे प्रतीक आहे. माझ्याकडे केल्विन क्लैन चे हिरवे जॅकेट आहे. सध्याच्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे चाललेल्या गो ग्रीन मोहीमेला माझा पाठींबा आहे. आत्ताच (प्रतिसाद देता देता) हिरव्या रंगाबद्दल नविन गोष्ट कळाली की हिरव्या रंगासाठी संगणाकाचा कलर कोड #००६६०० हा आहे.

अर्धवटराव's picture

28 Aug 2010 - 2:40 am | अर्धवटराव

'दहशतवादाला रंग नसतो' हे (एकदम आयडीयल असले तरी) विधान बरोबर आहे.
पण दहशतवादाचा हिरवा रंग नाकारणे, आणि भगव्याला त्याच न्यायाने तोलणे हे केवळ चुकच नाहि तर आत्मघाती आहे.
विचार व्यक्त करताना (भाषण देताना) हे सगळे बोलणे ठीक वाटते. पण प्रत्यक्ष दहशतवादाचा सामना करताना कुठलिही यंत्रणा "रंग" बाजुला ठेउन विचार करत नाहि (करुच शकत नाहि).

(सी आय डी) अर्धवटराव

अनिल २७'s picture

27 Aug 2010 - 3:06 pm | अनिल २७

धर्म व दहशतवाद यांना रंग नसतो.. (हे वाक्य पार पुचट झालयं) राजकारण्यांचा रंग कोणता? भारत देशाचे वाटोळे झालेच तर ते फक्त धर्मांधता व त्यावर आपली पोळी भाजून घेणारे राजकारणी याच्यामुळेच झालेले असेल... एका क्रांतीची गरज आहे...

अनिल २७'s picture

27 Aug 2010 - 3:06 pm | अनिल २७

धर्म व दहशतवाद यांना रंग नसतो.. (हे वाक्य पार पुचट झालयं) राजकारण्यांचा रंग कोणता? भारत देशाचे वाटोळे झालेच तर ते फक्त धर्मांधता व त्यावर आपली पोळी भाजून घेणारे राजकारणी याच्यामुळेच झालेले असेल... एका क्रांतीची गरज आहे...

सातबारा's picture

27 Aug 2010 - 3:45 pm | सातबारा

आपण सर्वजण भगव्या दहशतवाद शब्दाने एवढे का घायाळ होतो आहोत ? आपल्याला हिरव्या दहशतवादाबरोबर बसविले म्हणून ?

खरंतर आता भगव्या दहशतवादानेच घडला तर बदल घडेल. आणि छोट्या छोट्या घटनांमधून भगवा वडवानल असा उफाळून यावा की हिरवे, पांढरे आणि इतरही किडे त्यात जळून जावेत.

तीनशे वर्षांपूर्वी असाच एक वडवानल उफाळला होता, त्याला त्या मूर्ख नेहरूने वेगळ्या शब्दात दहशतवादच संबोधला होता. अंदमान कोठडीतील सावरकरांचा फोटो हटविणार्‍या काँग्रेसला फक्त मुस्लीमांचे पाय चाटणे एवढेच येते.

त्यामुळे असा भगवा दहशतवाद नसला तर निर्माण व्हावा ही परमेश्वरापाशी प्रार्थना ! कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा सिंह यांचा त्याग फळास येवो !

------------
टीप : याच विषयावर एके ठिकाणी दिलेला प्रतिसाद इथेही योग्य वाटतो म्हणून पुन्हा देत आहे.

तलवारीशी तलवारीनेच लढता येते. दहशतवाद याला अपवाद असु शकत नाही. केवळ मते मिळविण्यासाठी हे लोक असली वक्तव्ये करित आहेत. यांना पाकिस्तान मधे आलेला पुर दिसतो पण स्वतः च्या राजधानी मध्ये आलेल्या पुराचे यांना कसलेच सोयरं सुतक नाही.

जेंव्हा भगवा नेता म्हणतो जर तुमची 'लष्कर-ए-तोयबा' असेल तर आम्हीही 'लष्कर-ए-शिवबा' निर्माण करू.
या नेत्यामुले मुबइत आम्हाला आज बिनदास्त फिरता येत हे विसरु नका !

स्वतन्त्र's picture

27 Aug 2010 - 6:42 pm | स्वतन्त्र

लढ लढ दाद भावड्या!!!

आपण हि शिवबाचे छावे आहोत हे आता चिदंबरमला दाखवायची वेळ आली आहे !

शिल्पा ब's picture

27 Aug 2010 - 8:33 pm | शिल्पा ब

कसं दाखवणार?

