आरंभी वंदिन गडांचा राजा :- राजगड
राजगड :संजीवनी माची
राजगड :- धुक्यात हरवलेला बालेकिल्ला
५ पांडवांचा डोंगर
भारत पर्वत साल्हेर वाडी
साल्हेर
साल्हेरचा धाकटा भाऊ सालोटा
(जीपच्या टपावरून दिसलेला)एक असाच देखणा डोंगरभाऊ
हरगड
वासोटा आणि तुळशी वृन्दावन
ब्रह्मगिरी
प्रबळगड
कलावंतीण
बुधला माची तोरणा
नाचात बेभान झालेले कातकरी
एक रानफूल
कळलावीचं फूल
एक आड्बाजूचं वडाचं झाड्
एक असाच सुर्यास्त
प्रतिक्रिया
26 Aug 2010 - 4:13 pm | यशोधरा
क्या बात है! झक्कास प्रकाशचित्रं!
26 Aug 2010 - 4:20 pm | जिप्सी
लेखाचे नाव :- भटकंतीतले काही क्षणचित्रं च्याजागी भटकंतीतली काही क्षणचित्रं असे वाचावे.
26 Aug 2010 - 4:59 pm | अनाम
नाचात बेभान झालेले कातकरी
लै भारी!!!!!!!!!!!!!
26 Aug 2010 - 5:02 pm | अनुराग
अप्रतिम ! नेद्याचा फोटो का टाकला नाहि.
26 Aug 2010 - 5:38 pm | विंजिनेर
सुरेख!
डोळ्याचं पारणं फिटलं!!
26 Aug 2010 - 5:44 pm | मेघवेडा
सगळेच फोटु अप्रतिम! वडाच्या झाडाचा फोटु तर कहर आहे!
26 Aug 2010 - 9:51 pm | चतुरंग
सगळ्या आसमंताला खांद्यावर तोलून धरल्यासारखा दिसतोय तो वड! क्लास!!
(जमिनीचा भाग थोडा कमी करुन आभाळाचा भाग वाढवला असता तर अजून उच्च दिसला असता का असा विचार करतोय?)
26 Aug 2010 - 11:57 pm | असुर
+१०००
अगदीच सहमत. कंसासहीत!!
-असुर
26 Aug 2010 - 6:06 pm | स्वप्निल..
मस्त :)
26 Aug 2010 - 6:54 pm | स्वतन्त्र
लई भारी !
26 Aug 2010 - 7:01 pm | चिंतामणी
अप्रतीम.
पण अजून येउ द्यात.
26 Aug 2010 - 7:07 pm | प्रभो
ज ह ब ह रा!!!!!!!!
26 Aug 2010 - 7:10 pm | अरुंधती
सुंदर!!! वडाचं झाड, नाचात बेभान कातकरी आणि गडमाथ्यांची सर्वच प्रकाशचित्रे सुरेख! :-)
26 Aug 2010 - 9:46 pm | विसोबा खेचर
शब्दच संपले...
26 Aug 2010 - 10:39 pm | राजेश घासकडवी
संजीवनी माची, कलावंतीण आणि बुधला माची खूपच आवडले. बुधला माचीचं फ्रेमिंग छान झालेलं आहे.
26 Aug 2010 - 10:52 pm | मस्त कलंदर
मस्तच. नक्की कोणते जास्त आवडले सांगता येणे अवघड आहे.
बाकी, तो कलावंतीणीचा सुळका जीवघेणा आहे. नक्की कोणतं ठिकाण आहे ते? तिथे वरती फक्त गिर्यारोहकच जातात की डोंगर चढून जाता येते?
26 Aug 2010 - 10:58 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
मस्त
26 Aug 2010 - 11:10 pm | विलासराव
जिप्सीदा काय भन्नाट फोटो आहेत. एकापेक्षा वरचढ दुसरा.
बाकी एवढ्या सुंदर फुलाला कळलावीचं फूल का म्हणत असावेत बरं???????
27 Aug 2010 - 12:01 am | झकासराव
जबरदस्त फोटो :)
27 Aug 2010 - 3:17 am | बेसनलाडू
(तृप्त)बेसनलाडू
27 Aug 2010 - 10:07 am | बिपिन कार्यकर्ते
झक्कास ! झक्कास ! झक्कास ! झक्कास ! झक्कास !
झक्कास ! झक्कास ! झक्कास ! झक्कास !
झक्कास ! झक्कास ! झक्कास !
झक्कास ! झक्कास !
झक्कास !
झक्कास ! झक्कास !
झक्कास ! झक्कास ! झक्कास !
झक्कास ! झक्कास ! झक्कास ! झक्कास !
झक्कास ! झक्कास ! झक्कास ! झक्कास ! झक्कास !
27 Aug 2010 - 10:10 am | मदनबाण
अप्रतिम ! अप्रतिम ! अप्रतिम ! अप्रतिम ! अप्रतिम !
अप्रतिम ! अप्रतिम ! अप्रतिम ! अप्रतिम !
अप्रतिम ! अप्रतिम ! अप्रतिम !
अप्रतिम ! अप्रतिम !
अप्रतिम !