बेभान's picture

28 Aug 2010 - 4:34 pm | बेभान

या नेत्यामुले मुबइत आम्हाला आज बिनदास्त फिरता येत हे विसरु नका !
हिंस्त्र पशुही जंगलात त्यांच्या दहशतीच्या जोरावर बिनधास्त फिरतातच ना! तुम्हाला जर वाटत असेल तुम्हाला या नेत्यामुळे तसे फिरता येते तरे ते एका समुहाने, धर्माने दुस-या समुहावर, धर्मावर केलेली 'दहशत'च आहे आणि हेच पी.चि.रम यांना म्हणावयाचे आहे असे दिसते.
आपल्या अनुयायांना, कार्यकर्त्यांना योग्य दिशा दाखविणे प्रत्येक नेतृत्व करणारा-या नेत्याचे काम आहे. मुंबईत काय झाले हे सगळ्यांना माहिती आहे. ज्यांनी स्वार्थासाठी दंगल पेटविली ते अजुनही पाकिस्तानात ऐषोआरामात जगत आहेत. मुंबईत वातानुकुलीत घरात बसुन जनतेची दिशाभूल करीत बसलेले आहेत. बळी पडले ते निष्पाप, लगेच पेट घेणारे तुमच्या आमच्यासारखे हिंदू- मुस्लीम. जो पर्यंत प्रत्येकजण इतर जाती-धर्मा-देशाचा आदर करणे शिकत नाही तोपर्यंत आपण स्वत:ला सुशि़क्षीत, सुसंस्कृत म्हणवुन घेवू शकतच नाही.

[चांगले वागणे, चांगले असणे, सुसंकृत असणे हा कुठल्याही जातीचा, धर्माचा, देशाचा मक्ता नाहीये. सर्व जातीत, धर्मात, देशात चांगली माणसे आहेत, नीचसुद्धा आहेत. गुणाला गुण म्हणताना मन मोठे करायला हवे. दोषाला दोष देतानाही हिंमत दाखवायला हवी! 'जातीसाठी माती खावी' या म्हणीसारखा आपल्या जातीच्या लोकांचा वाईटपणा झाकून ठेवण्याचा दांभीकपणा आणि हीनपणा कुठेही नसेल.]

जय भगवी सेना जिन्दाबाद!!! .......

जय भवानी ..जय शिवाजी !!!
आपल्या देशाला मुसलमानी आक्रमणापासून अजिबात धोका नसून बाटग्या हिंदूंपासूनच सर्वात जास्त धोका आहे.
हेच सत्य आहे...

हुप्प्या's picture

27 Aug 2010 - 8:57 pm | हुप्प्या

वाळवंटी प्रदेशात, जिथे हिंस्र टोळ्या वावरत असत अशा ठिकाणी हिंदू धर्म जन्माला आला. त्यामुळे त्याचे तत्वज्ञानही हिंस्र आहे. एक पुस्तक, एक प्रेषित ह्यांना कवटाळून बसायचा अट्टाहास ह्यामुळे शतकानुशतके हिंदू धर्मात काहीही सुधारणा बदल होत नाहीत. जर कुणी बदल करायचा प्रयत्न केला तर त्याला इतर हिंद मारून टाकतात.
हिंदू धर्मात स्त्रियांना अगदी दुय्यम वा तिय्यम दर्जा आहे. बलात्कार झालेल्या स्त्रीला हिंदू लोक अनेक ठिकाणी आजही दगडाने ठेचून मारतात. पारंपारिक हिंदू कुटुंबात पुरुषाचे सर्वोच्च स्थान हे लहानपणापासून अधोरेखित केले जाते. त्यामुळे अशा घरात वाढलेला पुरुष स्त्रीकडे हीन नजरेने बघतो. धार्मिक हिंदू स्त्री कायम पीडित असते. आणि दोष हा आपलाच आहे असे समजून ती ते सहन करते. पण अशा स्त्रीकडून पुढच्या पिढीचे पालनपोषण चांगले होत नाही. लहानपणचा वेळ मुले आईबरोबर जास्त घालवतात विशेषत: अशा कोषस्थ समाजात. पण आई कायम दडपणाखाली असल्यामुळे मुलांवर चांगले संस्कार होत नाहीत आणि हे चक्र पुढे चालू राहते. पुरुष अनेक लग्ने करु शकतो. स्त्रीला तोंडी घटस्फोट देऊ शकतो ह्याही कारणाने हिंदू कुटुंबातील स्त्री कायम असुरक्षित असते.

गेल्या हजार वर्षात हिंदूंनी कुठलेही नवे शोध लावलेले नाहीत पण विध्वंस, अतिरेक, अपहरण ह्या क्षेत्रात नीचपणाच्या नित्य नव्या सीमा पार केल्या आहेत. विमान अपहरण, खेळाडूंचे अपहरण, कलाकारांच्या हत्या, विमाने मोठ्या इमारतींवर आदळून विध्वंस करणे, आत्मघाती बॉंबस्फोट, मुलांच्या शाळेचे अपहरण आणि चिमुरड्यांच्या हत्या, दुसर्‍या देशात जाऊन तिथल्या गजबजलेल्या जागा, हॉटेले इथे जाऊन अत्याचार. जगाच्या पाठीवर कुठेही अशा घटना घडल्या की पहिली शंका भगव्या अतिरेक्यांबद्दलच येते हे शेंबडे पोरही सांगेल.

सबब चिदंबरमसाहेब अगदी योग्य बोलले आहेत. भगवा दहशतवाद ठेचलाच पाहिजे. बाकीच्या रंगाचे दहशतवाद असलेच तर नगण्य आहेत. त्याविरुद्ध काही करायची गरज नाही. खरे तर इतर रंगाचे दहशतवाद हे अतिरेकी हिंदूंमुळेच फोफावत आहेत. ह्या अतिरेकी हिंदूंचे शिरकाण झाले की इतर दहशतवाद आपोआप संपेल.

शेलार मामा मालुसरे's picture

27 Aug 2010 - 9:15 pm | शेलार मामा मालुसरे

तु उपरोक्त प्रतिसाद जरुर वाचावास.
खरेच हिंदु किती वाईट आहेत ते तुम्हाला चांगले कळेल.
चिदु तू हिरवा साप कुरवाळत रहा बरे !!!

गांधीवादी's picture

28 Aug 2010 - 4:33 am | गांधीवादी

हुप्प्या भाऊ, जबरा हाणलाय,
'तुमच्या लेखातील हिंदूंचा' जाहीर धिक्कार.

हरकाम्या's picture

28 Aug 2010 - 5:58 pm | हरकाम्या

महाराज आपण ज्याचे " वर्णन " केलेत ते हिन्दु कोठे रहातात हे कळेल काय ?

चिरोटा's picture

27 Aug 2010 - 10:34 pm | चिरोटा

बातमीचा विपर्यास करुन वेगळाच अर्थ काढला गेला आहे असे वाटते.

पी.चिदंबरमला वाटते़ की भगवा दहशतवादच सर्व समस्यांचे मुळ आहे

असे चिदंबरम ह्यांनी कोणत्याही बातमीत म्हंट्लेले दिसले नाही. इतर दहशतवाद्यांसारखाच(माओ/इस्लामिक) भगव्या दहशतवादाचाही धोका आहे असे ते म्हणाले आहेत.
http://www.thehindu.com/news/national/article593450.ece
http://indiatoday.intoday.in/site/Story/110182/India/chidambaram-caution...
(चिदंबरम ह्यांनी इस्लामिक दहशतवाद असा सरळ उल्लेख केलेला नाही ही बाब मात्र खटकली.)
--

  • पुण्याजवळची पर्वती हा हिमालयासारखाच एक पर्वत आहे.
  • शिवणकामाची सुई ही तलवारीसारखेच घातक हत्यार आहे.
  • पेटलेली मेणबत्ती ही ज्वालामुखीसारखीच आग आहे.
  • दिवाळीतील लहान पोरांची पिस्तुल हे एके ४७ सारखेच जीवघेणे हत्यार आहे.
  • लवंगी फटाका हा आर डी एक्स सारखेच एक स्फोटक आहे.
  • घरातले पाण्याचे पिंप हे हिंदी महासागराप्रमाणेच एक जलाशय आहे.
  • लहान बाळाची तीन चाकी सायकल हे स्पेस शटलप्रमाणेच एक वाहन आहे.
  • हिमेश रेशमिया हा महंमद रफी सारखाच एक गायक कलाकार आहे (देवा मला माफ कर!).
  • अभिषेक बच्चन हा अमिताभ बच्चनसारखाच एक अभिनेता आहे.
  • भांग हे तुळशीसारखेच उपयुक्त आणि पवित्र रोप आहे
  • प्रतिभा पाटील ह्या अब्दुल कलामांप्रमाणेच कर्तृत्ववान राष्ट्रपती आहेत
  • मी (म्हणजे चिदम्बरम) वल्लभभाई पटेलांप्रमाणे कणखर आणि रोखठोक बोलणारा आणि करणारा गृहमंत्री आहे.