अप्रतिम ! अप्रतिम !
अप्रतिम ! अप्रतिम ! अप्रतिम !
अप्रतिम ! अप्रतिम ! अप्रतिम ! अप्रतिम !
अप्रतिम ! अप्रतिम ! अप्रतिम ! अप्रतिम ! अप्रतिम !
27 Aug 2010 - 1:27 pm | जिप्सी
चतुरंगकाका :- जमिनीचा भाग थोडा कमी करुन आभाळाचा भाग वाढवला असता तर अजून उच्च दिसला असता का असा विचार करतोय? -----> ते झाड बघितल्यावर मी फक्त नाचायचं ठेवलं होतं (मिठी सुद्धा मारली),आणि त्या झाडाची आता परत ओढ लागलेली आहे, जाईन परत ८-१० दिवसात या वेळेला तसा फोटो काढ्तो !(अजून आपण लय कच्चे आहोत फोटो काढण्यात)
मस्त कलंदर भाऊ :- तिथे वरती फक्त गिर्यारोहकच जातात की डोंगर चढून जाता येते? ---> अहो अगदी सोप्प आहे वर चढून जायला. प्रबळ्गड आणि कलावंतीण पनवेल जवळ आहे.कधी जायचं बोला?
विलासराव :- बाकी एवढ्या सुंदर फुलाला कळलावीचं फूल का म्हणत असावेत बरं??????? ----> बाळंतपणात कळा येण्यासाठी ते झाड उपयोगी पड्तं म्हणून कळलावी !
बाकी सगळ्यांचे आभार!
(फोटो टाकत बसायला लय कंटाळा येतोय राव्,त्यांपेक्षा घरलाच या आमच्या फोटो बघायला!)
27 Aug 2010 - 2:11 pm | स्वानंद मारुलकर
फोटो आणि भटकंती दोन्ही...
27 Aug 2010 - 2:48 pm | ऋषिकेश
पायाचाही फोटो टाकावा.. फ्रेम करून देव्हार्यात ठेवेन म्हणतो :)
अप्रतिम फोटोज!
वडाचे तसेच बुघला माचीचा फोटो तर क्या कहने!
28 Aug 2010 - 8:45 pm | जिप्सी
पायाचाही फोटो टाकावा.. फ्रेम करून देव्हार्यात ठेवेन म्हणतो -----> ह्या काय तरीच तुम्चं आण्णा,पाय साधेच आहेत ९ नंबर.
27 Aug 2010 - 2:54 pm | अमोल केळकर
सुंदर . जय हो !!
28 Aug 2010 - 11:33 am | बबु
एकदा हरीचन्द्रगडाला भेट द्या राव!
28 Aug 2010 - 4:00 pm | टुकुल
सगळेच फोटो कहर आहेत पण त्यातल्या त्यात <<एक आड्बाजूचं वडाचं झाड्>> जास्तच आवडला... उगीच वाटुन गेल कि मायक्रोसॉफ्ट नी पाहीला तर विकत घेतील तुमच्या कडुन फोटो : )
--टुकुल
28 Aug 2010 - 8:49 pm | जिप्सी
बबु/शामल :- एकदा हरीचन्द्रगडाला भेट द्या राव! ----> आहो ३ दा जाउन आलो,पण ३हि वेळा कॅमेरा नव्हता.
अवांतर :- पहीले ५०-६० किल्ले होई पर्यन्त कॅमेराच नव्हता त्यामुळं आता परत जाव लागणारं आहे.
28 Aug 2010 - 9:09 pm | विलासराव
नशीब म्हणायचं आमचं.
चला परत. आम्ही सदैव तयार आहोत किल्ले पहायला( कुठेही भटकायला).
8 Sep 2010 - 2:48 pm | धमाल मुलगा
आम्ही तर अजुन सॅक रिकामीही केलेली नाही...कधी चलायचं तेव्हढं बोला ;)
28 Aug 2010 - 9:28 pm | जिप्सी
आयला,(आमच्या होणार्या)वैनींकडून मार खायला लावणार बहुतेक तुम्ही !
8 Sep 2010 - 2:33 pm | गणेशा
खरेच निशब्द करुन टाकत आहेत फोटो.
काय बोलु .. ३ -४ दा पाहिले तरी मन भरत नाही .
अशे वाटते तुमच्या बरोबर यावे मस्त गड फिरायला ..
तुमच्या म्हणण्यामुळे येथे लिहितो फोटो बद्दल वेगळे काही . पण त्या बद्दल शमस्व कारण येवढी प्रतिभा शब्दात मांडता येणे खुप खुप कठिन आहे .
१. सखा राजगड : सभोवतालची हिरवी लिपी पाहुन , आनंदाने हळुवार गवताच्या पात्यातुन दोन्ही हात पसरुन पाठमोरा उभा असलेल्या एका राजकुमाराचा भास होतो.
२. संजीवनी माची : नदीप्रवाहाची संजीवनी घेवुन .. दोंगर माध्यावर ही अशी अम्रुत वाहिनी असु शकते याचे चित्रण म्हणजे संजीवनी माची.