अजून भर घाला बरे ह्यात.

कवितानागेश's picture

28 Aug 2010 - 8:14 am | कवितानागेश

ती हसुन लोळण्याची स्मायलि कुठे गेली??
...इथे नकोय..
ती मला चिदूच्या भाषणाला चिकटवायची आहे!

कार्लोस's picture

29 Aug 2010 - 12:02 am | कार्लोस

चिदम्बरम ला नाग...... करुन मारा भग्वा काय ह्यच्या बापाचा आहे लुन्गि सम्भल फक्त नाहितर ति पन काधु

हुप्प्या's picture

30 Aug 2010 - 5:47 am | हुप्प्या

चिदूअण्णाला हिरवी मिरची सोसत नाही त्यामुळे त्याचा आचारी रसममधे तांबडी मिरची घालतो. काही दिवसापूर्वी खास आंध्रहून लाल मिरची मागवून त्याने रसम बनवायचा प्रयत्न केला. तो प्रकार जालीम तिखट बनला. ईट वन्स अँड एन्जॉय ट्वाईस हा ह्या आंध्र मिरचीचा बाणा आहे.
त्या मिरचीचा जहालपणा अनुभवलेला चिदूअण्णा भगव्या दहशदवादाच्या बोंबा मारू लागला.
अर्थात त्या मिरचीचा अंगचा रंग थोडा भगव्याकडे झुकणारा होता आणि तिने जो रंग दाखवला त्याला काही लोक तरी दहशतवाद म्हणतील हे नाकारता येत नाही. असो.

सोम्यागोम्या's picture

30 Aug 2010 - 8:52 am | सोम्यागोम्या

दहशत वादाचा रंग फिंड असले पेपर बाजीतले शब्द वापरणं बंद करा. स्टॅटिस्टिक्स काय बोलतात? मुसलमान दहशतवाद्यांनी आजपर्यंत किती जिवीत हानी केली आहे?व हिंदू दहशतवाद्यांनी किती? मालेगावात किती लोक मेले?
मुंबई लोकल बॉंब ब्लास्ट, मुंबई हल्ला, पुणे स्फोट ते सगळं माफ का? कशासाठी? एखाद्या फुसक्या हिंदू स्फोटाचा खरा धोका देशाल आहे काय? देशाला खरा धोका या चिदंबरम सारख्या बाटग्या लुंग्या पासून आहे.

नितिन थत्ते's picture

30 Aug 2010 - 10:49 am | नितिन थत्ते

देशात भगव्या दहशतवादाचा धोका आहे का ते सांगता येत नाही.

पण मिसळपाववर मात्र अलिकडे काही भगवे अतिरेकी घुसले असल्यासारखे वाटू लागले आहे.

शेलार मामा मालुसरे's picture

31 Aug 2010 - 9:50 am | शेलार मामा मालुसरे

काही भोकशे धर्मनिरपेक्षतावादी घुसल्याचे मला वाटते आहे.

शेलार मामा मालुसरे's picture

31 Aug 2010 - 9:50 am | शेलार मामा मालुसरे

काही भोकशे धर्मनिरपेक्षतावादी घुसल्याचे मला वाटते आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

31 Aug 2010 - 2:37 pm | परिकथेतील राजकुमार

पण मिसळपाववर मात्र अलिकडे काही भगवे अतिरेकी घुसले असल्यासारखे वाटू लागले आहे.

+१ थत्ते चाचा.

आणि ह्या अतिरेक्यांची अत्यंत गलिच्छ आणि शिवराळ भाषा पाहुन खरच आता शरम वाटू लागली आहे. इथे 'आपण किती भारी' हे दाखवण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा हे तिकडे चिदंबरंमच्या समोर जाउन हि गरळ का ओकुन दाखवत नाहीत ? इथे एका मोठ्या पदावरील व्यक्तीसाठी अत्यंत शेलकी विशेषणे वापरुन स्वतःचे काय कर्तुत्व सिद्ध केले जाते ते कळत नाही.

स्वतःला छावा / शिवप्रेमी / राजांचा मावळा म्हणुन घेतले की वाटेल त्या माणसाविषयी वाट्टेल ते बोलायचा अधिकार प्राप्त होतो का ? खुद्द महाराजांनी देखील त्यांच्या काळात कोणाला अशा शेलक्या शब्दांचा आहेर नक्कीच केला नसेल. आपले वय काय, पगार किती, शिक्षण किती, आपल्याला घरी कुत्रे देखील विचारते का ? ह्या कशाचाही विचार न करता वाट्टेल ति बडबड करण्यातच समाधान मिळत असेल, तर काय बोलावे ?

ह्या असल्या लेखनाची आणि सतत फक्त आणि फक्त अशाच प्रकारचे लेखन करणार्‍या सदस्यांची योग्य ती दखल संपादक मंडळाने घ्यावी अशी विनंती.

+१

थत्ते मिया आणि पराभाईजान शी सहमत

शेलार मामा मालुसरे's picture

31 Aug 2010 - 4:39 pm | शेलार मामा मालुसरे

की भोकशे हा अश्लील,शिवराळ शब्द नाही.
ज्यांच्या नाकपुड्या कापल्यानंतरही आपली नाकाची भोके दाखवून जे लोक आपलेच नाक किती उंच आणी सरळ आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करतात त्याना ग्रामीण भाषेत भोकशे असे म्हणतात.
तरीही कोणी दुखावले गेले असेल तर त्यासाठी खेद व्यक्त करीत आहे.

राजेश घासकडवी's picture

31 Aug 2010 - 4:32 pm | राजेश घासकडवी

पण मिसळपाववर मात्र अलिकडे काही भगवे अतिरेकी घुसले असल्यासारखे वाटू लागले आहे.

सहमत आहे. बघावं तिथे शिवराळ, अर्वाच्य, व गलिच्छ भाषा दिसते. मिपाचं खेळीमेळीचं, दणकट, ताजंतवानं स्वरूप बदलून आडदांड, दांडगट, रासवट व आडमुठं दिसायला लागलेलं आहे. हे बदलण्याची शक्ती व इच्छाशक्ती कोणात आहे का? नसेल तर दुर्दैव म्हणायचं.

गांधीवादी's picture

31 Aug 2010 - 6:49 pm | गांधीवादी

विचार संपले का माणूस हमरी तुमरी वर येतो , त्याचे जिवंत उदाहरण बघायला मिळाले.

बर ते जाऊ द्या,
मिसळपाव वरचे भगवे दहशतवादी जातील तेव्हा जातील, पण हे कधी जाणार ?

http://72.78.249.124/esakal/PollArchive.aspx

वेताळ's picture

31 Aug 2010 - 6:51 pm | वेताळ

पण मिसळपाववर मात्र अलिकडे काही भगवे अतिरेकी घुसले असल्यासारखे वाटू लागले आहे.


ह्याच्या मुळे आता हिंदु धर्माचाच उबग येवु लागला आहे.

अवलिया's picture

31 Aug 2010 - 6:53 pm | अवलिया

आम्ही आता वेगळा धर्म स्थापन करायच्या विचारात आहोत
इच्छुकांनी नाव नोंदणी करुन ठेवावी.

वेताळ's picture

31 Aug 2010 - 6:56 pm | वेताळ

पण कलर ठरवताना मनसेच्या झेंड्यासारखा सप्तरंगी ठेवा.

कोन्ग्रेस च्या दुर्दैवाने कालच जर्मन बेकारी संबंधी दोघा हिरव्या दहशतवाद्यांना अटक झाली.
जर्मन बेकरीत स्फोट घडविणाऱ्या दोघांना अटक
त्यावर इसकाळ च्या वाचकांच्या अश्या निवडक प्रतिक्रिया.
ह्या काही प्रतिक्रियेवरून आपल्या न्यायव्यवस्थे बद्दल आणि सरकार बद्दल सामान्य जनतेचे मत दिसून येते.
(मिसळपावचे दुर्दैव आहे हि लोक इथे येऊन आपली मते मांडत नाहीत.)

नितिन थत्ते's picture

9 Sep 2010 - 10:56 am | नितिन थत्ते

तुमचा आक्षेप 'भगवा दहशतवाद' या शब्दाला आहे की "हिंदुत्ववादी संघटनाही दहशतवादी कारवाया करीत आहेत" असे म्हणण्याला आहे?

सरकारतर्फे मुस्लिमांच्या संघटना दहशतवादी नाहीत अशा प्रकारचे कुठले प्रतिपादन आल्याचे कधीच ऐकलेले नाही. दहशतवादी घटनेनंतर सरकार कडून लष्कर-इ-तोयबा किंवा कुठल्यातरी जिहादी संघटनेचा हात असल्याचाच संशय व्यक्त केला जातोच.

शीर्षकात लिहिलेली भावना "भगवा दहशतवाद समस्यांचे मूळ" चिदंबरम यांनी व्यक्त केल्याची माहिती नाही.