३. धुक्यात हरवलेला बालेकेल्ला ( राजगड) : - खुपच लोभसवाने चित्र आहे हे .
थोडी अतिशयोक्ती वाटेल परंतु लांबुन हा फोटो पाहिला की .. डाव्या साइडचा उंच झालेला भाग म्हणजे जणु पर्वतांच्या राज्याचा चेहरा दिसतो आणि तो आपलेच रुप समोर पहात उभा आहे असा भास होतो .
आणि त्या पर्वत राजाचे नाक पाहुन खुद्द राजेंची आठवन येते आहे. कालप्निक पणे फेटा लावला तर थोडे क्शन राजेंचीच प्रतिमा दिसते.
४. साल्हेर वाडि भारत पर्वत : पाठमोरा गरुड आपले पंख पसरुन बसलेला भास होत आहे.
५ . बुधला माची तोरणा : जनु काही रायगडाच्या दरबाराच्या प्रतिक्रुतिमधुन आपण दोकावुन पाहत आहोत असेच वाटले.
बाकी सर्व फोटो खुप सहि आहेत्च .. विषेश करुन कातकरी जास्त आवडले .. अआणि सर्व विश्वाला कवेत घेवु पाहणारा निसर्ग म्हणजे वडाचे झाड भासले .
-- जिप्शी आपला आभारी
- गणेशा
8 Sep 2010 - 3:50 pm | विलासराव
डाव्या साइडचा उंच झालेला भाग म्हणजे जणु पर्वतांच्या राज्याचा चेहरा दिसतो आणि तो आपलेच रुप समोर पहात उभा आहे असा भास होतो .
आणि त्या पर्वत राजाचे नाक पाहुन खुद्द राजेंची आठवन येते
तुम्ही सांगितल्यावर लक्षात आले.
8 Sep 2010 - 8:57 pm | गणेशा
आता पर्यंत ढगांचे आकार पहात आलेलो आहे मी.
मेघ मला खुप आवडतात.
प्रथमच ह्यांच्या चित्रातुन काही तरी वेगळा भाग दिसतो का असा जेंव्हा खरडवहित मेसेज आला
आणि हा नविन छंद लागला आहे.
खुप छान वाटते आहे. मे बी मला जे वाटले ते इतरांना नाही आढळणार .. परंतु त्या एका क्षणात एका कलाकृतीच्या असंख्य छटा जेंव्हा मनामध्ये पराव्रुत्त होतात तेंव्हा खुप खुप छान वाटते.
@ मितान ताई
मी काहीच विषेश केले नाही हो .
जिप्शी हे ग्रेट आहेतच.
अआणि त्यांच्या कातकर्यांचा जो फोटो आहे. एव्हडे जिवंत चित्र तर मी कोठेच अजुन पाहिले नाही असेच वाटत आहे.
8 Sep 2010 - 2:37 pm | मितान
जिप्सी नि गणेशा
दंडवत तुम्हाला !
अ प्र ति म !!
(सह्याद्रीच्या कुशीत शिरण्याची वाट बघणारी ) माया
8 Sep 2010 - 2:52 pm | सुहास..
ने त्र दि प क !!!
8 Sep 2010 - 4:31 pm | अस्मी
सुंदर, अप्रतिम, लाजवाब!!!
- अस्मिता
8 Sep 2010 - 4:45 pm | जागु
सगळेच फोटो सुंदर आहेत.
8 Sep 2010 - 7:54 pm | स्वाती दिनेश
क्लास फोटो.. व्वा!
स्वाती
8 Sep 2010 - 9:12 pm | प्रियाली
अप्रतिम... शब्द तोकडे आहेत.
8 Sep 2010 - 11:09 pm | जिप्सी
सह्याद्रीच्या कुशीत शिरण्याची वाट बघणारी माया --- > मितान्/मायाताई कधी येताय बोला? नॉर्वेमधनं बाहेर पडला की लगेच करूयाच चालू.
प्रियालीताई :- एखाद्या ट्रेकला चलाच आपण तुम्हाला याहून भारी शिणेरी दाखवू !(आणि एखाद्या भयकथेसाठी कच्चा माल पण पुरवू)
गणेशा :- तुम्ही तर फोटोवरून सुद्धा कविता करता की राव! एक खेळ खेळता येईल मी फोटो टाकतो तुम्ही/बाकीचे त्याचे काव्यात्मक वर्णन करतील,ढगांच्या फोटोंची १ मालीका करू काय चालू????
जागुताई :- आभार.
स्वातीतै :- आभार.(मित्रांनी जर्मनीतल्या डोंगरांचे फोटो दाखवल्यापासून आम्हाला त्यांचेही वेध लागलेले आहेत.)
बाकी सगळ्यांचे आभार !
खर सांगायच तर याहून अनेक उत्तम दृश्य मनावरच कोरली गेलेली आहेत. मी मन पूर्ण भरलं की मगच कॅमेर्याला हात लावतो. त्यामुळं याहून अनेक सुंदर दृश्यांचे फोटो माझ्याकडं नाहीत.
9 Sep 2010 - 2:18 pm | गणेशा
करा सुरुवात .. मेघांचे फोटो आणि शब्दांची जोड